छत्रपती घराणे
महाराजांचे पूर्वज आणि वंशज..
करवीर शाखेचे शेवटून दुसरे छ. शाहू महाराज म्हणजे प्रसिद्ध पुरोगामी विचारवन्त कोल्हापूरचे शाहू महाराज !
सातारा शाखेचे सध्याचे छ. उदयन महाराज आणि करवीर शाखेचे सध्याचे छ. राजाराम महाराज सर्वाना परिचित आहेतच...
व्यंकोजी राजे म्हणजे तंजावर शाखा.
इथे फॅमिली ट्री टाकायला अडचण येते आहे. म्हणून रनिंग मजकूर लिहीत आहे.
बाबाजी भोसले (जन्म १५३३) (वेरुळचे पाटील भोसले.)
त्यांचे प्रथम पुत्रः- मालोजी भोसले , त्यांची पत्नी उमाबाइ ह्या फलटणच्या नाईक-निम्बाळकर यांच्या कन्या.
द्वितीय पुत्रः- विठोजी ,पत्नी आउ बाइ. याना ८ पुत्र आणि १ कन्या.
(अम्बिकाबाइ १ .सम्भाजी २.खेलोजी ३ .मालोजी ४ .कबाजी ५.नागोजी ६ .परसोजी ७.त्रिम्बकजी ८. ककाजी)
मालोजी भोसले(१५४२-१६१९)
पुत्र
१. शाहाजी - पत्नी- जिजाबाई (सिन्दखेडचे लखुजी जाधव यांची कन्या. सिन्दखेडचे जाधव हे देवगिरीच्या यादवांचे (जाधवांचे !)वंशज)
२.शरीफजी -पत्नी दुर्गाबाई. शरीफजी नगरच्या जवळच्या प्रसिद्ध भातवडीच्या लढाईत मारले गेले.
शाहाजी भोसले (१५९४-१६६४)
शाहाजी अहमदनगरच्या निजामशाहीत नन्तर विजापूरच्या आदिलशाहीत सरदार होते. सुरुवातीस नगरची निजामशाही मोगलापासून वाचवण्यासाठी निजामाचा वजीर मलिकम्बरला बरोबर घेऊन मोगलांचा व विजापूरकरांचा पराभव केला.(भातवडीची लढाईं. नगरपासून १५-२० किमी.). भातवडीच्या लढाईत सासरे लखूजी जाधव विरोधात मोगलांच्या बाजूने लढत होते.!!
शाहाजी नन्तर विजापूर दरबारी गेले. कर्नाटकात गेले. तिकडेच निधन झाले.
शाहाजी भोसले -- पत्नी १. जिजाबाई---->पुत्र १.सम्भाजी (१६२३), २. महाराज !
पत्नी २. तुकाबाई-------> पुत्र व्यंकोजी उर्फ एकोजी राजे (तंजावर शाखा )
पत्नी ३. नरसाबाई----> पुत्र-संताजी.
छत्रपती शिवाजी महाराज
पत्नी १. सगुणाबाई (शिर्के घराणे ) -----> कन्या-- राजकुवर (गणोजी शिर्के यांची पत्नी.)
पत्नी २. सईबाई (नाईक निम्बाळकर यांची कन्या)--> पुत्र --(धर्मवीर)सम्भाजी
-->कन्या- सखूबाई व इतर २
पत्नी ३.सोयराबाई(हंबीर राव मोहितेंची बहीण ) ------>पुत्र ---राजाराम
-----> कन्या- बळीबाई
पत्नी ४.पुतळाबाई (मोहिते घराणे)
पत्नी ५. लक्ष्मीबाइ (विचारे)
पत्नी ६.सकवारबाई (गायकवाड ) -----> कन्या -कमळाबाई
पत्नी ७.काशीबाई ( जाधव घराणे)
पत्नी ८. गुणवन्ताबाई (इंगळे यांची कन्या)
धर्मवीर छ.सम्भाजी महाराज
१६५७-१६८९
मातोश्री -सईबाई पत्नी - येसूबाई. -------> पुत्र --शाहू (१६८२-१७४९)
सम्भाजी महाराजांचा वध झाल्यावर येसूबाई व ७ वर्षाचा शाहू मोगलानी कैद केले. १८ वर्षे म्हणजे औरंगजेब मरेपर्यन्त शाहू कैदेत होता. औरंग्जेब मेल्यावर त्याच्या मुलाने शाहू ला मुक्त केले. तोपर्यंत सोयराबाईचे चिरंजीव व सम्भाजीचे सावत्र भाऊ राजाराम राजे झाले . पुढे औरंग्जेबाच्या त्रासाला कंटाळून राजारामाने जिंजी गाठली व रामचन्द्र अमात्य यांच्या साह्याने मराठेशाही चालवली. राजारामाची पत्नी ताराबाइ हिने सातारा गादी ताब्यात घेतली. पुढे शाहू सुटून आल्यावर शाहू व ताराबाईची लढाई झाली. शाहूने विजय मिळवून सातारा गादी ताब्यात घेतली. व ताराबाईने पन्हाळ्याकडे प्रस्थान केले.
