तिलापिया किंवा रेड स्नॅपर फिले , मध्यम आकाराचे श्रिंप, बे स्कॅलप, लहान ऑक्टोपस यातील दोन ते तीन प्रकार मिळून एक पाउंड,
तीन मध्यम टॉमेटो
दोन ते तीन मध्यम लाल कांदे
दोन तीन टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
एक कप लिंबाचा रस ( लाइम, लेमन नव्हे )
दोन तीन तिखट हिरव्या मिरच्या
मीठ, मिरपूड
मासे, श्रिंप ऑक्टॉपस स्वच्छ धुऊन छोटे ( एक से.मी ) तुकडे करून घ्यावे
यात थोडे मीठ व तुकडे बुडतील एवढा लिंबाचा रस घालून एका काचेच्या बोल मधे घालून, झाकून फ्रीज मधे ठेवावे. निदान तीन तास तरी लागतील.
मधनं मधनं काढून हलवून परत आत ठेवावे.
लिंबाच्या रसाने प्रक्रिया होऊन मासे 'कूक' होतात व त्यांचा पारदर्शक पणा कमी होतो.
तीन ते चार तासाने लिंबाचा रस ओतून द्यावा.
मग बारीक चिरलेले टॉमेटो, कांदा, हिरवी मिरची व अजून पाव ते अर्धा कप लिंबाचा रस, मीठ, मिरपूड घालून सगळे मिश्रण सारखे करावे व परत अर्धा तास तरी फ्रीज मधे ठेवावे.
टोर्टिया चिप्स बरोबर सर्व्ह करावे.
किनार्यावरून मासे गावात नेताना ते टिकवायला म्हणून लिंबाच्या रसात बुडवायची पद्धत सुरु झाली अशी दंतकथा आहे. पोर्टॉ रिको, क्युबा, मेक्सिको, एक्वाडोर, पेरु, कोस्टा रिका या व इतर देखील मध्य्-दक्षीण अमिरेकेन भागात सेव्हिचे फार प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या देशात त्याची कृती थोडी फार बदलते.
इथे ( उत्तर अमेरिकेत ) सहज मिळणारे पदार्थ वापरून करायला ही पद्धत त्यातल्या त्यात सोपी.