दहा-पंधरा वर्षे नोकरी केल्यानंतर स्वतः चे वेगळे अस्तित्व निर्माण करावेसे वाटते. एका मायबोलीकराने तर तब्बल साडे तीन महिन्यांच्या नोकरी च्या अनुभवावर स्वतः ची कंपनी सुरु केली अन ते आज एक यशस्वी उद्योजक गणले जात आहेत! 'स्वः निर्मीती चा आनंद काही वेगळाच असतो' हे अनुभवाने माहिती झालेले असते. अश्या वेळी आपल्या सारखे कुणी आसपास आहेत का हे बघणे गरजेचे असते. असतील तर आनंद होतो. 'एकमेका साह्य करु अवघे धरु सुपंथ' ह्या संतवचनाची आठवण होते.
महाराष्ट्राला सहकार चळवळीची मोठी परंपरा आहे. आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना पद्मश्री विट्ठलराव विखे पाटलांच्या प्रयत्नांनी अहमदनगर जिल्ह्यातील लोणी बुद्रुक गावी उभा राहिला. अन संपुर्ण देशात सहकारी संस्थांचे जाळे पसरले. भले-बुरे लोक या प्रयत्नांनी जीवनातील यशस्वींपैकी एक म्हणुन गणले गेले. हीच सहकाराची परंपरा खाजगी क्षेत्रातही दिसुन येते. दिवंगत श्री. धीरुभाई अंबानींच्या रुपाने प्रथमच 'पब्लिक इस्स्यु' हे प्रकरण सर्वसामान्य लोकांना समजले अन आज रिलायंस इंडस्त्रिज हे एक अद्भुत सत्य म्हणुन आपणा समोर उभे आहे. 'गांव करिल ते रांव करिल काय?' ह्याची सार्थता पटते. अन म्हणुन, मायबोलीवर वेगवेगळ्या कारणांनी वावरणारे, वेगवेगळ्या क्षेत्रात मोठा अनुभव असणारे लोक अश्या उद्योजक निर्माण करण्याच्या प्रक्रियेत सामावुन घ्यावे ह्या उद्देशाने हे पहिले पाउल आहे.
कुणासाठी:
१)'संपत्ती निर्माण करणारे उद्योग उभे रहावेत' असे वाटणार्यांसाठी.
२)ज्या लोकांना उद्योग व्यवसाय करायचा आहे- अशी इच्छा आहे.
३)ज्या लोकांचा उद्योग आहे, अजुन काही मदत हवी आहे.
४)काही लोकांना जळी स्थळी काष्ठी पाषाणी भुतं दिसतात.
काही लोकांना जळी स्थळी काष्ठी पाषाणी सुंदर मुली/मुले दिसतात.
काही लोकांना जळी स्थळी काष्ठी पाषाणी पैसा दिसतो... असे पैसा दिसणार्या लोकांसाठी!
काय करावे:
१)इथे अशा कल्पना लिहिल्या जाव्यात ज्या प्रत्यक्षात संपत्ती निर्माण करु शकतील. (मला काय करायला आवडले असते- हे नाही तरी चालेल.)
२)मांडलेली कल्पना व्यावहारिकतेच्या कसोटीवर पुर्णतः उतरली पाहिजे. (कल्पना विस्तृत स्वरुपात मांडली तर उत्तम)
३)अगदी व्यावसायिक गुपीते लिहिली नाही तरी चालतील. अर्थात सक्सेस स्टोरीज वाचायला आवडतील
४) एखादा मायबोलीकर एका शहरात उद्योग करत आहे, अन दुसर्या शहरातील कुणा मायबोलीकराला असा उद्योग करण्याची इच्छा झाली, तर माहिती अन शक्य असेल तर लॉजिस्टिक ची मदत व्हावी.
५) फ्रॅन्चाईसी च्या संकल्पनेचा विस्तार व्हावा. काही मायबोलीकरांनी/ कुटुंबियांनी/मित्रांनी एकत्र येउन नवे उद्योग उभारावे.
