चिकन - पाव किलो, बोन्ससकट आणि हलाल मिट असेल तर उत्तम.
कांदा - ३ मध्यम आकाराचे, बारीक चिरुन.
लसणाच्या पाकळ्या - ८-१०.
आलं - १/२ इंच.
सुकं खोबरं - ३ मोठे चमचे.
प्रत्येकी २/३ लवंगा, काळी मिरी
१/२ इंच दालचिनीचा तुकडा.
गरम मसाला - २ चमचे.
लाल तिखट - २ चमचे.
काजुची पेस्ट - २ चमचे.
जीरे, तेल, हळद, मीठ - अंदाजाने लागेल तसं.
कोथिंबीर - आवडीनुसार.
ऐच्छिक जिन्नस:
टोमॅटो - १ लहान, अगदी बारीक चिरुन.
वाटण :-
१. पॅनमध्ये अगदी थोडं तेल घालुन लवंगा, काळी मिरी, दालचिनीचा तुकडा टाकुन परतुन घ्या.
२. त्याच पॅनमध्ये आधीचा खडा मसाला न काढता कापलेल्या कांदयाच्या २/३ कांदा परतुन घ्यावा.
३. कांदा ब्राऊन कलरचा झाला की त्यात सुकं खोबरं, ४-५ लसणीच्या पाकळ्या, आलं बारीक तुकडे करुन सगळं ब्राऊन कलरचं होई पर्यंत परतुन घ्या.
४. हे सगळ गार झालं की लागेल तसं पाणी टाकुन मिक्सरमधुन खुप बारीक वाटण करुन घ्या.
मुख्य कृती :-
१. चिकन स्वच्छ धुवुन घ्यावं.
२. कुकरमध्ये २ चमचे तेल टाकुन ते गरम झाल्यावर जीरं टाकावं. त्यात ४-५ लसणीच्या पाकळ्या खुप बारीक चिरुन घालाव्यात.
३. लसुण थोडा परतला की कापलेल्या कांद्याच्या अर्धा कांदा टाकुन परतावं.
४. टोमॅटो हवा असेल तर कांदा परतला गेला की त्यात घालुन परतावं.
५. थोडी हळद, १/२ चमचा लाल तिखट घालुन मिनिट्भर परतावं.
६. मग त्यात धुतलेलं चिकन घालुन ते मिनिट्भर परतावं. त्यात अगदी थोडं मीठ घाला.
७. कुकरचं झाकण लावुन ३ शिट्ट्या होवु द्याव्या. कुकर गार झाल्यावर चिकन शिजलेलं असेल आणि त्यात सुप पण तयार झालं असेल.
८. आता कढईमध्ये २-३ मोठे डाव तेल घालुन गरम झाल्यावर जीरे घाला.
९. नंतर वाटण घाला. हे वाटण तेलात खुप चांगलं परतुन घ्या. साधारण १२-१५ मिनिटं तरी परता. मग त्यात काजुची पेस्ट, लाल तिखट, गरम मसाला, हळद घालुन अजुन १-२ मिनिटं परतुन घ्या.
१०. ह्यात कुकर मधलं चिकन आणि सुप घाला. करी किती घट्ट किंवा पातळ हवी त्याप्रमाणात पाणी घाला.
११. चवी प्रमाणे मीठ घाला, एक उकळी आली की चवीप्रमाणे कोथिंबीर घाला.
१२. उकळी आल्यावर अजुन १०-१२ मिनिटं मंद आचेवर उकळु घ्या.
मी केलेल्या करीचा फोटो.
१. माझ्या कुकरमध्ये जनरली ३ शिट्ट्यांमध्ये चिकन शिजतं.
२. चिकनचं सुप खुप टेस्टी होतं, लहान मुलांना द्यायला खुप चांगलं.
३. तिखट आणि गरम मसाल्याचं प्रमाण आवडीप्रमाणे बदलु शकता. मी शक्यतो कमी तिखट आणि कमी मसालेदार करते.
ओक्के पुढच्या वेळेला ट्राय
ओक्के पुढच्या वेळेला ट्राय करेन लालू.
दही लावुन ठेवल आणि नंतर कुकर मध्ये शिजवल तर काही प्रॉब्लेम नाही ना यायचा? दही फाटणार वगैरे नाही ना?
काहीही म्हणा मी मांसाहारी
काहीही म्हणा मी मांसाहारी नसले तरिही मला पाकृ वाचायला व त्यांचे फोटो पहायला फार आवडतात.
एकदम तोंपासु दिसतात... चिकनच्या ऐवजी मी बटाटे कल्पले इथे..