शाहू महाराज
मातोश्री- येसूबाइ , पत्नी १. सकवारबाई
२. सगुणाबाई. -------------------------> शाहू निपुत्रिक होते.
----------------------------------------------------------------------------------
छ. राजाराम
मातोश्री:-सोयराबाई , पत्नी १. ताराबाई (१६७५-१७६१) --------->पुत्र- शिवाजी(१६९६-१७२६)
२.जानकीबाई
३.राजसबाई ------> पुत्र सम्भाजी(१६९८-१७६०)
४.अम्बिकाबाई (सती गेली)
५. सगुणाबाई
राजारामाचा मृत्यु १७०० मध्ये सिंहगडावर झाला. (आता गेल्यावर विपन्नावस्थेतील समाधीचे दर्शन घ्या)
त्यानन्तरही ताराबाईने औरंगजेब मरेपर्यन्त त्याला झुंज देऊन मराठेशाही टिकवली. ताराबाई ८६ वर्षे जगली. पन दुर्दैवाने भाऊबन्दकीने स्वकीयांच्याच कैदेत तिचे बरेच आयुष्य(३५ वर्षे) गेले. सम्भाजी (सावत्रमुलगा) व राजसबाई यानी १७ वर्षे आणि शाहूने १८ वर्षे कैदेत ठेवले.
chhatrapati shivaji maharaj family tree in marathi
व्वा चांगली माहिती. दोन्ही
व्वा चांगली माहिती. दोन्ही शाखांचा वारसा पुढे दत्तकांकडे गेला; तो कोणापासुन हे कलर कोडींगने दाखवता येइल कां?
अरे वा, छान माहिती. हे
अरे वा, छान माहिती.
हे व्यंकोजी राजे पण कलाप्रेमी होते. त्यानी भरतनाट्यम साठी काहि मराठीतून रचना केल्या, असे वाचल्याचे आठवते.
हे पाहून मला फार बरे वाटले.
हे पाहून मला फार बरे वाटले. बरेच दिवसांपासून कुतुहल होते.
एक प्रश्नः या लोकांच्या नावाबरोबर त्यांच्या जन्म्-मृत्यूचे ( निदान अंदाजे तरी ) वर्ष लिहील्यास कळेल की किती वर्षांपूर्वीपर्यंत ह्या घराण्याची माहिती आहे.
थोरले शाहूमहाराज यांनी दत्तक पुत्र घेतला असे ऐकीवात आहे. पण राजाराम-ताराबाई यांचे वंशज पण दत्तक आहेत की मूळचेच भोसले आहेत? त्यातील सर्वात शेवटचे राजाराम महाराज यांचे जन्म मृत्यूचे सन (अंदाजे तरी) माहित आहेत का?
की ते अजून जीवंत आहेत? देव करो नि तसे असो. भारतात जाऊन त्यांचे दर्शन घेण्याची इच्छा आहे.
अरे वा, छान माहिती. केदार नी
अरे वा, छान माहिती.
केदार नी आता ह्यावर सविस्तर लेख लिहिला पाहिजे
छान माहीती , झक्की म्हणतात
छान माहीती , झक्की म्हणतात तसं सनावळी अन फोटो असतील तर सोने पे सुहागा !
हुड, मला वाटते शरिफजी शहाजी
हुड, मला वाटते शरिफजी शहाजी राज्यांचे लहान भाऊ होते. म्हणजे मालोजींचे दुसरे अपत्य. विठोजींना आठ मुलं होतं. संभाजी (लखुजी जाधवरावांनी मारलेला) त्यातला एक आणि अजुन माहित असलेली नावे खेळोजी, परसोजी, मालोजी (दुसरे) आणि मंबाजी.
जमल्यास रेफरंन्सेस तपासुन घ्या. बाकी माहिती छान आहे.
सही जा रे ला है बुवा ! वाह
सही जा रे ला है बुवा ! वाह बुवा वाह !
वैद्यजी, शाहाजी आणि शरीफजी
वैद्यजी, शाहाजी आणि शरीफजी यांची एक कथा अहमदनगरमध्ये प्रसिद्ध आहे. नगरपासून दोन -तीन किमी वर एक दर्गा आहे त्याचे नाव शाह शरीफचा दर्गा.मालोजीना मूलबाळ होत नव्हते म्हणून त्यानी या दर्ग्याला नवस केला होता. मला मूलबाळ झाल्यास तुझे नाव त्याला ठेवीन . पुढे जी दोन मुले झाली त्याचे एकाचे नाव 'शाहाजी' (महाराजांचे पिताश्री) व दुसरे 'शरीफजी'. या निमित्ताने भोसल्यानी त्या दर्ग्यावर नगार्याची नौबत रोज सकाळी वाजवायला सुरुवात केली. औरंगजेब दक्षिणेत आला तेव्हा तो नगरात ठाण मांडून बसला होता. त्याने एक दिवस ही नौबत सकाळी सकाळीच ऐकली. काफिरांचे वाद्य दर्ग्यासमोर पाहून त्याने सन्तापून ती नगारा नौबत बन्द केली. त्यावर शाह शरीफ यानी त्याच्या स्वप्नात जाऊन तू माझी नौबत बन्द केली , आता मी तुझी नौबत इथेच बन्द करतो असे सांगितले (असे म्हणतात). पुढे औरन्गजेब अहमदनगरलाच अल्लाला प्यारा झाला. :). नगर जवळ 'आलमगीर' नावाचे छोटे गाव आताही आहे.
शाह शरीफच्या दर्ग्याच्या मुजावरांशी बोलताना त्यानी अभिमानाने हे भोसल्यांचे कुलदैवत आहे आणि छत्रपती घराण्याकडून त्याना अद्याप वर्षासन येते व भोसले घराण्यातली मंडळी दर्शनालाही येतात असे सांगितले.
वैद्यबुवा, तुमची माहिती बरोबर
वैद्यबुवा, तुमची माहिती बरोबर आहे.त्यात काही भर टाकतो.
ज्ञात इतिहासानुसार भोसल्यांची वंशावळ खालील प्रमाणे.
संभाजी
|
बाबाजी (जन्म १५३०)
|
१)मालोजी
शाहाजी शरीफजी
|
२) विठोजी
|
|
|
| | | | | | | | |
अम्बिकाबाइ १ सम्भाजी २खेलोजी ३ मालोजी ४ कबाजी ५नागोजी६ परसोजी ७त्रिम्बकजी ८ककाजी
हुड सुफी संत शरिफांबद्द्ल
हुड
सुफी संत शरिफांबद्द्ल माहिती होती बाकी ह्या किश्श्याची नव्हती. पुर्वी हे सगळं दृष्टांत, कोप, शाप वगैरे खुप मानलं जायचे त्यामुळे असे बरेच किस्से सापडतील. फार मस्त वाटतं पण मराठ्यांचा इतिहास वाचताना, तीन्ही शाह्या, मोगल ह्यांचा एकंदरित पसारा बघुन(वाचुन) जीव अगदी दडपुन जातो पण मग मराठ्यांनी दिलेली जोरदार टक्कर बघुन अभिमानानी ऊर भरुन येतो. कुरुंदकरांनी म्हंटल्या प्रमाणे, शिवाजी महाराजांच्या काळात त्यांनी बदललेल्या "टॅट्किस" अगदी प्रकर्षानी जाणवतात. शिवाजी महाराजांच्या आधी युद्धात शत्रु पार वेशी पासुन २ कोसांवर आल्यावर राजांना जाग यायची आणि मग युद्ध जिंकलं जरी तरी प्रचंड हानी व्हायची अन त्यानंतर लगेच कोणी चाल करुन आला तर दारुण पराभव निश्चत असायचा! महाराजांनी हा शिररस्ता बदलला. नंतर मराठे अचानक चाल करुन दुसर्यांच्या झोपा ऊडवत होते, मग लुटालुट, जाळपोळ आणि सरवात महत्वाचे म्हणजे दहशत!
