काय रे देवा... पुन्हा सारेगमप (विडंबन)
ज्यांना ही कविता ईमेलने आपल्या मित्रमंडळींना पाठवायची आहे.. त्यांनी कृपया पीडीएफ चा वापर करावा...
प्रेरणा : संदिप खरेची कविता काय रे देवा...
आता पुन्हा सारेगमप येणार
मग पल्लवीच्या जुन्या थोबाडावर जुनेच हसू फुटणार
मग अवधूत जुन्याच स्टाईल्स नव्याने मांडणार
मग जुनेच स्पर्धक येउन नव्याने बोअर करणार
मग माझी चिडचिड होणार
काय रे देवा....
पण ती चिडचिड कोणाला दाखवता नाही येणार
मग मी ती लपविणार
पण लपवूनही कुणालातरी कळावं अस वाटणार
मग मी माबोवर विडंबन लिहीणार
मग त्याची रिक्षा फिरविणार
मग काही लोक हसणार
काही नाक मुरडणार
मग नसतंच लिहिलं विडंबन तर चाललं असतं असं वाटणार
आणि ह्या सगळ्याशी ’झी’ला काहीच घेणं देणं नसणार....
काय रे देवा....
मग नेमका त्याच वेळी बायको टीवी चालू करणार
मग त्यावर सारेगमप लागलेलं असणार
पल्लवीने लाल साडी आणि निळं ब्लाऊज घातलेलं असणार
मग जुनाच स्पर्धक येऊन जुनेच गाणे म्हणणार
मग जुनेच परीक्षक मधात बुडवलेल्या, साखरेत घोळवलेल्या कॉमेन्ट्स देणार
मग पल्लवी ’एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत’ म्हणणार
मग माझे डोके उठणार
मग मीही टिव्हीपुढून उठणार
काय रे देवा...
मग मायबोलीवर कोण चांगलं... कोण वाईट चर्चा घडणार
मग कुणी साड्यांविषयी बोलणार तर कुणी गाण्यांविषयी बोलणार
मग त्यात भांडणे होणार
मग त्यासाठी १० सेमी बाय १० सेमी बाफ अपुरा पडणार
मग विपुत भांडावसं वाटणार
आपलेच कसं बरोबर हे सारे हिरिरीने पटवत जाणार
मग भांडण कसं गाण्यासारखं उत्कट उत्कट होत जाणार
हळूहळू बाफ मग थंड होत जाणार
पण बंद नाही पडणार
काय रे देवा....
पण स्पर्धा सुरुच रहाणार
मूर्ख लोक एस.एम.एस पाठवत रहाणार
आपणही शिव्या घालत पहात रहाणार
मग आपलं मन आता पुन्हा पहायचे नाही असं ठरवणार
पण त्याला ते नाही जमणार
मग ते ’आलिया भोगासी...’ म्हणणार
समोर तीच ती गाणी सुरुच असणार
रोज नवनवीन परीक्षक येणार
कुणी ’पण पण’ करणार, कुणी ’फुणफुण’ करणार
कुनी तोडलंस म्हणणार, कुणी फोडलंस म्हणणार
कुणी स्वत:ला शहाणे समजत फालतू उपमा देणार
कुणी गाणे सोडून इतर गोष्टींवर तासभर निरूपण करणार
दर आठवड्याला एक.. एक.. स्पर्धक एलिमिनेट होत जाणार
दर वेळी तीच ती रडारड होणार
जोरदार टाळ्या मात्र चालूच रहाणार
काय रे देवा...
अशातच मेगा फायनल येणार
त्याआधी कॉलबॅकच नाटक होणार
मग तीन जण फायनलला असणार
मग त्यात एक ’झी’चं लाडकं व्यक्तिमत्व असणार
मग त्यात एक हिंदी भाषिक असणार
मग स्टेजवरून पुन्हा त्याच त्याच जुन्या गाण्यांचे दळण दळणार
मग अतुल परचुरे स्टेजखालून आचरट चाळे करून वात आणणार
मग मारून मुटकून जमवलेले मान्यवर मारून मुटुकून प्रतिक्रीया देणार
’झी’ची तोंड फाटेस्तोवर स्तुती करणार
मग ताणूण ताणून दमले की एकदाचा निकाल लागणार
’झी’ चे लाडके व्यक्तिमत्व जिंकणार
’निक्काल’ बहुतेकांना अपेक्षितच असणार
मग एकदाचा हा ’जाच’ थोड्या काळासाठी संपणार
सारेगमप गेल्या वर्षी होतं
सारेगमप ह्या वर्षी आहे
सारेगमप पुढच्या वर्षीही असणार
काय रे देवा...
~मिलिंद छत्रे
(टीप : कविता कॉपी करून फॉरवर्ड करायची असल्यास कृपया पीडीफ वापरावी किंवा नावासकट कॉपी करावी ही विनंती)
मग भांडण कसं गाण्यासारखं
मग भांडण कसं गाण्यासारखं उत्कट उत्कट होत जाणार>>
मस्त रे मिल्या. सारेगपम बाफवर रिक्षा फिरव ह्याची
(No subject)
आता पुरे देवा.... म्हणायची
आता पुरे देवा.... म्हणायची वेळ आलिय...
