व्यंगचित्र

Submitted by भाऊ नमसकर on 29 March, 2010 - 11:13

untitled1-1.JPG
तुला आपल्या पक्षाच्या बैठकीला पाठवलं, तर परत आल्यावर कविता वाचत बसतोस आणि काल साहित्य संमेलनास जाऊन आलास, तर मला आतां राजकारणाचे डावपेंच शिकवतोयस !

गुलमोहर: 

भाऊ नमस्कार मस्त काढलयं.
दोघाची तोंड जरा जास्तचं जवळ आल्यासारखी वाटतात Proud Light 1

धन्यवाद.
खरंय तुमचं. एमएस ऑफिसच्या "पेंट"मधे "माऊस" वापरून पूर्ण स्क्रीनवर हें काढलंय; आकार लहान करताना याचं भान राहिलं नाही.

मानुषीजी,
धन्यवाद.
"कॅरिकेचर"ला मराठीत सर्वसाधारणपणे अर्कचित्र म्हणतात. त्यांत, एखाद्या सर्वपरिचीत व्यक्तीच्या
वैशिष्ठ्यांना खूपच उठावदार करून कांहीसं हास्यास्पद रूप दिलं जातं. व्यंगचित्रात मुख्यतः भर
कल्पनिक पात्रं, प्रसंग वापरून विनोदनिर्मिती करण्यावर असतो. [ तसा तो होतोच असं नाही, हे माझ्याच
व्यंगचित्रकारितेवरून मी सांगू शकतो !]

प्रकाशजी, छायाजी,
"व्यंगचित्रं" हे माझं पहीलं प्रेम आहे; तुमच्या प्रतिसादामुळे मला उगीचच तें एकतर्फी नसावं असा भास होतो ! धन्यवाद.