६) मायबोलीकरांच्या अस्तित्वात असलेया उद्योगाचे विस्तारिकरण व्हावे.
७) छोट्या उद्योगाला लागणारे मनुष्यबळ, आर्थिक पाठबळ अन प्रसंगी मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी एका सेतु ची गरज आहे, असा सेतु बणण्याचा प्रयत्न आहे. असंख्य वानरांनी एक एक दगड टाकुण जसा एक रामसेतु बनवला अन श्री रामचंद्रांनी लंकेमध्ये प्रवेश करुन रावणावर विजय मिळवला, त्याप्रमाणे ह्या सेतु वरुन असख्य श्रीराम प्रवास करोत अन संपत्तीच्या श्री-लंके मध्ये प्रवेश करते होवोत.
८) बिसनेस इज अ टीम स्पोर्ट- ह्याचे प्रत्यक्षात अनुकरण व्हावे.
उदा. लक्ष्मण नावाच्या एका मायबोलीकराला गावाकडील मित्राने त्याचा भाजीपाला पुण्यामध्ये विकण्यासाठी काही मदत मागितली होती. जोवर शक्य होते, तोवर लक्ष्मण ने ती केलीही. पण, पुढे त्याला हे शक्य झाले नाही. अश्या वेळी जर, कुणी मायबोलीकर अथवा त्याच्या ओळखीचा अथवा कुटुंबीय जर त्याला उपलब्ध होउ शकला असता, तर तो किफायतशीर उद्योग आजही सुरु राहिला असता. गावाकडील तो मित्र अन शहरातील मायबोलीकर मित्र आज एका यशस्वी उद्योगाचे धनी झाले असते. पण असे घडले नाही! दुर्दैव! अशा उदयोन्मुख उद्योजकांना एकत्र आणण्याचा हा अल्पसा प्रयत्न!
मायबोली ही एक मराठी लोकांनी एकत्र येण्याची जागा आहे, असे समजुन इथे येणारे सर्व लोक मराठी आहेत हे ग्राह्य धरतो. ज्या प्रमाणे गुजराती/पंजाबी लोक उद्योग व्यवसायात एक्मेकांना हरतर्हेची मदत करतात, त्याच धरतीवर हा एक प्रयत्न!
मला पण सहभागी व्हायला
मला पण सहभागी व्हायला आवडेल...
सध्या माझ्या वडिलांचा कापडावर संगणकीय भरतकाम (computarised embroidary) आणि छापाई असा व्यवसाय आहे.. त्यातच भर घालून upside किंवा downside integration करायची इच्छा आहे. थोडक्यात सांगायचे तर टी-शर्ट, टोप्या, शर्ट, लेडीज मटेरिल बनवणे व ते कोणाला तरी विकणे... किंवा स्वतःचा एखादा ब्रॅण्ड डेव्हलप करुन त्या द्वारे सध्या तयार होत असलेला माल विकणे...
सध्या पुण्यात आहे..
छान उपक्रम. रासायनिक उद्योग,
छान उपक्रम.
रासायनिक उद्योग, किंवा वैज्ञानिक प्रतिकृती इत्यादींसदर्भात काही असेल तर मी नक्की मदत करू शकेन.
तसंच, NIRMA, NCL यांच्या incubation centresबद्दल काही माहिती हवी असेल, तर ती देऊ शकेन.
चंपक आणि जी एस जरा माझ्यासाठी
चंपक आणि जी एस जरा माझ्यासाठी हे स्पष्ट कराल का की मी जे वरती बडबडलेय ते या ग्रुपच्या क्याटेगरीमधे नक्की बसतं की नाही.
माझा खरंच गोंधळ आहे म्हणून विचारतेय. नसेल बसत तर मी ठिपके टाकते तिथे.
फारच छान बी बी. मी Project
फारच छान बी बी.
