कोकणातली भटकंती...

Submitted by विमुक्त on 2 February, 2010 - 10:22

सोमवारची रजा टाकून मस्त ३ दिवस सुट्टी मिळवली आणि दुचाकीवर कोकणात भटकून आलो... मी आणि रव्या असे आम्ही दोघेच होतो... काहीच प्लान नव्हता... "मिळेल ते खायचं, पडेल तिथे रहायचं आणि निव्वळ भटकायचं" हा एकच हेतु होता...

पहिल्या दिवशी पुणे - महबळेश्वर - पोलादपूर - खेड - चिपळूण - मार्गताम्हाणे - वेळणेश्वर असा साधारण २९० कि.मी. चा प्रवास केला... दुपारी २ वाजता वेळणेश्वरला पोहचलो... वेळणेश्वरच्या समुद्र-किनाऱ्या वरुन संध्याकाळी सुंदर सुर्यास्त अनुभवला... रात्री निवांतपणे पुळणीत बसलो... पहाटेच्या कोवळ्या उन्हात सोनेरी समुद्र पाहिला...

(आंबेनळी घाट)

(मधु-मकरंद गड... आंबेनळी घाटातून)

(नजारा... आंबेनळी घाटातून)

(नजारा... आंबेनळी घाटातून)

(वेळणेश्वरचा समुद्र-किनारा)

(म्हावरा)

(सुर्यास्त... वेळणेश्वर)

(सुर्यास्त... वेळणेश्वर)

(सुर्यास्ता नंतर... वेळणेश्वर)

(सुर्योदय... वेळणेश्वर)

(वेळणेश्वर मंदिर)

दुसऱ्या दिवशी वेळणेश्वर - गुहाघर - धोपावे - दाभोळ - दापोली - हर्णे - केळशी - वेशवी - कोलमांडले - हरिहरेश्वर असा प्रवास केला... धोपावे ते दाभोळ आणि वेशवी ते कोलमांडले हा प्रवास बोटीने करावा लागतो... दुचाकी/चारचाकी आरामात बोटीत मावतात...

आजची संध्याकाळ केळशीच्या समुद्र-किनाऱ्यावर घालवली... सुर्यास्ता नंतर उरलेला प्रवास करुन हरिहरेश्वरला पोहचलो...

(आंजर्ले समुद्र-किनारा)

(केळशी समुद्र-किनारा)

तिसऱ्या दिवशी दुपारी १२ पर्यंत हरिहरेश्वरच्या समुद्र-किनाऱ्यावर भटकलो...

(शंख... हरिहरेश्वर)

(चामू... हरिहरेश्वर)

(खेकडा... हरिहरेश्वर)

(हरिहरेश्वर समुद्र-किनारा)

हरिहरेश्वरला दुपारचं जेवण उरकुन परतीचा प्रवास सुरु केला... हरिहरेश्वर - म्हसळा - माणगाव - निजामपूर - विळे - ताम्हिणी घाट - मुळशी - पुणे असा प्रवास केला... मुळशीच्या काठावरच्या सुरेख सुर्यास्ताने भटकंतीची सांगता झाली...

(सुर्यास्त... मुळशी)

(मी... मुळशीला सुर्यास्ताच्या वेळी)

३ दिवस समुद्रात मनसोक्त पोहलो आणि खूप मासे खाल्ले... हलवा, सुरमाई आणि सुंगटं... खूप दिवसांनी इतके ताजे मासे खाल्ले...

घाई नव्हती, चिंता नव्हती... वेळ होता, दुचाकी होती आणि भटकायची प्रचंड आवड... फार मजा आली... केवळ आनंदी आनंद...

विमुक्त
http://www.murkhanand.blogspot.com/

गुलमोहर: 

मस्त फोटो. यावेळी चक्क कुठल्याच किल्ल्यावर चढाई नाही. Happy
तुमची ही भटकंतीपण आवडली.

फोटोज सगळेच क्लास आहेत. कोकण तर ऑल टाईम फेव्हरिट.

खूप दिवसांनी इतके ताजे मासे खाल्ले... >>>>खरंय तिथे खूपच ताजे मासे मिळतात. मागे मालवणला गेले होते. तिथे तर माशांचा लिलाव होतो. बरोबरचे मित्र त्या बाजारातून मासे घेऊन आले. मी मात्र नाक बंद करून बसायचं ह्या तयारीत होते, पण छ्या अजिबात वास नाही.

बेफाम फोटोज... एव्हढेच आहेत का ? पिकासावर टाक आणि शेअर कर की मित्रा.....

कॅमेरा कुठला होता ? काही प्रयोग केलेत का 'धरला नेम आणि काढला फोटो ?' Happy

जरा अजून लिहा की राव....

असुदे, वरील दृष्यचं इतके सुंदर आहेत ना की कुठल्याही कॅमेरातून टिपता चांगलेच आले असते!!!!!

पश्या -- पुन्हा एकदा आणि असे कितीतरी वेळा कोकणाची ओढ लावून गेलास..

मस्तच फोटो!!!!!
सुर्यास्त... वेळणेश्वर>> हा तर लाजवाबच आलय. ती लाट काय सुंदररीत्या फोटोत कॅप्चर झालीय.
म्हावरा तर खल्लास Happy

सगळेच फोटो एकदम फंडु!!!!
पाय शिवशिवायला लागलेत पुन्हा एकदा कोकणची भटकंती करायला Happy
बादवे "चामु" म्हणजे काय Uhoh

सुंदर फोटो. यावेळी समुद्रसपाटीलाच फिरलास Happy hight from main sea level बघितली नाहीस.

चामू दिसायला मोठ्या गोगलगाई सारखा असतो... असे १०-१२ पकडले की कोळीलोक त्याचं कालवण बनवतात... एकदम मटणा सारखं...

माझा Camera Canon ixus 2 आहे... 2x optical zoom... 3.2 megapixel… खूप जुना आहे Camera...

विमुक्ता,
तु ईथे प्रकाशचित्रे प्रदर्शित करतान वेब पेज चि लिंक दिलेलि आहेस असे दिसते आहे. मलाहि माझी काहि प्रकाशचित्रे प्रदर्शित करायचि आहेत पण मी वेब पेज चि लिंक paste केल्यावर त्या लिंक वरचि प्रकाशचित्रे दिसत नाहित. तर मला थोडि मदत करशील काय?
आभारी आहे,
चंदन

Pages