मायबोलीच्या/नेटवरच्या ओळखीतून उभे केलेले पैसे आणि त्याचा योग्य तो उपयोग
नुकताच एका मराठी वेबसाईटवर अनेक सभासदांना वाईट अनुभव आल्याचे कळाले. एका व्यक्तीने विश्वास संपादून अनेक जणांकडून वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे घेतले आणि ते परत करण्याबद्दल गोंधळ झाला. हे कितपत खरे खोटे होते ते माहीती नाही. पण हे कसे घडले, का घडले हे नक्कीच लक्षात घेण्यासारखे आहे आणि हे कुठल्याही वेबसाईटवर घडू शकते. पण इथे मायबोलीवर होऊ नये म्हणून आपण त्यातून काही शिकण्यासारखे नक्कीच आहे. आमची तुम्हाला विनंती आहे की व्यक्ती कोण आहे याबद्दल चर्चा न करता असे काही इथे झाले तर आपल्याला काय करता येईल याबद्दल बोलूया.
आमच्या माहितीप्रमाणे हा प्रकार काही महिने चालू होता. वेगवेगळ्या कारणासाठी पैसे मागितले गेले, काहीजणांना गुंतवणूक म्हणून मागितले गेले. पण मराठी माणसाची भीड म्हणा, त्या व्यक्तिबद्दल असलेला आदर म्हणा ज्यांचे पैसे अडकले होते ते कुणीच एकमेकांशी किंवा जाहिर बोलले नाही आणि त्यामुळे प्रकार उघडकीला यायला बराच वेळ लागला.
सर्व मायबोलीकरांनी पैशाचे कुठलेही व्यवहार करतांना पूर्ण ती काळजी घ्यावी. मायबोलीकर पटकन एकमेकांवर विश्वास टाकतात असे वातावरण आपण सगळ्यानी निर्माण केले आहे. पण एखादी व्यक्ती त्याचा गैरफायदा घेऊ शकते. त्यामुळे पैशाच्या बाबतीत मायबोलीकर व्यक्ती असली तरी तिर्हाईत व्यक्तीबद्दल जी काळजी घेऊ ती इथेही घेणे चांगले.
मायबोली ही एक वेगळी संस्था आहे आणि तिला वेगळे कायदेशीर अस्तित्व आहे. "नफा मिळवणारी संस्था" ( For profit) म्हणून तिची नोंदणी झाली आहे. त्यामुळे मायबोलीच्या मदतीसाठी म्हणून आपण कधीच पैसे गोळा करत नाही. खरेदी विभाग, जाहिराती , रंगिबेरंगी जागा यातून मिळणार्या उत्पन्नावर मायबोलीचे कामकाज चालते. त्यामुळे मायबोलीच्या मदतीसाठी म्हणून परस्पर कधी कुणि पैसे उभे करत असेल तर काहीतरी योग्य नाही हे कळायला मदत व्हावी.
काही उपक्रमापुरते आपण पैसे गोळा करतो. उदा. T-Shirt विक्री. यात मायबोली प्रशासन कुठेही मुद्दाम नसते. आणि तो उपक्रम पूर्ण झाल्यावर जाहीरपणे आपण हिशेब जाहिर करतो. आणि त्याचा लगेच उपयोग केला जातो. एखाद्या उपक्रमापुरते आपण दुसर्या सेवाभावी संस्थेला पैसे उभे करून देतो तेंव्हाही सभासदांकडून थेट संस्थेला कसे दिले जातील हे पाहिले जाते.
गेल्या काही महिन्यांपासून आपण मराठी उद्योजक या ग्रूपमधे, कुणाला उद्योगासाठी भांडवल उभे करायचे असेल तर करता यावे म्हणून प्रोत्साहन दिले होते. हे सगळे "व्यवहार" आहेत हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. इथे कृपया भावनेच्या आहारी जाऊ नका. योग्य तो तपास करूनच पैसे गुंतवा. हा गुंतवणूकदार आणि उद्योजक यांच्यातला व्यवहार असेल मायबोलीचा, किंवा मायबोली प्रशासनाचा याच्याशी काही संबंध नसेल.
थोडक्यात मायबोलीकर असो वा मायबोली असो, पैशाचा व्यवहार करताना जपून करा.
चांगली पोस्ट. पन्नाला
चांगली पोस्ट.
पन्नाला अनुमोदन..
वरील सगळ्यांनाच अनुमोदन.
वरील सगळ्यांनाच अनुमोदन.
धन्यवाद, अगदी समयोचित इशारा
धन्यवाद, अगदी समयोचित इशारा आहे.
Pages