मी Project Management व Personal Efficiency या व आणखी काही विषयांवर (उदा. Dashboard using Excel) Corporate Trainings घेते. Project Management Office (PMO) प्रस्थापित करण्याची सल्ला सेवा पण सुरू करण्याचा विचार आहे. काही Online Courses / Tests पण चालू करणार आहे. कोणाला काही माहिती हवी असल्यास, अथवा सहभागाच्या काही कल्पना असल्यास संपर्काचे केव्हाही अगदी मनापासून स्वागत आहे
नीरजा, अग मला अस वाटत की इथे
नीरजा, अग मला अस वाटत की इथे लिहिण्यापेक्षा प्रत्येकाने आपापल्या उद्योगाचा बीबी सुरू करावा आणि तिथे त्यासंबंधित प्रश्नोत्तरे करावीत, नाहीतर नंतर काही सापडणे अवघड होईल. अग तू डॉक्यूमेंटरी आणि कॉर्पोरेट फिल्म्सबद्दल अजून विस्ताराने लिही ना. भांडवल, सेटअप, मनुष्यबळ, मार्केट पोटेन्शियल, साधारण खर्च-उत्पन्न ठोकताळे... जे गोपनीय असेल ते नको लिहू हव तर
भारी उपक्रम. मला सहभागी
भारी उपक्रम.
मला सहभागी व्हायला आवडेल. मी आजच्या घडीला उद्योजक नाही.
मी कोणत्याही गटा साठी नेट
मी कोणत्याही गटा साठी नेट सर्च करून बातमी पत्र बनवून रोज डिलीवर करू शकते. कस्ट्माइज्ड बातमी पत्र. जसे डोक्टर्स, महिलावर्ग. मुले. चॉकोलेट लवर्स, लेसचे क्रफ्ट करणारे.
मलाही आवडेल्..
मलाही आवडेल्..
(No subject)
अत्यंत उत्तम धागा. मी व माझे
अत्यंत उत्तम धागा. मी व माझे मित्र कोणता उद्योग सुरू करावा याबद्दल चर्चा, विचार करित आहोत. आम्ही सल्ल्यासाठी 'मिटकॉन' या संस्थेलाही भेट दिली. तेथे आमच्यासाठी उपयुक्त अशी थोडीफार माहितीही मिळाली.
पण आमचा मुख्य गोंधळ हा आहे की नेमका कुठला व्यवसाय सुरू करावा मला प्रत्यक्षात हॉटेल अथवा फूड प्रोसेसिंग यात काहितरी करायची इच्छा आहे, तर एकाला जेसीबी घेउन ते भाड्याने देण्याची कल्पना सुचली आहे.
मलाही या ग्रुप्मध्ये सहभागी व्हायला आवडेल. मी "व्यवसाय मार्गदर्शन" या ग्रुपमध्ये एक धागा पण सुरू केला आहे, हॉटेल संबंधी, अजून तरी प्रतिसाद मिळाला नाही, पण आत्ता इथे माहिती मिळेल अशी आशा आहे.
मला सहभागी व्हायला आवडेल. मी
मला सहभागी व्हायला आवडेल. मी आज उद्योजक नसलो तरी स्वतःचा उद्योग सुरू करण्याची ईच्छा आहे!
उत्तम कल्पना! मलाही सभासद
उत्तम कल्पना! मलाही सभासद व्हायला आवडेल.
मलाही सभासद व्हायला आवडेल.
मलाही सभासद व्हायला आवडेल.
मला सहभागी व्हायला आवडेल. मी
मला सहभागी व्हायला आवडेल. मी आज नौकरी करत आहे . तरी पन स्वतःचा उद्योग सुरू करण्याची ईच्छा आहे!
मला सहभागी व्हायला आवडेल.
मला सहभागी व्हायला आवडेल.
मलाही आवडेल सहभागी व्हायला.
मलाही आवडेल सहभागी व्हायला.