वाचायला फार मजा येते.
चम्पकने विचारलेल्या शंकेला
चम्पकने विचारलेल्या शंकेला अनुसरून....
औरंगजेब अहमदनगर येथे १७०७ मध्ये ८९ व्या वर्षी अल्लाला प्यारा झाला. मात्र त्याची कबर खुलदाबाद येथे आहे.
छान माहिती हूड. शिवाजी
छान माहिती हूड.
शिवाजी महारांचा प्रगतीचा काळ वगळल्यास मला तरी मराठ्यांचा इतिहास वाचून फार फ्रस्ट्रेशन येतं. नाही नाही ते राजकारण, छोटे-मोठे स्वार्थ आणि देवधर्मापायी लढाया डुबवल्या कित्येक. संभाजी महाराजांविषयी सुद्धा शेवटी शेवटी वाचवत नाही
मस्त महिती हुड! ताराबाई
मस्त महिती हुड!
ताराबाई
चांगली माहिती हूड्काका
चांगली माहिती हूड्काका !!
सिंडीशी सहमत.
खरय. रा़जांनी मिळवलं तेही
खरय. रा़जांनी मिळवलं तेही नाही टिकवता आलं बाकिच्यांना चांगली माहिती हुड
छान माहिती.
छान माहिती.
चांगली माहिती आहे हुड.
चांगली माहिती आहे हुड.
कोल्हापुरच्या म्युजियममध्ये ताराबाई नंतरचा वंशवृक्ष दिला आहे.
रिपिटेड नाव बघुन काय लक्षात ठेवायच हेच कळत नाही.
चान्गली माहिति नीटपणे
चान्गली माहिति नीटपणे लक्षपूर्वक अभ्यासली पाहिजेल
रॉबीन खास तूझ्यासाठी, हि
रॉबीन खास तूझ्यासाठी,
हि लिंक
ड्रेस्डेन मधला औरंगजेबाचा दरबार. त्याचे वैभव नाही दाखवायचेय. शिवाजी महाराजांबद्द्ल जी मोजकी चार वाक्ये आहेत ती बघ.
http://www.loksatta.com/lokprabha/20100528/mdya-purva.htm
चांगली माहिती. एखादी छान
चांगली माहिती.
एखादी छान लेखमालिका येऊ दे आता यावर. शिवाजी महाराजाचा संभाजी राजाचा इतिहास थोडाफार माहित आहे पण इतर मराठेशाहीबद्दल जास्त माहिती नाही.
पुर्वी हे सगळं दृष्टांत, कोप, शाप वगैरे खुप मानलं जायचे त्यामुळे असे बरेच किस्से सापडतील>>> बुवा, श्रीमान योगीची प्रस्तावना (नरहर कुरूंदकर) यानी लिहिलेली वाचा. त्यामधे राजाने कायम हेरखातं सज्ज ठेवावे आणि हेरांनी आणलेल्या बातम्या "मला देवानी, पिशाचानी भुताखेतानी सांगितल्या, मला हे सर्व वश आहेत" असे प्रजेमधे पसरवावे असे लिहिलेय. ती प्रस्तावना कितीही वेळा वाचली तरी माझे समाधान होत नाही. खास करून "शिवाजी किती छोटा आहे"वाला परिच्छेद!!!
राजारामाचा मृत्यु १७०० मध्ये सिंहगडावर झाला. (आता गेल्यावर विपन्नावस्थेतील समाधीचे दर्शन घ्या)
>>> संगमेश्वरला जिथे संभाजीराजाना मुकर्रब खानाने पकडला, त्या स्मारकाची अवस्था पाहून चीड येते आणि संताप येतो. आणि उगाचच "मुरादे पुरी करणार्या" अफझलखानाच्या समाधीसमोरची फुलाची चादर आणि अगरबत्त्या आठवायला लागतात.
