Submitted by हर्ट on 1 January, 2010 - 04:20
नमस्कार!
या बा. फ. चा उद्देश सांगणे तसे गरजेचे नाही तरीही लिहितो. मराठी वर्तमानपत्र तर आपण वाचतोच. ईंग्रजी मधे The Times of India, Indian Express हे वर्तमानपत्र कदाचित तुम्ही वाचत असाल. पण आपल्यापैकी काही जण इतर देशातील वर्तमानपत्र देखील वाचत असाल. अशा वाचकांकडून आपल्यालाही त्या वर्तमानपत्राची माहिती होईल आणि कदाचित तुम्हालाही ते वर्तमानपत्र वाचायला आवडेल.
तर तुम्ही तुम्हाला आवड असलेल्या पेपर बद्दल इथे लिहा. का आवडतो, कुठला भाग आवडतो तेही लिहा.
धन्यवाद!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खरं सांगायचं झालं तर एकही
खरं सांगायचं झालं तर एकही वर्तमानपत्र आपली बौद्धिक भूक पूर्णांशाने भागवू शकत नाही. मी रविवारी सगळे पेपर घेतो आणि पुरवण्यांमधील आवडतील ते लेख वाचतो. मराठी वर्तमानपत्रे सगळीच अपुरी आहेत. इंग्रजीत मला 'द हिंदू' आणि त्याची भावंडे आवडतात. (आजही नैतिक मूल्य जपणारा पेपर आहे). आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रांत मी पूर्वी 'इंटरनॅशनल हेराल्ड ट्रिब्युन' आवडीने वाचत असे. ब्रिटीश लायब्ररीत बसून फायनान्शियल टाइम्स वाचणेही आनंदाचे होते.
वैचारिक फार वाचून अजीर्ण होऊ लागले, की मी संध्यानंद किंवा काली गंगा असे पेपर वाचतो. 'बिहारमध्ये धनबाद जिल्ह्यात एका बकरीला तीन डोक्यांचे पिल्लू झाले' अशासारख्या कल्पित बातम्या मजा आणतात.
मला "मटा" सोडुन कुठलाच पेपर
मला "मटा" सोडुन कुठलाच पेपर फारसा आवडलेला नाही....
पण त्याचाही दर्जा सध्या कमालीचा घसरलेला आहे
जुन्या मटा च्या मैफल पुरवणीला तोड नव्हती... आणि मुकेश माचकरच्या चित्रपट परिक्षणालाही!
भोपाळ ला राहात असताना "दैनिक
भोपाळ ला राहात असताना "दैनिक भास्कर", आता Times of India आणि Deccan Chronicle
लोकसत्ता.. गुरुवार , शनिवार
लोकसत्ता..
गुरुवार , शनिवार आणि रविवार च्या पुरवण्यांसाठी..
लोकसत्ता, विवा, चतुरंग,
लोकसत्ता,
विवा, चतुरंग, लोकरंग.
लोकसत्ता सर्व पुरवण्या ,
लोकसत्ता सर्व पुरवण्या , सामना (उत्सव पुरवणी (शब्द...शब्द ) काही इतर ), म टा , सकाळ अधून मधून
English : Huffingtionpost, UsaToday and The Onion
लोकसत्ताच्या पुरवण्या म्हटलं
लोकसत्ताच्या पुरवण्या म्हटलं की मला अरुण टिकेकरांच्या लोकमुद्राची हटकून आठवण येते. खूप सुरेख निघायची.
बाकी पेड न्यूज प्रकारामुळे छापील शब्दांमधे जी विश्वासार्हता वाटायची ती अल्मोस्ट संपून गेली. वर्तमानपत्रे आजकाल फक्त पुरवण्यांसाठीच वाचली जातात अशी परिस्थिती झाली आहे.
