१)१ शेपू जुडी जराशी हिरवीगार पण पाने खूप जाड नसली पाहिजेत. गर्द हिरवीगार जूण(?) असते. (जूण हा आजीचा शब्द होता. त्याचा अर्थ एवढाच की जुनी.) स्वच्छ धूवून बारीक खूरडून ठेवायची,
२) थालीपिठ भाजणी,
३)कांदा अतिशय बारीक कापलेला,
४)कोथींबीर बारीक चिरलेली,
५)किंचीत आमचूर पॉवडर,
६)अगदी चिमटीभर ओवा भरडलेला(हवाच असेल तर),
७)बारीक चिरलेली हिरवी मिरची चवीप्रमाणे(लहान मूल खाणार असतील मिरवी मोठी कापून मग काढून टाकावी पाण्यातून)
८)शोभेला तिळ हवेच असतील तर,
हे जर आयते भाजणीचे पिठ आईने पाठवलेले नसेल तर खालील पिठ विकत आणून मिक्स करावी.
२ वाट्या तांदूळ पिठ,
१ वाटी हिरव्या मूगाच्या डाळीचे पिठ(हिरवट असते, चव छान लागते),
१/२ वाटी बेसन(काला चना बेसन उत्तम),
पाव वाटी कणीक,
४ चमचे ज्वारी,
२ चमचे बाजरी,
२ मोठे चमचे धणा पॉवडर,
दिड चमचा जीरा पॉवडर,
हिंग,
१ मोठा बडीशेप पॉवडर,
सगळ्या पॉवडरी सोडून पिठ जराशीच १० मिनीटे भाजून घेवून फ्रीजमध्ये ठेवायची. मग सरते शेवटी पॉवडरी,हिंग टाकून पुन्हा भाजावी पिठ ३ एक मिनीटे,झाली भाजणी तयार. हि फ्रीजमध्ये टिकते. आईकडे मागायला नको म्हणून आपणच केलेली बरी.
शेपू हा रक्ताला खूप चांगला असे असल्याने हि भाजी घरी लहानपणापासून खात आलेय वेगवेगळ्या पद्धतीने. त्यात हे थालीपिठ खूप फेव. सर्व शेपू गुणधर्म लिहित बसले तर फूड मायक्रोचा क्लास सुरू होइल. असो.
१.अगदी एक चमचा तेल पातेल्यात घालून कांदा घालून परतायचा, अर्धवट झाकण मारून नरम करायचा.
२. त्यातच मग मिरची घालावी.
३. जरासाच काळा/गोडा मसाला घालून परतायचा कारण थालीपिठाच्या भाजणीत असते ना ध/जीरा पूड,
४. मला लसूण आवडते म्हणून मी अगदी बारीक करून घालते.
५.मग शेवटी आमचूर घालून पुन्हा अर्धवट झाकन मारावे. मग खुरडलेला शेपू टाकून परतावे. ज्यास्त शिजवायचा नाही. मग उकळते दोन कप भाजणी दिड कप पाणी घालून उकळी आली भाजणी मिक्स करावी. गरगरा चमच्याने फिरवून गॅस बंद करून झाकण मारावे.
६. मग हाताला जरासेच तेल लावून चांगले मळून घ्यावे मग एकेक गोळी घेवून लाटावे सरसरीत तांदूळ पिठी वर. नसेल जमत तर प्लॅस्टीक रॅप वर लाटावे. फोर्क ने जरासे टोचे मारावे व नॉन्स्टीक वर परतावे.
७. मस्त कुरकुरीत थालीपिठ तयार. बरोबर ग्रीक दही व ताजी पटकन जरासे शेंगदाने+लसून्+सुखे खोबरे+ लाल मसाला+ सी सॉल्ट भाजून भरड वाटलेली चटणी.
८.मग थोड्यावेळाने आले,केसर्,वेलची,बडीशेप कूटून घातलेला थंडी स्पेशल चहा.
९. मस्त मूवी लावून ब्लॅकेंट घेवून बसावे मूवी पहात.
१. भरपूर तेल घालू नये, थालीपिठ तुटतात.
