ब्रिटाटा (अर्थात अंडे घातलेल्या बटाट्याच्या काचर्‍या)

Submitted by स्वाती_आंबोळे on 5 February, 2010 - 14:04
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ मोठा कांदा
१ मोठा बटाटा
आलं, लसूण, मिरची वाटून - १ चमचा
गरम मसाला अर्धा चमचा
२-३ अंडी
मीठ

क्रमवार पाककृती: 

कांद्याच्या तिरप्या खापी आणि बटाट्यांच्या काचर्‍या चिरून घ्या.
तेलावर हिंग, हळदीची फोडणी करा.
त्यावर आधी कांदा घालून परता. त्यावर आलं-लसूण-मिरची वाटण आणि गरम मसाला घालून परता. तेल सुटायला लागलं की काचर्‍या घालून परता. चवीनुसार मीठ घाला.
आधणाचं झाकण ठेवून अधूनमधून परतत काचर्‍या शिजवून घ्या.
काचर्‍या पूर्ण शिजल्या की त्यावर अंडी फोडून घाला. आता परतायचं नाही.
झाकण ठेवून मंद गॅसवर अंडी शिजू द्या.
अंडी शिजली की भाजी झाली.
आता गरम पोळी/फुलक्यांबरोबर खा किंवा ब्रेडमधे सँडविच करून.
(खायला घेताना प्रत्येक सर्व्हिंगसाठी तळापासून चमचा खुपसून खाली जमलेली किंचित खरपुडी, भाजी आणि त्यावर एक हाफ-फ्राइड अंडं असं उचलायचा प्रयत्न करा.) Happy

britata.jpeg

वाढणी/प्रमाण: 
२ जण
अधिक टिपा: 

मीठमसाले आणि अंडी आवडीनुसार कमीजास्त करा.

माहितीचा स्रोत: 
आई.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages