Submitted by mitthu on 2 April, 2010 - 01:47
एक होती चिऊ, एक होता काऊ
एक होती चिऊ, एक होता काऊ
म्हणाले सोबत बाजाराला जाऊ
चिऊ नि घेतल्या पिशव्या दोन
म्हणाली आणखिन येताय कोण
काऊ नी काढली गाडी लगेच
म्हणाला आपण जाउया दोघेच
पोचले दोघे पण बाजारात
ऐकून भाव पडले विचारात
काऊ ला तर फूटला लगेच घाम
येवढ्याश्या भाजिला क इतका दाम
चिऊ नि घेतला पावभर भोपळा
खिसा झाला लगेच मोकळा
काऊ नि घेतले भरताचे वांगे
म्हणाला खायिल सर्वांन सन्गे
चिऊ ने मग विचारला बटाट्याचा भाव
म्हणाली पावभरच तुम्हि द्या राव
काऊ नि घेतले काकडी आणी मुळे
म्हणाला कोशिंबीर चांगली जुळेल
परतिला दोघे निघले मग
चिऊ म्हणाली थकले बघ
म्हणाला काऊ घेउ उसाचा रस
नाही तर घेउया सरबत खस
दोघेही पोचले वापस घरी
म्हणाले मजा आली खरी
एक होती चिऊ, एक होता काऊ
म्हणाले सोबत बाजाराला जाऊ
गुलमोहर:
शेअर करा
छान आहे. काही ठिकाणी मीटर
छान आहे. काही ठिकाणी मीटर हलले. पण कवितेतली सहजता मस्त.
अरे वा मस्तच...
अरे वा मस्तच...
छान.
छान.
छान !
छान !
चिऊ काऊ छान ! पक्षीच पक्षी!
चिऊ काऊ छान ! पक्षीच पक्षी!