२. शेपू खूप शिजवू नये उकळत्या पाण्यात.
३. केसर + बडीशेप घातलेला चहा मस्त व आरोग्यास उत्तम असतो थंडीत.
मनु मस्त आणि वेगळी आहे
मनु मस्त आणि वेगळी आहे पाकक्रुती. करुन बघिन पुढच्या वेळी शेपु आणली की.
तू जुन्या मायबोलिवर 'डब्यात
तू जुन्या मायबोलिवर 'डब्यात न्यायचे पदार्थ" ह्या बीबी (बीबी नक्कि आठवत नाहिये) वर बहुतेक लिहल होतस शेपु घालुन थालिपीठ, मी तेव्हापासुनच करते, मस्त लागतात. आता ह्या भाजणिचे करुन बघिन. पीठ भाजल्यावर फ्रीज मध्ये का ठेवायचि मसाल्याबरोबर भाजण्याआधि? आणि बाहेर नाहि का तिकणार हि भाजणि?
जाता जाता, तू वरति फुड मायक्रो चा क्लास म्हणालिस ना त्यावरुन सुचल, एक स्वतंत्र बीबी काढना त्या विषयावर, बाकि जाणकार पण लिहतिल एक छान डेटाबेस तयार होइल, ह्या विषयावरचि बरिच माहिति मायबोलिवर वेगवेगळ्या बीबींवर आहे ती पण एकत्र करता येइल ह्या निमित्ताने.
भाजणीची पिठ मी फ्रीजरमध्येच
भाजणीची पिठ मी फ्रीजरमध्येच ठेवते. कारण,
त्याची विरी(?) जात नाही.
पिठ कडवट होत नाही.
चव ही टिकते.
विशेष करून ज्वारी,बाजरीची पिठ. सर्व पिठं मी फ्रीजरमध्येच ठेवते(आईची सवय).
मी थालीपिठाच्या भाजणीत जीरा,धणा,हिंग,बडीशेप टाकूनच ठेवते प्लॅस्टिक पिशवीत्.(झिपलॉक बॅगेत).
आयडीयाबद्दल धन्यवाद. पण सध्या खूप कमी वेळ असतो ऑफीसमध्ये.
(आजकाल नावे देवनागरीत झाल्याने लक्षात येत नाही पटकन कोण आहे ते. आधीचे नाव काय होते असेच उस्तुकतेने विचारतेय.)
रमा नाव छान आहे. हे नाव एकले की ते गाणे आठवते.. रमा माधवाचे जिथे चित्त्..)असो. विषय बदलला.
खूपच आवडली. आजच मी प्रयोग
खूपच आवडली. आजच मी प्रयोग करुन बघायचा म्हणत होते तर तयार कॄतीच मिळाली
आमच्याइथे हिरव्यागार जुड्या मिळतात बेबी डिल म्हणून ... मला वाटलं तो कोवळा असेल.
मनु मला पण ही कृती आवडली .
मनु मला पण ही कृती आवडली . मी आजच करुन बघते! धन्स.
अग मी आधिचि मराठमोळि . मी करु
अग मी आधिचि मराठमोळि :). मी करु का अॅड्मिनना विनंति असा नविन बीबी उघ्डुन देण्याचि? तुला जसा वेळ मिळेल तस लिहि तु.
चर्चेसाठी नवीन लेखनाचा धागा
चर्चेसाठी नवीन लेखनाचा धागा उघडायचा असेल तर तो कोणालाही उघडता येईल. अॅडमिनना सांगायची गरज पडणार नाही.
अगो, इकडचा हिरवा दिसला तरी
अगो,
इकडचा हिरवा दिसला तरी इतका जुण नसतो. मुंबईत इतका कोरडा पाला असतो ना. शिजता शिजत नाही. त्यामुळे जरासाच पोपटी हिरवा असेल तर बरे. इथे मिळतो तो हाताने खुडला तर तुटतो पटकन.
मस्तच. शनिवार लंचला करणारच.
मस्तच. शनिवार लंचला करणारच. थँक यू मन:स्विनी!
मसत आहे ही कृती.
मसत आहे ही कृती.