जी एस म्हणतात ते बरोबर
जी एस म्हणतात ते बरोबर आहे.
प्रत्येकाने आपापल्या उद्योगाचा /किवा मनात असा असा उद्योग करायचा आहे असे चालु आहे पण सुरवात कशी करावि ते समजत नाहिये त्या सम्बन्धि बी बी सुरू करावा आणि तिथे त्यासंबंधित प्रश्नोत्तरे करावीत
हो पण एक अडचन अशी की आपापल्या
हो पण एक अडचन अशी की
आपापल्या उद्योगाचा /किवा मनात असा असा उद्योग करायचा आहे असे चालु आहे पण सुरवात कशी करावि ते समजत नाहिये त्या सम्बन्धि बी बी जर सुरू केला तर तिथे प्रतिसाद मिळेलच किंवा शंका समाधान होईलच याची खात्री नाही.
मला वाटते काही लोकांना अस अनुभव आलेला आहे.
गंगाधर, असे झाले असू शकेल, पण
गंगाधर,
असे झाले असू शकेल, पण पुन्हा प्रयत्न करून पाहू. कदाचित ग्रुप तयार झाला असल्याने असे पोस्ट पटकन लक्षात येईल व उत्तरही मिळेल.
मलाही सहभागी व्हायला आवडेल.
मलाही सहभागी व्हायला आवडेल. मध्यंतरी आम्ही इथे इंडियाना स्टेटच्या स्मॉल बिझनेस सुरु करण्यासंबंधीत वर्कशॉपला गेलो होतो. तिथे बरीच माहिती मिळाली. आमच्या मित्राचे इथे फ्राचाइजमधे सँडविचचे दुकान आहे. त्याला भांडवलासाठी मदत केली तेव्हा त्या उद्योगासंबंधीही बर्याच गोष्टी माहित झाल्या.
स्वाती, अगदी हेच अपेक्षित
स्वाती, अगदी हेच अपेक्षित आहे!
अगदी छोट्या अन किरकोळ वाटणार्या गोष्टी पण एखाद्या उद्योगात खुपच महत्वाची भुमिका बजावतात.
ग्रुप मध्ये सभासदांची संख्या वाढवण्यापेक्षा आहे त्या इच्छुक लोकांमध्ये सहकार्य वाढवणे महत्वाचे आहे. मग गृप आपोआप वाढेलच!
प्रत्येक सभासदाने आपल्याला हव्या त्या उद्योगाचा एक बीबी सुरु करावा. मग त्यात त्याचे स्वानुभव्/माहिती लिहावी अन मग इतर सभासद त्यात चर्चेच्या व मदतीच्या रुपाने सहभागी होतीलच!
या पानावर ग्रूपचे सभासद कसे
या पानावर ग्रूपचे सभासद कसे होता येईल याबद्दल अधिक माहिती दिली आहे.
http://www.maayboli.com/node/13459
नमस्कार... मी प्रिया श्रीराम
नमस्कार...
मी प्रिया श्रीराम उपकारे, कल्याण ,
मलाही सहभागी व्हायला आवडेल.
सध्या मी software programmer आहे..मला software development मध्ये software wep application business करायचा आहे. support service ची माझी तयारी आहे.
Professional Summary:: # Experienced software development programmer skilled in gathering and documenting requirements, developing project plans, managing and tracking software execution, with usability testing, developing and executing test scenarios, complying with regulatory requirements ,releasing products to production, and maintaining product releases.
मी गेल्या चार वर्षांपासून
मी गेल्या चार वर्षांपासून ईआरपी सॉफ्ट्वेअर तयार करून त्या अनुषंगिक सेवा देत आहे. सध्या नवीन व्हर्जनचे काम चालू आहे.(त्यापैकी बरीचसी मॉड्यूल्स तयार आहेत, पेरोल सोडून). दोन खाजगी साखर कारखान्यांना सेवा देत आहे. सध्या मार्केटिंग साठी पैसा/आवश्यक ज्ञान नसल्यामुळे अडचणी येत आहेत. जर कोणी माबोकर इच्छुक असेल तर माझ्याशी संपर्क साधा.
shreeseva.it@gmail.com
वा फारच छान आहे हा धागा.
