खिचडीसाठी:
३वाट्या तांदुळ - हा जाडच असावा. एकवेळ कोलम चालतो...पण बासमती...अजिबात नाही.
१वाटी दाळ- तुरीचीच असावी.
फोडणीला:
कांदा २ मध्यम आकाराचे बारीक चिरुन,
लसुण (जरा वेगळी हवी असल्यास फक्त लसुण ठेचुन घ्यावा),
बाकी हिंग, हळद, वगैरे सर्व, लाल तिखट, मसाल्याची हवी असल्यास काळा मसाला पावडर- १ छोटा चमचा
आणि हो....खिचडी कुकरला लावण्यापेक्षा पातेल्यात करावी (स्टीलचे नाही),छान मोकळी होते.
फोडणी देण्याआधी तुरीची दाळ बोटचेपी शिजवुन घ्यावी, त्यात पाणीही थोडे राहु द्यावे तेच पूर्ण खिचडी शिजायला कामात येते. (कूकरमधे होत नाही)
तेलात जिरेमोहरीची फोडणी देउन कांदे, लसुण, शेंगदाणे, हळद, हिंग, मीठ, लाल तिखट टाकावे. कांदा छान नरम झाला की आधी तांदुळ धुउन फोडणीत टाकावे..छान परतुन घ्यावे ..इतके की पातेल्याला चिकटतात. मग वरुन तुरीची दाळ +तीचेच पाणी वरुन ओतावे. सर्व एकत्र निट कालवुन मिश्रणाच्या एक बोटभर पाणी वर राहील इतके पाणी हवे. आता गॅस जोरात करुन झाकण न ठेवता पाणी थोडे आटु द्यावे (आम्ही ही अर्धवट कच्ची पक्की खिचडी +तिचे पाणी असेही ताटलीत घेउन खायचो). खिचडी थोडी आसट असतांना चिरलेली कोथिंबिर त्यात व्यवस्थित कालवुन वरुन घट्ट झाकण लावावे. पाच मिनिटात खिचडी शिजते...(या खिचडीच्या खरड साठी आमच्याकडे भांडणे होतात). आता गॅसवरच खाली तवा ठेउन पातेले त्यावर ठेवावे.गॅस मंद असावा म्हणजे खालची खरडही नंतर व्यवस्थित निघते.
(आम्ही ही अर्धवट कच्ची पक्की
(आम्ही ही अर्धवट कच्ची पक्की खिचडी +तिचे पाणी असेही ताटलीत घेउन खायचो).
...(या खिचडीच्या खरड साठी आमच्याकडे भांडणे होतात). अगदि आजहि.....................
ह्याला खानदेशात फोडणीची खिचडी
ह्याला खानदेशात फोडणीची खिचडी म्हणतात.
आई आलं लसूण आणि खोबरं कुटून टाकते.
खिचडीबरोबर पापड आणि हाताने फोडलेला कांदा....आताच तोंडाला पाणी सुटलय...
ही आत्ता मिनोतीने टाकली होती
ही आत्ता मिनोतीने टाकली होती ना ?
मिनोतीनं चटणीची कृती टाकली
मिनोतीनं चटणीची कृती टाकली आहे ना सिंडरेला?
छान आहे ही खिचडीची कृती.. माझी एक मैतरिण करायची अशी खिचडी.. यम्मी!