दिनेशदा, ती लिंक छान आहे.
दिनेशदा, ती लिंक छान आहे.
<इतर मराठेशाहीबद्दल जास्त
<इतर मराठेशाहीबद्दल जास्त माहिती नाही. >
तेच बरे आहे.
<शिवाजी महारांचा प्रगतीचा काळ वगळल्यास मला तरी मराठ्यांचा इतिहास वाचून फार फ्रस्ट्रेशन येतं. नाही नाही ते राजकारण, छोटे-मोठे स्वार्थ आणि देवधर्मापायी लढाया डुबवल्या कित्येक. संभाजी महाराजांविषयी सुद्धा शेवटी शेवटी वाचवत नाही>
असे सिंडरेला ने म्हंटले आहे त्याला माझे अनुमोदन.
आता असे वाटते, उगाच वाचले.
त्यापेक्षा फक्त चांगल्या गोष्टी लक्षात ठेवाव्या.
पहिले बाजीराव, राघोभरारी. पेशव्यांचा भारतभर दबदबा होता. रामशास्त्री प्रभुणे अत्यंत उच्च दर्जाचे न्यायाधीश होते. माधवराव पेशव्यांनी पानिपतनंतर मराठेशाही पुनः मोठी केली. त्यांच्या व नारायणारावांच्या निधनानंतर बारभाईंनी कित्येक वर्षे मराठेशाही कशी सांभाळली, वगैरे चांगल्या गोष्टी लक्षात ठेवाव्या. जास्त खोलात शिरले तर उगाच उद्विग्न व्हायला होते.
वाईट गोष्टी आज सर्वत्र दिसताहेतच, आणखी इतिहासातल्या कशाला उकरून काढायच्या!
आणि उगाचच "मुरादे पुरी
आणि उगाचच "मुरादे पुरी करणार्या" अफझलखानाच्या समाधीसमोरची फुलाची चादर आणि अगरबत्त्या आठवायला लागतात. >>> ऑ ! अफझलखान हे जागृत दैवत आहे काय? दुसर्याचा कोथळा बाहेर काढायची मुराद पुरी करायला मदत करत असेल तो.
बाकी रॉबिनहूड, खूप छान माहिती. ताराबाईंनी वृद्धापकाळातील ३५ वर्षं कशी काढली असतील कैदेत
अहो रॉबीनहूड केवढी माहिती आहे
अहो रॉबीनहूड केवढी माहिती आहे तुम्हला ??? ... वाचाता वाचाता दमायला झाले. पण छान माहिती मिळली. खूप धन्स
नंदिनी, मी प्रस्तावना वाचली
नंदिनी, मी प्रस्तावना वाचली आहे.
दिनेशदा, मस्त लिंक. काय जबरदस्त देखावा आहे आणि त्याहुनही आश्चर्य वाटतं ते म्हणजे त्या थाटाचं. काय संपत्ती होती अफाट!!! आता कधी योग आला ड्रेसडेनला जायचा तर आवर्जुन जाणार बघायला. एरवी ही माहिती असायचं काहीच कारण नव्हतं.
चारुदत्त , ही सगळी उसनवारी
चारुदत्त , ही सगळी उसनवारी आहे. फक्त माबो करांच्या सोइसाठी एकत्रित केली आहे...
हूड, >>>>शाहू महाराज मातोश्री
हूड,
>>>>शाहू महाराज
मातोश्री सईबाइ , पत्नी १. सकवारबाई>>>
इथे सईबाईंच्या जागी येसूबाई हवं ना?
अंजली बरोबर आहे तुझे.
अंजली बरोबर आहे तुझे. दुरुस्ती केली आहे. धन्यवाद बुवा.
हुड, खाली शाहु महाराजांच्या
हुड, खाली शाहु महाराजांच्या माहिती मध्ये सुद्धा सईबाईच लिहीलय.
एका कर्तबगार पुरूषाच्या
एका कर्तबगार पुरूषाच्या पुढच्या पिढ्या आपापसात लढून नाहीश्या झाल्या..
दुसरं काय?
Pages