वा फारच छान आहे हा धागा. माझ्या वडिलांचे १२ एकर शेत आहे मंद्रुपला(सोलापूरहून २५ किमी वर) मागे मी काही एकर जमीनीत कोरफड लावावी असे ठरवले होते पण लग्न, मूल, अमेरिकेची वारी यात ते मागे पडले .मला खरेतर शेतीची खूप आवड आहे, कष्ट करण्याची तयारीही आहे.आणि स्पष्ट्च बोलायचे झाले तर स्वतःची जमीन असताना उगाच कुणाच्या दारात जाऊन नोकरी कशाला मागायची असे माझे मत!! पण आमच्या आई साहेबांचे वेगळेच्..मुलीनी(आम्ही २घी बहीणीच आहोत भाऊ नाही) अश्या भानगडीत न पडलेले बरे(मी मेकॅनिकल इंजिनियर झाले त्याचे काही नाही), पण आता मी परततीय भारतात कायमची!!
माझ्या नव-याचा शेतीला पाठींबा आहे. मला यशस्वी शेतीबद्द्ल कोणी मार्गदर्शन करु शकेल का?
स्वप्ना , वेळ मिळाला तर
स्वप्ना , वेळ मिळाला तर सोलापुर- पुणे रोडवर वडवळ जवळ साधु बोडकेंच्या फार्मवर जाऊन ये . माळरानाचा त्यांनी केलेला कायापालट बघण्यासारखा आहे . आणि मंद्रुपला नदीवरुन पाईपलाईन करुन पाणी नेता आलं तर शेतीत खुप काही करु शकशील.
धन्यवाद श्री !!आमच्या शेतात
धन्यवाद श्री !!आमच्या शेतात विहिर आहे आणि पाणीही आहे जमीन कसदार आहे फक्त तिथे जाऊन शेती केली पाहिजे.
माझे बाबा सोलापूरहून करतात सगळं. एका माणसाला करायला दिले आहे शेत ...उंटावरून शेळ्या हाकण्यापेक्षा स्वत: माहिती करून घेऊन शेती करावी असं माझं मतः)
आता गेल्यावर नक्कि जाऊन भेटेन साधु बोडकेंना!!
तर स्वतःची जमीन असताना उगाच
तर स्वतःची जमीन असताना उगाच कुणाच्या दारात जाऊन नोकरी कशाला मागायची असे माझे मत!! >>> क्या बात है!
काखेत कळसा अन गावाला वळसा घालण्याचे उद्योग सुरु आहेत सध्या. सगळा दोष शिक्षण पद्धतीचा आहे. माझे आजोबा म्हणत ' जितका शिकला तितका हुकला' म्हंजे शेती करायच्या कामातुन हुकाला! अन हुकला तो संपला!
स्वप्ना, तुम्ही सकाळ प्रकाशन चे दैनिक अॅग्रोवन अन दै. लोकसत्ता मधील शेतीवाडी हे सदर नियमीत वाचत जा. महाराष्ट्र शासनाचे लोकराज्य हे रु. ५ किमतीचे एक मासिक आहे. त्यात खुप उपयुक्त माहिती दिलेली असते.
शुभेच्छा!
अरुण देशपांडे या सोलापुरातील
अरुण देशपांडे या सोलापुरातील विज्ञाननीष्ठ शेतकर्याबद्दल अनिल अवचटांच्या पुस्तकात वाचले आहे. त्यांच्याकडुनही जास्त माहिती मिळु शकेल.
दादासाहेब बोडकेंची लोकमतमधील
दादासाहेब बोडकेंची लोकमतमधील बातमी
Pages