४ बोनलेस स्किनलेस चिकन ब्रेस्ट
१.५ कप संत्र्याचा ताजा रस
२ टे. स्पून सोयासॉस
२ ते ३ इंच आल्याचे बारीक लांब तुकडे (julienne), आवडीप्रमाणे कमीजास्त
१ कप मश्रूम्सचे काप (कुठलेही आवडीचे. मी बटण मश्रूम्स घेते)
१/२ कप पातीचा कांदा बारीक चिरून
३/४ कप चिकन स्टॉक
४-५ लाल सुक्या मिरच्या. तिखट आवडत असेल तर ताज्या लाल मिरच्या मधे चिरुन
मीरपूड, मीठ
१ टि स्पून मीट टेंडरायजर (मी अॅडॉल्फचं नॅचरल मीट टेंडरायझर घेते)
१ चमचा कॉर्नफ्लॉवर
संत्र्याचा रस आंबट असेल तर १/२ चमचा मध
१. चिकनचे तुकडे स्वच्छ धुवून, कोरडे करून मधे चीर देउन open करून त्याला मीठ, मीरपूड लावा.
२. एका बोलमधे (किंवा झिपलॉकमधे) चिकन, १/२ कप संत्र्याचा रस, १ टे. स्पून सोयासॉस, थोडे आल्याचे तुकडे, १ चमचा मीट टेंडरायजर घालून नीट मिसळून एक तास फ्रिजमधे मॅरीनेट करायला ठेवा.
३. एका पॅनमधे तीळाचं किंवा शेंगदाण्याचं तेल घेउन उरलेले आल्याचे तुकडे घाला. मिरच्या, पातीचा कांदा, मश्रूम्स घालून परतून घ्या. चिकन स्टॉक घालून, सोया सॉस घालून चव बघून मीठ घाला. संत्र्याचा रस आंबट असेल अगदी थोडा मध घालायचा. उकळी आली की कॉर्नफ्लॉवर पाण्यात मिसळून घाला. बाजूला ठेवा.
४. एका तासाने चिकन बाहेर काढून Cast Iron ग्रिल पॅन असेल तर त्यावर ग्रिल करून घ्या. बार्बेक्यूवर ग्रिल करून घेतलं तरी चालेल. नाहीतर एखाद्या पॅनमधे दोन्ही बाजूनी नीट शिजवून घ्या.
सर्व्ह करताना चिकन डिशमधे ठेउन त्यावर सॉस घालून द्या. बरोबर पांढरा भात द्या.
चिकन ग्रिल केल्यावर त्याचे slices करून सॉस मधे घालून एक उकळी काढून पण चांगले लागतात.
शाकाहारी लोक चिकन ऐवजी तोफू वापरू शकतात. चिकन स्टॉकऐवजी पाणी किंवा व्हेजी स्टॉक वापरायचा. पाण्यापेक्षा अर्थातच व्हे. स्टॉक चांगला लागतो. मी नेहमी उरलेला स्टॉक क्यूब्ज करून फ्रिज करते. तोफूचे १ इंच लांबीचे तुकडे कॉर्नफ्लॉवर्मधे घोळवून तळून घ्यायचे.
चांगली वाटतेय रेसिपी या
चांगली वाटतेय रेसिपी या विकेंडला करुन बघेन.
अन्जली, मस्त् आहे रेसिपी.
अन्जली,
मस्त् आहे रेसिपी.
सही आहे
सही आहे
अंजली , रेसिपी मस्त आहे,
अंजली , रेसिपी मस्त आहे, यम्मी वाटतेय एकदम!!
एकदम रेचल रे स्टाईल वाटते
एकदम रेचल रे स्टाईल वाटते आहे...मस्तच...पन चिकन आणि तयार केलेला सॉस पॅन मधे एकत्र करायचा नाही का? हे चिकन चायनिझ टाइप लागते क चवीला ?
मस्तच रेसिपी
मस्तच रेसिपी
डीजे, मै, मिनी, अगो धन्यवाद
डीजे, मै, मिनी, अगो धन्यवाद
स्वप्नाली, हो ओरिएन्टल स्टाईल चव आहे. तुला आवडत असल्यास चिकन ग्रिल झाल्यावर सॉसमधे घालून २ मिनीटं सिमर करून घेऊ शकतेस.