बनुताई says,"बंटीबाबा, सॉरी "

Submitted by एम.कर्णिक on 24 December, 2009 - 01:15

बंटीबाबा, सॉरी हं, मी आधी नाई आले
कशी येणार? सर्दीने मी बेजार होते झाले
पप्पी घेत्ल्याशिवाय तुमची र्‍हाय्लीच मी नस्ती
तुम्हाला पण नाई का मग सर्दी झाली अस्ती ?

ब्बाईऽऽ आता दुबईची हवा गार खूप
गुंडाळू तुम्हाला आता दुपट्यात गुडुप
हातपाय काही केल्या हल्वायचे नाही
दुपट्याची गठली सोडवाय्ची नाही

लुकुलुकु डोळ्यानी बघाय्चं नुस्तं
दुदु पिऊन झाल्यावर बर्प द्यायचा मस्त
ओकी ओकी करून कवडी टाकू नका हंऽ
वाढती लागो शिंक येवो घाबरू नका हंऽ

म्हणेल आई "शत्तंऽजिव आणि चिरंऽजीव !"
मीनिंग त्याचा म्हाईताय? "करेक्ट, लाँग लिव्ह"
आणखी थोडे दिवस तुम्ही आईजवळ झोपा
नंतर आपण दोघे मिळुन करुच दंगाधोपा

बरं आता बंटीबाबा, झोपा डोळे झाकुन
तवर येते माय्बोलीवर फेरी मी टाकुन
बघाच, तिथं बनुताई खरड अश्शी काढील,
"का नाई पाठवत ईमेल?" जाब विचारील

गुलमोहर: 

Happy Happy

आता हा गोड गोड आनंदमेवा अधिकाधिक चाखायला मिळणार म्हणून धन्यवाद! बनुताई,बंटीबाबाला एवढे छान आजोबा मिळाले म्हणून अभिनंदन करायचं की त्यांना एवढी गोड नातवंडं मिळाली म्हणून आजोबांचं अभिनंदन करायचं? दोघांचंही करूया.

वाट पहाते आहे माझी लेक या कविता समजण्याएवढी मोठी कधी होईल आणि मी कधी तिला या बनुताई वाचून दाखवेन. Happy

छान.

cute! Happy