एक, दोन वांगी, तळायला आणि फोडणीला तेल, मोहरी,कढीपत्ता, गुळ, चिंचेचा कोळ (साधारण १,२ टीस्पून), आलं-लसूण पेस्ट (एक टिस्पून प्रत्येकी), मसाल्याकरता: किसलेलं सुकं खोबरं, जिरं,सुक्या लाल मिरच्या (चवीप्रमाणे),धणे आणि तीळ-कोरडे भाजून, शेंगदाणे- भाजून,२ ,३ लसूण पाकळ्या (मसाल्याकरताचे सगळे जिन्न्स साधारण एक-एक टेबलस्पून घ्यावेत), फ्रेश क्रीम साधारण अर्धी,पाव वाटी.
वरुन कोथिंबीर.
वांग्याचे करंगळीएवढे लांब, उभे काप करुन तेलात तळून घ्यावेत. एकीकडे मसाल्याचे सगळे जिन्नस मिक्सरमध्ये घालून वाटून घ्यावेत. थोडं पाणी घालून पेस्ट केली तरी चालेल.
पातेल्यात तेल गरम करुन मोहरी आणि भरपूर कढीपत्ता घालून फोडणी करावी. त्यावर तळलेली वांगी घालावीत. त्यात आलं-लसूण पेस्ट घालून नीट ढवळून घ्यावं व झाकण घालून एक वाफ काढावी. त्यावर वाटलेला मसाला घालून पुन्हा नीट मिक्स करुन घ्यावं. ह्यात चिंचेचा कोळ /पल्प व गुळ घालावा. वरुन फ्रेश क्रिम व कोथिंबीर घालून पुन्हा झाकण घालून वाफ काढावी व गरम गरम खावं.
ह्यात टोमॅटो प्युरी घालूनही छान लागते. बाकी मसाला तोच.आमच्या इथल्या रेस्टॉरंटमध्ये ही भाजी 'बघारे बैंगन' ह्या नावाने मिळते म्हणून हेच नाव दिलंय.
बघारे बैंगन>>>> फोटो टाक मग
बघारे बैंगन>>>> फोटो टाक मग "बघु" .
पुढच्या वेळी केलं की बघा
पुढच्या वेळी केलं की बघा
कृती इन्टरेस्टिंग आहे - <<
कृती इन्टरेस्टिंग आहे - << इथे तळून वांगी - वजन अशी कमेंट होती. खास लोकाग्रहास्तव काढली आहे.. जर तुम्हाला 'तळून' 'वजन' असे शब्द इथे दिसले- तर ताबडतोब डोळ्याच्या डॉक्टरांची भेट घ्या >>
चांगलंचुंगलं खायचं तर वजनाकडे
चांगलंचुंगलं खायचं तर वजनाकडे बघून चालत नाही नानबा
तळून म्हणजे डीप फ्राय नाही
तळून म्हणजे डीप फ्राय नाही करायची. शॅलो फ्राय. थोड्या तेलावर रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायची.
इथे मी दिलेली हीच रेसिपी आहे, जरा वेगळी आहे. यात क्रीम, शेंगदाणे नाहीत. जुन्या मायबोलीत आहे तेव्हा IE मध्ये पहावे लागेल कदाचित.
हैद्राबादी बघार बैंगन
जुन्या मायबोलीचे फाँट्स इथे
जुन्या मायबोलीचे फाँट्स इथे आहेत.
सायो.. इंटरेस्टींग वाटतय...
सायो.. इंटरेस्टींग वाटतय... साउदी रे. मधे गुंगुरा की काहितरीची भाजी असते.. ती पण अशीच करत असावे बहूदा..
नानबा..
रोज रोज कुठे खाणारे ती ?? 
आठवडाभर काही आबर-चबर न खाता फक्त "हेल्दी-फुड" असलेला आहार घेतला.. नियमितपणे व्यायाम केला.. तर रविवारी लंचला २ किंवा ३ पोळ्यांबरोबर पुरेल एव्हडी तळलेल्या वांग्यांची भाजी खाल्ली तर काय फरक पडणारे वजनात ??????
आठवडाभर काही आबर-चबर न खाता
आठवडाभर काही आबर-चबर न खाता फक्त "हेल्दी-फुड" असलेला आहार घेतला


>> तेच करते - आठवड्यातून अंदाजे ५ दा तास तास भर व्यायाम पण करते.. पण दोन दिवस जरी ह्या रुटीन मध्ये बदल घडला तरी दृष्य फरक जाणवतो माझ्यात (मेटाबॉलिझम जोरदार कमी आहे!)