मराठी वर्तमानपत्रांमधल्या मुख्य पुरवण्या अजूनही, काही चांगले अपवाद वगळता स्त्रियांनी दुपारचं जेवण आटोपून वामकुक्षी घेताना वाचाव्यात किंवा ऑफिसला जाताना चौथ्या सीटवर बसून काही हलकफुलकं वाचायला बरं अशा टाईपच्याच निघतात. तेच तेच विषय.
आपलं महानगरची रविवारची पुरवणी बरी असते. मटाच्या संवाद आणि मैफिलची रया गेलीय. मॉस तर हातात धरवत नाही. लोकसत्ताच्या लोकरंगलाही अगदीच सामान्य करुन टाकलय. व्हिवा आणि चतुरंगचा वाचकवर्ग वेगळा तरी विषयांमधे काहीच वेगळेपणा किंवा नाविन्य नाही. त्यामानाने प्रहार या नव्या दैनिकाच्या शनिवार रविवारच्या पुरवण्या खरंच दर्जेदार असतात. विशेषत: अभिजित देसाई लिहित असलेला सिनेमाचा विभाग.
हिंदुस्तान टाईम्सच्या (शनिवार्-रविवार) पुरवण्या चांगल्या असतात. विशेषतः लिटरेचर-बुक्स हा इतर सर्वांनी आजकाल वाळीतच टाकलेला सेक्शन इथे छान असतो. द एशियन एज बाकी पेपर भिकार आहे. पण त्यांच्याही वीकेन्ड स्पेशल पुरवण्या चांगल्या असतात.
हिन्दुस्तान टाईम्स चांगला
हिन्दुस्तान टाईम्स चांगला असतो. विशेषतः रविवारचा. रविवारचा एक्स्प्रेसही चांगला असतो. DNA मला सर्वाधिक आवडतो. रोजच्या वर्तमानपत्रातही वाचायला भरपूर असतं.
मुंबईत रहात असाल तर ....
मुंबईत रहात असाल तर .... महाराष्ट्र टाइम्स किंवा लोकसत्ता
पुण्यात रहात असाल तर .... वन अॅन्ड ओनली "सकाळ"
कोल्हापुरात रहात असाल तर... पुढारी
सातर्यात रहात असाल तर... दै ऐक्य
औरंगाबादेत रहात असाल तर... लोकमत
कोकणात रहात असाल तर... रत्नागिरी टाइम्स
आणि देशाबाहेर रहात असाल तर कुठलाही ऑनलाइन पेपर उत्तम
<<कोल्हापुरात रहात असाल तर...
<<कोल्हापुरात रहात असाल तर... पुढारी>>
कोल्हापुरात जर कुणाला 'सकाळ' हवा असेल तर तो 'एक पुढारी द्या' असेच म्हणतो. आणि विक्रेता जेव्हा पुढारी द्यायला लागतो तेव्हा सकाळकडे बोट दाखवून, 'हा नव्हे, तो पुढारी द्या' असे म्हणतो. इतका पुढारी प्रसिद्ध आहे.
शरद
मटा, लोस, ईटी, मिंट दररोज
मटा, लोस, ईटी, मिंट दररोज
सकाळ >> शुक्र. आईसाठी खास
मिड डे>> टीपीसाठी
एच टी, द हिंदू रविवारी! आवडतो असा कुठलाच नाही मटा, ईटी, मिंट ची सवय झाल्ये एवढंच
(आम्चा पेपरचा स्टॉल नाही!! )
मुकेश माचकर भारी चित्रपट
मुकेश माचकर भारी चित्रपट परिक्षण लिहायचे मटामध्ये.. आणि एक जण (नाव विसरलो) जेहांगिरमध्ये भरणार्या चित्रप्रदर्शनांवर फार सुरेख लिहायचे.
सध्या इंडियन एक्स्प्रेस सगळ्यात चांगला आहे माझ्या मते.. रोज विविध स्तंभलेखक आणि इकॉनॉमिस्टमधले लेख हे दोन्ही मस्त असते. दक्षिण भारतात असाल तर हिंदू उत्तम..
