डीसी गटग : धृतराष्ट्राच्या पट्टीमागून
मला डीसी गटग ला जाता आले नाही. पण संजयाच्या दिव्यदृष्टीमुळे मला बसल्या जागेहून हे गटग बघता आले. तर या "महाग गटगचा" हा चक्षुर्वैसत्यम (संजयाचे चक्षू) वृत्तांत. गटगला प्रत्यक्ष न जाताही अहवाल लिहण्याचा उत्साह, अपराध आणि पायंडा मी पहिल्यादाच पाडला असावा. द्विरुक्तिचा मोह टाळून इतर वृत्तांतात आलं नाही, ते सांगायचा प्रयत्न करतो.
इती धृतराष्ट्र.
संजय उवाचः
गटगला सुरवात झालेली आहे. मंडळी जमली आहेत. फुटकळ खाणे, पेय पान सुरु आहे. गप्पा रंगायला लागल्या आहेत.
पांढरा रस्सा, कसा काय कुणास ठाऊक पण वेबमास्तरांना सगळ्यात आधी मिळाला. त्यामुळे साहजिकच काही जणांच्या पोटात आधीच दुखायला लागले. काही जणांच्या पोटात तो रस्सा गेल्यावर, थोड्या वेळाने दुखले ते वेगळे.
तांबडा रस्सा केलेला नाहीये. कारण पांढरा रस्सा वाढून घेऊन त्याला "ओबामा ओबामा" असे म्हटले की तो रागाने तांबडा होतोय. त्यामुळे ज्याला जो हवा तो रस्सा उपलब्ध आहे. अशा रितीने "एकाच रश्शात दोन तुकडे" म्हणजे काय याचा एक वेगळाच अनुभव इथे आपल्याला येतोय.
डिसी गटगची मराठी सारस्वताला नवीन देणगी. मराठी भाषेत एका नवीन म्हणीची सुरुवात.
मायबोलीकरांचे जेवण संपून आता विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सुरु होतोय. मायबोलीवरची पुढची पिढीही आता तयार होते आहे. काही जण नुकतेच कुठे प्रयत्न करत आहेत. पण या वयातही अस्सल मायबोलीकर असण्याची चुणुक दिसते आहे.
तर काही जण फार पुढे गेले आहेत. रोमात राहूनही या बालकांनी मायबोलीवरचे डावपेच पक्के ओळखले आहेत आणि ते डावपेच प्रत्यक्षात आणायला सुरुवात केली आहे.
आणि त्यातले काही तर फार फार पोचले आहेत इतके की मोठ्यांनाही अचंबा वाटावा..
मायबोलीचं आणि मायबोलीकरांचं भवितव्य उज्ज्वल आहे या शंका नाही.
नंतर पहिल्या दिवशी बाकी काय झालं हे इतर वृत्तांतात आलंच आहे. दुसर्या दिवशी काही मायबोलीकर अॅडमीनबरोबर डीसी शहरात गेले. तिथल्या राजकारणात त्यांनी सक्रीय भाग घेतल्याचे तुम्ही सगळ्यांनी टेलीव्हीजनवरच्या बातम्यात पाहिलेच असेल.
इती संजय.
धृतराष्ट्र उवाचः
अशा रितीने " काय सांगू राजे, मन ओळखले तुम्ही माझे" असे म्हणत डीसीला आलेले मायबोलीकर,
"अनंत हस्ते अंदूरकराने, देता किती घेशील दो कराने" म्हणत सुखाने आपआपल्या शहराकडे प्रस्थान करते झाले.
इती.
(No subject)
एकही टाळी न वाजवुन
एकही टाळी न वाजवुन अनुल्लेखानं मारायचं! :D:
आयला माझा डायलॉग ह्याला कोणी
आयला माझा डायलॉग ह्याला कोणी सांगितला रे..
धमाल वृतांत रे.
(No subject)
धमाल वृ.
धमाल वृ.
*
*
मझा आ गया.
मझा आ गया.
सही आहे वृत्तांत... मस्त मजा
साज्या, नीट बघ. शेवटच्या चित्रात 'देवनागरीत लिहा' म्हणणारे झक्की आहेत.
झकास वृतांत... अगदी बरोबर
झकास वृतांत...

अगदी बरोबर फच्या, ते झक्कीच आहेत.
जबरदस्त! ह ह पु वा
जबरदस्त! ह ह पु वा
जबरी
जबरी
शॉलेट... पण किल्लेदार रिक्षा
शॉलेट...
पण किल्लेदार रिक्षा राहीली... की तिला अन्नुल्लेखाने मारायचा प्लॅन...
सही विपुत सुसु
सही

विपुत सुसु
जबरा
जबरा
(No subject)
सॉल्लीड! ह ह पु वा
सॉल्लीड! ह ह पु वा
(No subject)
डिसीतला मोर्चा लय भारी. लहान
डिसीतला मोर्चा लय भारी. लहान मुलांची चित्र आणि संवाद दोन्ही भारी
(No subject)
१ नंबर
१ नंबर
सगळीच व्यंगचित्र आवडली.
ऑस्सम.
मोर्चा सहीच!
विपुत सुसु
विपुत सुसु
चित्रं मात्र लई भारी आहेत..
चित्रं मात्र लई भारी आहेत.. बटाट्याच्या चाळीतली वसंत सरवटेंची चित्रं वाटतात... बटाट्याच्या चाळीत अॅडेन्डम म्हणुन हा सगळा लेख आणि चित्रे टाकली तर लोक पुलंचाच लेख समजून वाचतील.
सही आहे! बेष्ट एकदम !!
सही आहे! बेष्ट एकदम !!
किती सुन्दर चित्रे !!
किती सुन्दर चित्रे !!
(No subject)
धम्माल आहे!
धम्माल आहे!
संजय, ध्रुतराष्ट्र यांचा
संजय, ध्रुतराष्ट्र यांचा उल्लेख सुरुवातीला वाचुन असं वाटुन गेलं की डीसीत कुरुक्षेत्र तर अवतरलं नव्हतं ना?
भिष्माचार्य उपस्थीत होते असं वाचण्यात आलं.

Pages