कंपॉस बॉक्स

Submitted by वर्षा_म on 12 January, 2010 - 23:04

मी आहे लेखणी
सर्वात मी देखणी
अक्षर काढा वळणदार
घ्या जास्तीचे मार्क चार

पेन्सील माझे नाव सांगते
शार्पनर मी बरोबर नेते
छान छान चित्र काढते
सर्वांना मी आवडते

माझे नाव खोडरबर
झिजतो मी आयुष्यभर
काम करा देउन लक्ष
वाढेल माझे आयुष्य

मी आहे छोटीशी पट्टी
भाषेच्या तासाला मला सुट्टी
भुमिती विषय माझ्या आवडीचा
उभ्या आडव्या रेषा मारायचा

खोडरबर, पेन्सील पट्टी
सगळ्यांशीच माझी गट्टी
सांगा बघु मी कोण?
कंपॉस बॉक्स दुसर कोण?

गुलमोहर: 

जमल Lol

Pages