ट्रेक टू किल्ले माहुली .

Submitted by ek kalandar on 7 April, 2010 - 10:33

1.jpg2.jpg3.jpg4.jpg

किरण with मिरची-सलाड
5.jpg8.jpg11.jpg12.jpg18.jpg19.jpg20.jpg21.jpg22.jpg

एक कलंदर
23.jpg24.jpg25.jpg

गुलमोहर: 

छान आहे ट्रेक्..पण थोडी माहिती टाक प्रत्येक फोटोखाली..म्हणजे त्या फोटोंना अर्थ प्राप्त होईल. आणी कळेल कि तू चहाबरोबर मिर्च्या खात बसलायस कि अजून काही Happy

मित्रा.. माहुली किल्ल्यावरचे फोटो पण हवे होते.. तुम्ही पण रात्री जाउन राहिला होता का.. तिथे पायथ्याशी महादेवाचे मस्त मंदीर आहे जिथे झोपण्याची आरामात सोय होउ शकते.. नि पहाटे चढायला घ्यायच..
मी तिघाचौघांसोबत मार्चच्या पहिल्या आठवड्यात गेलो होतो.. ज्याला ट्रेक करायचा आहे पण अनुभव नाही तर हा माहुली ट्रेक करावा.. पण पावसाळा वा थंडीत करावा..बेस्ट सिझन !
इथुन दिसणारे नवरा नवरी नि भटोबा खासच..

(नवरा , नवरी नि मध्ये भटोबा)
-----------------------------------------------------------
पायथ्यापासुन वर जाईस्तोवर २ तास लागतात.. वरती शेवटच्या टप्प्यात शिडी लावली आहे..

-----------------------------------------------
वरती गेल्यावर एखाद दुसरे पाण्याचे टाके लागते.. नि वाट थोडी खाली उतरते जिथे झाडाखाली छप्पर नसलेले शिवलिंग आहे.. खुप छान जागा.. पण असे आहे ना.. इथे पायथ्यापर्यंत रस्त्यांचे डांबरीकरण झालेय.. त्यात एसटी पण येतात.. त्यामुळे साहाजिकच लोकांची वर्दळ असते.. त्यात बिनडोक लोक केवळ मौजमज्जा मारायला येतात.. नि परिसराची वाट लावुन टाकतात.. इकडे नेमके हेच दिसुन आले.. खुप दुर्गंधी पसरली आहे तिथे.. कोंबड्याची पिसे त्या शिवलिंगाजवळच पडलेली होती.. Sad तर जेवणासाठी वापरणारे प्लॅस्टीक प्लेटसचा तर खच पडला होता.. एक ट्रक जरी वरती नेला तरी तो कमी पडेल कचरा घेउन जायला.. Sad इथे जो मुख्य दरवाजा आहे.. तिथे गटारासारखे डबके तयार झालेय.. तरीपण त्या डब्यक्यासमोरच असलेल्या गुहेत बसुन काहिजण खात होते.. जिथे बसणे कठीण होते तिथे खाणे तर सोडाच..
बाकी इथला मोडकळीस आलेला मुख्य दरवाजा मस्त आहे.. नैसर्गिक भिंतीचा वापर छानप्रकारे केलाय.. त्यातील काही फोटु..

---------------------------------------------------------

(हे एक छानसे बघायला मिळाले)
================

(हा किल्ल्याचा दरवाजा.. नीट पाहिले तर कचरा दिसतोय बघा फोटुत Sad )
-----------------------------------------------------

नैसर्गिक भिंतीचा वापर करुन बांधलेल्या बुरुजांमध्ये लपलेला दरवाजा.. रक्तरंजित इतिहास असलेल्या या ऐतिहासिक जागेची दुरावस्था खंत करणारी आहे )
==========================
या दरवाज्यातुन खाली उतरण्यास वा आत शिरण्यास अतिशय अवघड वाट असावी.. ज्याचा अंदाज खालील फोटोवरुन येतो..

(काय युक्ती वापरली असेल तेव्हा.. )
बाकी इथे विशेष बघण्यासारखे काही नाही.. इथुनच भंडारगड नि पळसगड हे त्याच डोंगरावर वसलेले गड आहेत.. पावसाळ्यात इथे लोक्स पिकनिक स्पॉट म्हणुन येतात.. कारण फेसाळणारे धबधबे !
मी गेल्या मार्च महिन्यात गेलो.. उकाड्याचा त्रास झाला.. पण झाडांची पानगळती, पक्ष्यांचे गुंजन अनुभवता आले.. बर्ड वॉचिंगची आवड असणार्‍यांनी या मोसमात किल्ल्याला जरुर भेट द्यावी Happy

यो, माहुलीला गावातलीच लोकं खालून कोंबडी घेऊन येतात(जिवंत) व तिथेच तिचे अंत्यसंस्कार करून नंतर मौजमजा करुन जातात. निदान खरे ट्रेकर्स आपल्याबरोबर कचरा तरी घेऊन जातात.