Submitted by मृण्मयी on 2 March, 2010 - 17:10
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
वाटीभर वाळके टोमॅटो. (कॅलिफोर्निया सनड्राइड टोमॅटोचे काप वापरले.)
मोठा चमचाभर मोहरीगर
१ चमचा तिखट
चवीप्रमाणे मीठ
मोहरीगराऐवजी (किंवा बरोबर) एक मोठा चमचा कैरी लोणच्याचा तयार मसाला.
वाटीभर किसलेला गूळ.
अर्धी (किंवा पाव) वाटी तेल
लहान चमचा मोहरी
एक लहान चमचा बडीशेप
हिंग
क्रमवार पाककृती:
तेल कढवून घ्यावं. ह्यात मोहरी, बडीशेप तडतडवून हिंग घालावा.
एका भांड्यात टोमॅटोचे काप घेऊन त्यात तिखट, गूळ, मसाले, मीठ एकत्र करावं.
तेल कडकडीत गरम असतानाच टोमॅटॉच्या कापट्यांवर ओतून नीट कालवून घ्यावं.
वाढणी/प्रमाण:
खाल तसं
अधिक टिपा:
हे टोमॅटो जरा चिवट आणि आंबट असतात. तेव्हा गूळ बर्र्यापैकी घालावा लागतो. गरम तेलामुळे (आणि वितळलेल्या गुळाच्या पाकामुळे) किंचित मऊ होतात.
ह्यात खारकांचे तुकडे आणि मनुका घातल्या तरी छान लागतील.
माहितीचा स्रोत:
म्याच! इतक्या वाळक्या टमाट्यांचं काय करावं म्हणून केलेला नसता उद्योग!
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
चवदार दिसतय
चवदार दिसतय
मस्त वाटतीय कृती आणि सोप्पी.
मस्त वाटतीय कृती आणि सोप्पी. फक्त ५ मिनिटात म्हणजे माझ्यासारख्या आळशी लोकांना एकदम जमेल.
आयडीया छाने. हे सर्व
आयडीया छाने.
हे सर्व मिक्सरमधून काढलं तर? आजी असच टोमॅटो वाळवून, नंतर वाटून करायची वर्षाचे लोणचे.
छान लागते हे लोणचे. आपल्याकडे
छान लागते हे लोणचे. आपल्याकडे असे वाळके टोमॅटो मिळत नाहीत. पण जर ऊन असेल, तर प्रयोग म्हणून वाळवून ठेवता येतील. चागले लाल घट्ट टोमॅटो घेऊन त्याचे चार उभे तूकडे करायचे. जरासे मीठ लावून कडकडीत वाळवायचे. वर्षभर वापरता येतात.
अरे वा. नक्की करून बघणार.
अरे वा. नक्की करून बघणार.
(नाहीतर असं कर, तू डीसीला घेऊन ये. :P)
खरंच घेऊन येऊ का? खूप वाळके
खरंच घेऊन येऊ का? खूप वाळके टामाटू आहेत. लालू, तेल देशील का कडकडवून??
छान आहे रेसीपी !! मी करते आहे
छान आहे रेसीपी !! मी करते आहे या विकान्ताला !!!
मी करेन की नाही माहित
मी करेन की नाही माहित नाही(म्हणजे नाहीच खरंतर) पण डिसीला येताना बॅगा चेक केल्या तर त्यांना म्हणावं काही करा पण लोणचं जाऊ द्या.
लोणच छानच दिसतय दिनेशदा,
लोणच छानच दिसतय
दिनेशदा, टॉमॅटोच्या फोडींना ला तेल लावुन ओव्हन मधे कमी तापमानाला ठेवल्या तरी छान वाळतात.
मी केला होता हा प्रयोग, पण
मी केला होता हा प्रयोग, पण आपल्याकडचे टोमेटोना त्या खास इतालियन टोमेटोचा स्वाद येत नाही.
मॄ , कालच केलं लोणचं . सही
मॄ , कालच केलं लोणचं . सही लागतंय . काल पॉटलकला जाताना घेऊन गेले होते , तिथे फेमस झालंय तुझं लोणचं . अर्धी बाटली संपली सुद्धा . थँक्स अ लॉट .
अरे वा, छानच आहे कॄती. करुन
अरे वा, छानच आहे कॄती. करुन बघणार नक्की.