बनुताईंची खानावळ

Submitted by एम.कर्णिक on 30 November, 2009 - 13:00

Ughada ata.jpg
(कधी उघडतात हो?)
Chakor-2.jpg
(येतायत की नाही मालकिणबाई आणि वाढपी?)
Let us start .jpg
(चल ये सुरू करूया.)
Chakor-1.jpg
(काय रे, बरं वाटलं का आजचं जेवण? )
Yummy!.jpg
(वा. मस्तच आहे की.)
Batch-1.jpg
(पहिली पंगत.... का ग? ती ही नाही आली आज अजून?)
Batch 2.jpg
(बरं बाई हिचं पोट एव्हढ्यात भरलं.)
Batch 3.jpg
(आणखीन वाढा थोडी, मेंबर जादा आलेत.)
Pigeon-1.jpg
(ओक्के, आता जरा बाजरीकडे जाऊया.)
New Guest.jpg
(अरे वा. बाजरी पण छानच लागते की !)
Waiting-1.jpg
(हं. बघाच आता कसा सफाईनं पळवतो तुमचा पाव.)

*********

पक्षांसाठी बनुताईंची खानावळ नवीन
खानावळीत कामगार नेमले आहेत बस्स् तीन

बाबा बाजारमास्तर - पाव, बाजरी आणायला
आई आहे खानावळीचा स्टॉक ठेवायला

वाढपी म्हणुन आजोबांची नेमणुक झाली आहे
खानावळीची मालकिण अर्थात बनुताईच आहे

मेंबर झालेत आजवर जवळजवळ वीस
सकाळ दुपार संध्याकाळ पंगती अगणित

चौदा चिमण्या, पिजन्स तीन आणि दोन चकोर
आणखी एक बुल्बुल पण जो आहे भुरटा चोर

उजाडतानाच सकाळी मेंबर होतात हजर
कुणी असतं शांत कुणी लावतं ट्वि ट्वी गजर

चिवचिवाट चिमण्यांचा चालतो भुकेपोटी
बुलबुल अस्तो पोझ घेउन नजर टाकत चोरटी

पिजन्स बोलत नाहित, नुस्ती चालीचाली करतात
चकोर आपले बापुडवाणे बघत उभे राहतात

बनुताई नि आजोबा येतात बाल्कनीत
चकोरांची जोडी अस्ते दार न्याहाळीत

धावत येतात चकोर बनुताईना पाह्यल्यावर
आणि अगदी तुटुन पडतात वाढल्या पावावर

वाकडी मान करून बुल्बुल टिपण नीट साधतो
चकोरांच्या चोचीखालुन पाव उचलुन जातो

संधी पाहून पिजन्स मारतात दोन्हींवरती ताव
बाजरी खाऊन पुन्हा जातात पळवायला पाव

बाजरीवरती चिमण्यांचा हल्लाबोल होतो
बघताबघता भांड्याचा तळ दिसू लागतो

पिण्यासाठी पाण्याचा ठेवला आहे माठ
कधी कधी चिमण्या त्यातच आंघोळ उरकतात

काय म्हणता ? खानावळीत प्राप्ती काय मिळते?
बनुताईंच्या डोळ्यांमध्धे हसू जे फुलते ! !

गुलमोहर: 

काय म्हणता ? खानावळीत प्राप्ती काय मिळते?
बनुताईंच्या डोळ्यांमध्धे हसू जे फुलते ! !

>>> किती गोड! Happy

छान आहे हा उपक्रम. पक्षांचा चिवचिवाट छान वाटतो ऐकायला. एकदा पक्ष्यांना सवय झाली, कळलं की इथे अन्न मिळतं, की नेहेमी त्या वेळेला बरोब्बर हजर होतात Happy

भारीच आहे खानावळ.... मुकुंददा ! Happy

पिजन्स बोलत नाहित, नुस्ती चालीचाली करतात >>> Happy
चकोर आपले बापुडवाणे बघत उभे राहतात

कित्ती गोड... फोटो पण छान आणि त्याच्या कॅप्शन्सदेखील. बनुताईना कधीतरी मायबोलीवर घेऊन या. खूप फॅन आहेत इथे तिचे!!!

>>काय म्हणता ? खानावळीत प्राप्ती काय मिळते?
बनुताईंच्या डोळ्यांमध्धे हसू जे फुलते ! >> फारंच छान आहे बनुताईंची खाणावळ... Happy

फारच छान आहे बुवा तुमची ही बनुताईची सिरीज!

माझ्या ४ वर्ष वयाच्या मुलीला पण या सर्व कविता खुप आवडतात. लवकरच तुम्हाला बनुताईचा fan club
सुरु करावा लागणार असे दिसते आहे!

अरे वा !! मस्तच आहे बनुताईची खानावळ!!

>>>काय म्हणता ? खानावळीत प्राप्ती काय मिळते?
बनुताईंच्या डोळ्यांमध्धे हसू जे फुलते ! !>>>> हे एक्दम सही !!!

सर्वांचे आभार. इतक्या दिवसांनंतर पुन्हा कोणी ही कविता वाचेल अशी कल्पनाही नव्हती. त्यामुळे नवे प्रतिसाद पाहून खूपच बरे वाटले. बनुताई आणि बंटीबाबाच्या इतर कविताही असाच आनंद देतील. वाचल्या नसतील तर जरूर वाचा ही विनंती.