मुंबई जीटीजी ३० जानेवारी २०१०- लालु

Submitted by रैना on 6 January, 2010 - 02:58

लालु (शर्मिला) मुंबईत येत आहे.
सर्वानुमते शनिवार ३० जानेवारी मुकरर करण्यात आली आहे. दुपारी ४ वाजता.
- भारतीय प्रमाणवेळेनुसार येऊ नका कृपया. लालुचे फ्लाईट त्याच रात्री आहे. Proud
- स्थळ- गणेश उद्यान शिवाजी पार्क.
- लालुनी विनंतीवजा (आज्ञा) केली आहे की खूप धावपळ करुन, सुट्ट्या वगैरे काढुन येऊ नका मंडळी. सहज जमत असेल तरच या. Happy

पान वाहून गेलय त्यामुळे आठवतय तशी यादी टाकते. प्लीज गैरसमज नको, तुमचं नाव यात नसलं तर तो माझ्या वयानुसार विस्मरणाचा दोष आहे असं समजा आणि कृपया नावं द्या. यातील कोणालाही मी कधीच पाहिलेलं नाही. कंपु वगैरे धोषा नको.

१) लालु
२) मंजू (शनिवर्कर त्यामुळे वेळ होईल)
३) साधना (शनिवर्कर त्यामुळे वेळ होईल)
४) असुदे
५) केदार १२३
५) आफ्रिकेहून आशुतोष
६) कविता नवरे
७) किरू
८) गजानन ?
९) विशाल कुलकर्णी
१०) रैना
११) असुदेची गाडी असेल तर मनीषा लिमये
१३) यो रॉक्स ?
१४) डुआय विथ सिग्नीफीकंट अदर
१५) भ्रमर
१६) नील वेद
१७) शर्मिला फडके
१८) विनय भिडे
१९) आनंदमैत्री
२०) घारूअण्णा
कोणा संयोजकांना इथुन पुढे चार्ज घ्यायचा असेल तर खुशाल घ्या. येणा-यांनी कृपया आपला सेल नंबर मला माबोसंपर्कातून मेल करा.

मंजूच्या मते शिवाजी पार्कात बरेच काही खायला मिळते. न मिळाल्यास तिला जवाबदार धरा. Proud

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंजूच्या मते शिवाजी पार्कात बरेच काही खायला मिळते. न मिळाल्यास तिला जवाबदार धरा>> पण ती तर उशीरा येणारे ना?? बरेच काही खायला न मिळाल्यास जबाबदार कोण Wink

दुपारी ४ नक्की का?? (म्हणजे ४ जरा जास्तच लवकर होतय ना म्हणून Happy )

मासाहेंबांच्या पुतळ्याजवळ गटग व्हायचा हे खरय. मी मायबोलिकरांना प्रथम तिथेच भेटलो. पण ते पुतळयाची विटंबना प्रकरण झाल्यापासून आता उद्यान गणेश! (पुतळ्याची विटंबना झाली त्यादिवशी गटग ठरला होता, वर्षाविहारासाठी)

ओके.
मग गणेश उद्यान फायनल झालं का?

सगळे- अजून काही ठरवायच राहिलं आहे का? प्लीज सांगा.

गजानन/ विशाल/ योरॉक्स तुम्ही कृपया जमतय की नाही ते सांगाल का?
मंजु/साधना तुम्हाला किती वाजेपर्यंत यायला जमेल ?

मंजु/साधना तुम्हाला किती वाजेपर्यंत यायला जमेल ?

मी लौकरात लौकर यायला जमवतेच्..पण आज नक्की सांगता येणार नाही..

अम्या, लिमये काकूही येणार आहेत तुझ्याबरोबर. वरती लिस्टमध्ये तशी अटच आहे त्यांच्या नावासमोर. Happy
मंजे, कसही करून जमवच. तेवढीच भेट होईल.

४ ची वेळ असली तरी आपण ६ पर्यंत तिथे असू, त्यामुळे कोणाला थोडा उशीर होणार असेल तर चालेल. मला ५ ते ७ ही चालेल.

जाहीर निषेध!

३० जानेवारीला प. पू. महात्मा, राष्ट्रपिता गांधीजींची पुण्यतिथी. त्या दिवशी फक्त बकरीचे दूध पिऊन,सूतकताई करत, ईश्वर अल्ला तेरो नाम हे भजन म्हणण्यात दिवस घालवायचा!

फार तर काही गायी कापून मुसलमानांना दावत द्यावी! गांधीजींच्या आत्म्याला बरे वाटेल.

मी ४ वाजता येऊ शकेन पण ५ ला मला काही कामानिमित्त परत निघायला हवं. येणारेत का कुणी बरोब्बर ४ वाजता तरच ठाण्याहून शिपा मधे यायचे कष्ट घेण्यात अर्थ आहे Wink

कोणाला कशाचं Proud
इथे मला शिवाजी पार्कात ब्लॅक वाले ओरडतात तसं माबो माबो माबो ओरडत फिरायला लागणार ते किती सायडी दिसेल याची चिंता लागली आहे भ्रमर Wink
हातात झेंडूच फुल आणि पासवर्ड "राजमलाई" ठेवूयात काय ? Wink

हातात झेंडूच फुल आणि पासवर्ड "राजमलाई" ठेवूयात काय ? >>>> रैने, नंतर काय सगळ्यांचे झेंडू गोळा करुन तोरण करायचं तिथेच बसून? येणारे जाणारे विचारतील कसं दिलं? Proud
राजमलाई आणणार्‍याला बरोब्बर ४ वाजता यायला सांग Happy

एक फुसू- ज्यांच्याकडे आहेत त्यांनी माबो टीशर्ट घालून जा, सापडायला/ ओळखायला सोपे पडते. शेजारचा माणूस बहुतेक माबोचाच आहे की नाही याची चाचपणी करत बळंच घुटमळणेही टळते Wink

भ्रमा, झिपलॉकच्या पिशव्या फक्त माझ्यासाठी होत्या रे, पण अन्य उपस्थित माबोकरांनी त्यावर मैत्रीपूर्ण (?) हक्क बजावला Sad त्यामुळे तुम्हाला फक्त चॉकलेट्स Happy

अश्विनी, तोरण!!!! Lol

Pages