खजूर (साधारण ५० ), बडीशेप दोन टेबलस्पून, हिरवी वेलची आठ ते दहा, दालचिनी एक इंच, चिकनी सुपारी दोन, एखादी लवंग, ठंडक , अर्धा टिस्पून (पानवाल्याकडे मिळते ), सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या (यापण सुकामेवा वाल्याकडे मिळतात, वगळल्या तरी चालतील ) दोन टेवलस्पून. गुलाबपाणी लागेल तसे, काथ अर्धा टिस्पून, थोडासा केवडा इसेन्स. बदामाचा चुरा, एक टिस्पून.
खजूराला उभी चिर देऊन, त्यातली बी काढावी.
मग तो गुलाबपाण्यात भिजत घालावा. (फार मऊ असेल तर नको )
बडिशेप, वेलची दाणे, दालचिनि व लवंग किंचीत गरम करुन पुड करुन घ्यावी.
गुलावाच्या पाकळ्या पण मिक्सरमधून बारीक करुन घ्याव्या. चिकनी सुपारी व काताची पूड करुन घ्यावी.
त्यात ठंडक, बदाम पूड व थोडा केवडा इसेन्स घालून मिश्रण भिजवून घ्यावे. ओलसर होईल इतके गुलाबपाणी घालावे. (हवीच असेल तर थोडि साखर घालावी, पण खजूराच्या गोडव्यामूळे गरज नाही)
मग हे मिश्रण, खजूरात भरावे.
(बाजारात जो मिळतो, त्याला वर्ख लावलेला असतो. पण शूद्ध चांदीच्या वर्खाची कृति लक्षात घेता तो वापरु नये असे मला वाटते, आणि बाजारात बहुदा अल्यूमिनियम वा तत्सम धातूचा असतो, तो तर आजिबात वापरु नये.)
हे खजूर साधारण सूकेपर्यंत, व नंतरही फ्रिजमधे ठेवावेत (म्हणजे स्वाद टिकतो )
हा सर्व प्रकार करायला कठिण वाटत असेल, तर खजूराचे बारिक तूकडे करून सगळे एकत्र करावे, वा आणखी बारिक करुन , त्याच्या छोट्या गोळ्या कराव्यात.
हा मसाला साधारण आवडीचा आहे. यात आपल्या चवीप्रमाणे बदल करत येतील.
सहीच, ह्या विकांताला बघते
सहीच, ह्या विकांताला बघते करुन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दिनेश, ठंडक काय असते. कुंडीत
दिनेश, ठंडक काय असते.
कुंडीत बडीशोपेची २ रोपे उतरली होती. दाणे छान सुकली आहे आता, तीच वापरते.
[ करायचा नाही पण हे सगळे सामान आणायचा कंटाळा येतो
]
पान सुपारीचे घाऊक विक्रेते
पान सुपारीचे घाऊक विक्रेते असतात त्यांच्याकडे याच नावाने मिळते. साखरेसारखे दिसते. ते तोंडात घातल्यावर थंड थंड वाटते (म्हणून हे नाव ) त्याच्याजागी, पांढर्या पेपरमिंट्च्या गोळ्या असतात, त्याची पावडर करुन पण वापरता येईल.
आस्मंतारा पण म्हणतात ठंडक ला.
आस्मंतारा पण म्हणतात ठंडक ला. दिनेशदा, वेगळा प्रकार सांगितल्याबद्दल धन्यवाद. सामान आणणे (मिळणे) जिकरीचे काम आहे पण.
वत्सला पानसुपारीच्या घाऊक
वत्सला पानसुपारीच्या घाऊक विक्रेत्या कडे हे सामान मिळेल.
ठंडक/ ठंडाई म्हणजे मेंथॉल क्रिस्टल्स. ते असे दिसतात
त्याची बाटली अशी दिसते
![methol crystals chi batli.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u10863/methol%20crystals%20chi%20batli.jpg)