बहुतेक सर्व वृत्तपत्रे
बहुतेक सर्व वृत्तपत्रे कोणत्या ना कोणत्या तरी पक्षाची मुखपत्रे आहेत. लोकसत्ता, मटा, लोकमत, हिन्दुस्तान टाईम्स, TOI, IE, केसरी इ. काँग्रेसचे; सामना शिवसेनेचा; सकाळ NCP चा; तरूण भारत BJP चा; हिंदू कम्युनिस्ट व काँग्रेसचा . . . त्यातल्या त्यात "पुढारी" बराचसा निष्पक्ष वाटतो. सामना व लोकसत्ता तील बातम्यांची व लेखांची पातळी अत्यंत खालावलेली आहे. त्यात अतिशय असभ्य व खालच्या थराची भाषा वापरलेली असते. त्या तुलनेत एका विशिष्ट पक्षाकडे झुकलेली असली तरी मटा, सकाळ इ. वृत्तपत्रे अतिशय सभ्य व प्रगल्भ भाषा वापरतात. एकंदरीत बहुतेक सर्व वृत्तपत्रे paid news या प्रकारातली आहेत.
नवाकाळ (आमच्याच गल्लीत छापला
नवाकाळ (आमच्याच गल्लीत छापला जातो)
इंडीअन एक्सप्रेस - शेखर
इंडीअन एक्सप्रेस - शेखर गुप्ता आणि हर्ष भोगलेंच्या लेखासाठी
इंटरनेटवरचा कुठलाही मोफत
इंटरनेटवरचा कुठलाही मोफत पेपर.........
>>कोल्हापुरात जर कुणाला
>>कोल्हापुरात जर कुणाला 'सकाळ' हवा असेल तर तो 'एक पुढारी द्या' असेच म्हणतो. आणि विक्रेता जेव्हा पुढारी द्यायला लागतो तेव्हा सकाळकडे बोट दाखवून, 'हा नव्हे, तो पुढारी द्या' असे म्हणतो. इतका पुढारी प्रसिद्ध आहे. >>
शरद १००% सहमत आहे. काही बांधून देताना दुकानदार सुद्धा फुडारीत बांदून दे म्हणतो....
दक्षे, कायतरी चुकतंय.
दक्षे,
कायतरी चुकतंय. दुकानदार कशाला 'फुडारीत बांदून दे' म्हणेल? ते वाक्य गिर्हाईक म्हणेल ना?
कायतरी चुकतंय. दुकानदार कशाला
कायतरी चुकतंय. दुकानदार कशाला 'फुडारीत बांदून दे' म्हणेल? ते वाक्य गिर्हाईक म्हणेल ना? >> दुकानदार त्याच्या नोकराला सांगतो ओ ....
'फुडारीत बांदून दे' >> हा
'फुडारीत बांदून दे' >>
हा बीबी आता हळूहळू 'माझे आवडते वर्तमानपत्र' या विषयावरुन 'वर्तमानपत्राचे विविध उपयोग' इकडे सरकू लागला कि काय ?
हा बीबी आता हळूहळू 'माझे
हा बीबी आता हळूहळू 'माझे आवडते वर्तमानपत्र' या विषयावरुन 'वर्तमानपत्राचे विविध उपयोग' इकडे सरकू लागला कि काय ?>>>
म्हंजे काय! ३ इडीयट्स च्या बीबीत पायरेटेड सिनेमा पाहावा की नाही याची चर्चा आणि रवीचे संकल्प सोडून चितळेंच्या उद्धटपणाची वार्ता, असं नाही झालं तर तो माबोवरचा बीबी कसला! बहुप्रसवा म्हनत्यात त्ये ह्येच की वो!
संध्यानंद व्हॅल्यू फॉर मनी.
संध्यानंद
व्हॅल्यू फॉर मनी. डोस्क्यास नो टेन्शन !!
प्रयोग भारी हां लक्ष तुझं..