(याला म्हणतात कल्पनादारिद्र्य)
हा रस्सा इतका मस्त झालाय की
हा रस्सा इतका मस्त झालाय की मी पण माझ्या शाकाहारी नवर्यासाठी बटाटे आणि फ्लॉवर घालुन करायचा प्लॅन तयार पण केला
(सगळे मारु नका हं मला आता. हे खाण्याच सुख नवर्याबरोबर वाटायचा प्रयत्न करतीये बापडी.)
दक्षिणा फोटो मस्तच आलाय
दक्षिणा
फोटो मस्तच आलाय मिनीच्या करीचा.
मकु, दही फाटत नाही, तसे फार लावायचे नसते. चमचाभर. त्याऐवजी लिंबाचा रस लावला तरी चालेल.
मिनी, मी करून बघणार आहे
मिनी, मी करून बघणार आहे तुझ्या पद्धतीने चिकन करी. करून झाली की रिपोर्ट देईनच.
मी बी आज ट्राय करीन.. तोंपासु
मी बी आज ट्राय करीन.. तोंपासु रेसिपी.. धन्स
उद्या रिपोर्ट देईनच..
मी अशीच करते रेसिपी. अर्थात
मी अशीच करते रेसिपी. अर्थात टोमॅटो टाकून. नवर्याला नाही आवडत ती आंबटसर चव... पण टोमॅटो न टाकता मला रेसिपी अपूर्ण वाटते
बघूया, न टाकता करून बघते...
मी पण कढईतच शिजवते. कुकरात चव नाही लागत हे माझं पण मत, पण ठीके... करून बघते परत... हा हे सूप मात्र कधी ट्राय नव्हतं केलं.. आईकडे असताना, ती वाटण टाकायच्या आधी मसालेदार कांदा लसणीच्या चवीचा झणझणीत रस्सा चिकन शिजलंय का ते बघण्यासाठी द्यायची सूप सारखा... इथे कधी ट्राय नाही केलं... पण तोंपासु वाटतंय सूपपण ! ट्राय करायलाच हवं.. आणि ते बोन बोन चिकनच चांगलं लागतं.. नवरा डी-मार्ट मधनं आणतो ते फ्रोझन बोनलेस अगदीच रब्बर! नाही आवडत.. पण हे पठ्ठेराव.. म्हणे हायजीनीक नस्तं ते बोनवालं (डोंबलं माझं)! शिजल्यावर हायजिनीकच होतं ना ते! पण नाही. आता मीच जाणारेय चिकन शॉपवर हवं तस्सं आणायला...
मिनी.. सुप्पर्ब रेसिपी..
मिनी.. सुप्पर्ब रेसिपी.. आत्ताच केलं चिकन.. बोन वालं.. नो बोन लेस फॉर मी.. ड्रीमगर्ल सार्खं मलाही बोन लेस्स अजिबात आवडत न्हाय!!
थोडा बदल केला ,पण मूळ रेसिपी तुझीच..
१)काजु बरोबर थोडीशी खसखस ही टाकली..
२)चिकन ३,४ तास मॅरिनेट करून ठेवलं होतं,आलं लसूण्,मीठ,लवंग दालचिनी पावडर थोडीशी,लिंबाचा थोडासा रस लावून
३) खडा मसाला ,नवर्याला मुळीच चालत नाही म्हणून मी घरीच लवंग,दालचिनी,तेज पान इ. ची बारीक पावडर करून डीप फ्रिज मधे स्टोअर करते त्यामुळे वर्षानुवर्ष ही वास बदलत नाही या मसाल्यांचा
४) चिकन बाहेर कढईतच सुरेख शिजतं.. कुकर वापरावा लागत नाही इकडे.
बस .. एव्हढाच फरक केला.. करी इज टू गुड... धन्स!!
छान माहिती दिली, आणि त्याचा
छान माहिती दिली, आणि त्याचा वापर करुन माझा पहिला प्रयत्न.... चविष्ट झाली असे खाणार्यान्चे मत पडले.
आज मुलाचे मित्र आलेत घरी. ही
आज मुलाचे मित्र आलेत घरी. ही रेसिपी मुद्दाम शोधून काढून आताच केली. फक्त तासभर आधी दही, मीठ, आले-लसूण पेस्ट लावून चिकन मुरवत ठेवले होते.
खूप चविष्ट चिकन रस्सा झाला. मी प्रथमच कुकरमधे चिकन शिजवले. खूप छान शिजले. सगळे खूष एकदम..
नंबर 10 स्टेपला उकळलेले पाणी घातले. ही टीप माझ्या बाबांची. ते कधीच भाजी आमटीत गार पाणी घालत नाहीत. त्यांच्या हातच्या भाज्या आमट्या खूपच चवदार असतात.
आज केली स्वतः
आज केली स्वतः
छान झाली होती असे खाणारे म्हणाले
Pages