जाऊदे.. तुम्ही खा.. माझ्याकरता "कोल्ह्याला द्राक्ष आंबट" तशी वांगी आंबट
अगं मग तू वांगी तळु नकोस ना
अगं मग तू वांगी तळु नकोस ना
सिंडी, वांगी तळून जास्त
सिंडी, वांगी तळून जास्त चांगली चव येते असं वाटतं.
नानबा, अर्धी वाटीच भाजी खायची असं ठरवून खाल्लंस एखादा दिवस तर काही हरकत नाही ग.
नानबा - तू फक्त कर. खायचं काम
नानबा - तू फक्त कर. खायचं काम मी करतो
सायो, मस्त रेसिपी. आज छान छान
सायो, मस्त रेसिपी. आज छान छान रेसिपीजचा स्नोफॉल होतोय अगदी इथे

नानबा, तू सव्वा माणसांना पुरेल एवढी भाजी कर. एक भाग नवर्याला खाऊ घाल आणि पाव भाग तू खा
आणखीन एक छान (न खाताच छान
आणखीन एक छान (न खाताच छान असेल हे ठरवलंय) रेसिपी टाकायचा विचार आहे. पण त्याकरता फोटो स्कॅन करावा लागेल.
अरेवा, करून बघायला हरकत नाही.
अरेवा, करून बघायला हरकत नाही. फ्रेश क्रीमला काही पर्याय आहे कां?
धणे आणि तीळ पण मस्ट कां?
धणे आणि तीळ पण मस्ट कां?
नाही फ्रेश म्हणजेच हेवी
नाही
फ्रेश म्हणजेच हेवी क्रीम. तुमच्याइथे डेअरी सेक्शनमध्ये मिळत असेल बघ.
धणे आणि तीळ पण मस्ट
धणे आणि तीळ पण मस्ट कां?>>>>येस. मिळत नाहीत का तुमच्याकडे?
आपली ग्रोसरी मिळणार्या
आपली ग्रोसरी मिळणार्या स्टोअरमध्ये चेक करायला हवं.
आता नेक्स्ट ग्रोसरी ट्रिप मधे
आता नेक्स्ट ग्रोसरी ट्रिप मधे वांगी नक्की.
मरो ते वजन.. काही केल तरी वाढतच
बर झाल सयो इथे लिहिलस ते..
छान आहे कृती!!!! पग्या,
छान आहे कृती!!!!
पग्या, नानबा-- अरबट-चरबट असा आहे तो शब्द
मस्त वाटतेय गं. नक्की करणार.
मस्त वाटतेय गं. नक्की करणार. धन्यवाद सायो.
लालु शॅलो फ्रायची आयडिया बेस्ट. तसंच करणार. वांगी तळायची हिम्मत नाही.
यावेळी मुद्दाम लहान वांगी
यावेळी मुद्दाम लहान वांगी मागवते. इकडे ती हीssssमोठी भरताची वांगी मिळतात.
करून बघते.छान वाटतेय, वेगळी.
बघा रे बैंगन......... सायो
बघा रे बैंगन......... सायो तुम्हाला सगळ्यांना बैंगन नुसतेच बघायला सांगते आहे.. कशाला उगाच वजन वाढण्याच्या गोष्टी करताय... आणि नुसते बघूनच वजन वाढणार असेल तर मात्र कठीण आहे हो...
याच ग्रेव्हीत कारलेपण चांगले
याच ग्रेव्हीत कारलेपण चांगले लागते.
हो बरोबर हिम्सकूल. तिकडे
हो
बरोबर हिम्सकूल. तिकडे 'बघा रे ,बघा बैंगन' असंच लिहायला हात शिवशिवत होते माझे.
मस्तय!! करुन बघणार!!
मस्तय!! करुन बघणार!!
बघा रे बैंगन>> काहीही काय
बघा रे बैंगन>> काहीही काय दाखवत्येस तू??
निदान करून फोटो तरी डकव ना
बघारे बैंगन >>> नक्की कुठे
बघारे बैंगन >>> नक्की कुठे बघायचं
करायला हरकत नाही.. आपल्याला
करायला हरकत नाही..
आपल्याला वजन वाढायची चिंता नाही .... 
वा छान वाटते रेसिपी.
वा छान वाटते रेसिपी.
Pages