प्रयोग भारी हां लक्ष तुझं.. मिनोती टू गुड
वर्तमानपत्राचे विविध उपयोग'>> ह्म्म्म्म सुरू करा जोशीबुवा तु म्हाला पेप्राचे म्हणायचे आहे ना?
सोडून चितळेंच्या उद्धटपणाची वार्ता>> उद्धटपणा नव्हे माज!! आपल्या सर्विसबद्दल बावबद्दल अन् कदाचित पुणेकर असण्याबद्दल असलेला माज आहे असं लेखकाला म्हणायच आहे! [ ह्यालाच पुणेरी बाणा असंही म्हणता येईल]
कदाचित पुणेकर असण्याबद्दल
कदाचित पुणेकर असण्याबद्दल असलेला माज आहे असं लेखकाला म्हणायच आहे!>>>
पुणेकर -माज की बाणा- नविन बीबीला करा सुरुवात!
सार्वमत अन देशदूत..... सकाळ
सार्वमत अन देशदूत..... सकाळ सकाळ लहान सहान पोरांना लै बेस! (या पेपर ची रद्दी पण कोण घेत नाही इतका हलका कागद असतो!)
लहान पोराना लै बेस... ? बैस!
लहान पोराना लै बेस... ? बैस!
टाऑइं च्या रविवार पुरवणीत एक
टाऑइं च्या रविवार पुरवणीत एक गुळगुळीत रंगीत पान असतयं त्याची लायकी मोठ्यांनीही टॉयलेट/टिश्यू पेपर म्हणून वापरावा अशी असते. अर्थात त्याला रद्दीचा भाव जास्त येतो!
मंडळी, नमस्कार! कृपया इथे
मंडळी, नमस्कार!
कृपया इथे विषयाला अनुसरुन आणि या सकेंतस्थळाचा मान ठेवून चर्चा करा अशी नम्र विनंती.
- बी
सकेंत>>> संकेत!! ना रे..
सकेंत>>> संकेत!! ना रे..
सर्वच वर्तमानपत्रांचा कंटाळ
सर्वच वर्तमानपत्रांचा कंटाळ आलाय सध्या. वॉल स्ट्रीट जर्नल, फायनॅनशियल टाईम्स , वॉ पो हे त्यातल्या त्यात बरे.
फक्त शनिवार रविवार लोकसत्ता मनापासून वाचावसा वाटतो.
टाईम्स (Times of India) तर टॉ पे च्या लायकीचा आहे आणि ई.टी (Economic Times) हे कॉर्पोरेट न्युजचे फिल्मफेअर आहे. या दोहोतील स्पेलिंग आणि व्याकरणाच्या चुका काढण्यानी माझी सकाळ सत्कारणी लागते.
२०१० चा संकल्प म्हणजे एकही वर्तमानपत्र न वाचणे हा करावा असं फार प्रकर्षानी वाटत होतं, पण आदतसे मजबुर.
पण फार्फार पूर्वी ईंग्रजी सुधारायला आम्हाला टाईम्स वाचणे अनिवार्य होते. त्यातले न कळणारे अवजड शब्द टिपुन शब्दकोशात पहायला वडिल भाग पाडत. त्यातली सुभाषिते टिपुन वगैरे ठेवायचेही वय होते.
आणि हो पूर्वीच्या टाईम्समध्ये देशाबिशाच्या हित आणि अहितांच्या बातम्या असायच्या. आतासारखा तो अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या रुमालाच्छादित अर्धवस्त्रांकित सेलिब्रिटीजना वाहिलेला नव्हता.
शाळेतील सर्व विषयांवरील प्रोजेक्टस व्यवस्थित करण्याएवढा चांगला मजकुर त्यात असायचा.
त्याकाळी सकाळ मध्ये सुट्टीचे पान यायचे ज्यात शांताबाई शेळके लिहायच्या. आणि हो - पुरवण्यात प्र. ना. संतांचा लंपन असायचा.
Pages