मिल्या... हे विडंबन नक्कीच कुठल्यातरी मालिकेतील कुठलेतरी पाहुणे सारेगमच्या कुठल्यातरी एपिसोडात वाचून दाखवतिल... त्यामुळे तुला सगळे ए-P-सोड बघावेच लागतिल.... बा. हु. वरून
सही रे. अगदी पूर्ण विडंबनाला
सही रे. अगदी पूर्ण विडंबनाला मोठ्ठं ताट भरून मोदक
'झी' कडे पाठव हे. जरा आम्हां प्रेक्षकांच्या भावनाही कळू देत त्यांना.
मस्तच...
मस्तच...
मग भांडण कसं गाण्यासारखं
मग भांडण कसं गाण्यासारखं उत्कट उत्कट होत जाणार
झक्कास....
प्लीज हे कुणीतरी पेपरात
प्लीज हे कुणीतरी पेपरात पाठवा. सारेगम टीमलाही वाचायची संधी मिळु द्या.
जबरी...... सही आहे
जबरी...... सही आहे
एएएएक नंब्ब्बर!
एएएएक नंब्ब्बर!
हसून हसून मुरकुंडी वळली.
हसून हसून मुरकुंडी वळली. (अगदी ३६० अंशात!!)
सही रे मिल्या...
सही रे मिल्या...
पण स्पर्धा सुरुच रहाणार मूर्ख
पण स्पर्धा सुरुच रहाणार
मूर्ख लोक एस.एम.एस पाठवत रहाणार >>> अगदी अगदी! मूर्ख लोक एस.एम.एस पाठवत राहतात म्हणून तर त्यांना पुन:पुन्हा वाहत्या गंगेत हात धुवून घ्यावेसे वाटतात.
एकदम जबरी!!!!
एकदम जबरी!!!!
(No subject)
झक्कास रे मिल्या!! भांडण
झक्कास रे मिल्या!!
भांडण कसं गाण्यासारखं उत्कट उत्कट होत जाणार>> वेळी तीच ती रडारड होणार
जोरदार टाळ्या मात्र चालूच रहाणार >>
झी ला पाठवा खरच!
माझ्याच मनातल्या भावना
माझ्याच मनातल्या भावना मिल्याने शब्दबद्ध केल्यात.
ह्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.
लई भारी !!!!!!!!!!! हे झी ला
लई भारी !!!!!!!!!!! हे झी ला पाठवा....
किंवा पेपरात तरी द्या...
झकास रे मिल्या!!!
झकास रे मिल्या!!!
कुणीतरी इ मेल चेन सुरु करा,
कुणीतरी इ मेल चेन सुरु करा, आपोआप झी पर्यंत पोहचेल.
मिल्या, आता हे काव्य नक्की
मिल्या, आता हे काव्य नक्की (तुझ्या नावाशिवाय) इमेलींतून फिरणार!
एकदम झकास! मूर्ख लोक एस.एम.एस
एकदम झकास!
मूर्ख लोक एस.एम.एस पाठवत रहाणार >>>
झक्कास... प्रत्येक ओळीला
झक्कास... प्रत्येक ओळीला १०००% अनुमोदन
झी वाल्यांका सांगाक व्हयो.. शिरा पडो तेंच्या.....
प्लीज हे कुणीतरी पेपरात
प्लीज हे कुणीतरी पेपरात पाठवा>> खरंच पाठवा
मिल्यासाठी एकदा जोरदार
मिल्यासाठी एकदा जोरदार टाळ्या... पेपरात पाठव रे. पूनम, सकाळ मधे येउदे.
मिल्या हे आधी इथून काढ . आणि
मिल्या हे आधी इथून काढ . आणि तुझ्या नावासकट पीडिएफ कर लगेच. अत्त्ताच दिसतंय की ही कविता हजारो लोक ब्लॉग अन मेल्स मधे (ढापून) टाकणार आहेत
जबरी लिहिलय मिल्या. टू
जबरी लिहिलय मिल्या. टू मच!!!
मिल्या हे आधी इथून काढ . आणि तुझ्या नावासकट पीडिएफ कर लगेच. अत्त्ताच दिसतंय की ही कविता हजारो लोक ब्लॉग अन मेल्स मधे (ढापून) टाकणार आहेत स्मित >> हे मात्र अगदी खरं!!
जबर्या. आणि मैत्रेयीच्या
जबर्या. आणि मैत्रेयीच्या बोलण्याला अनुमोदन वगैरे....
हे सगळीकडे फिरणार...
(मी आत्ताच लिंक दिली मैत्रीणीला एका )
मस्तच
मस्तच
ह ह ग लो... तोडलस मित्रा
ह ह ग लो... तोडलस मित्रा
आत्ताच वाचलं हे......... वरचा
आत्ताच वाचलं हे......... वरचा "सा":)
Pages