नाचणी पिठ - २५० ग्रॅम्स
लोणी -२५० ग्रॅम्स
पिठीसाखर- २५० ग्रॅम्स
बेकिंग पवडर -१ चमचा (सपाट)
अंडी - ५
अंजीर, बदाम , काळ्या मनुका, इसेंन्स (हवा असल्यास)
प्रथम लोणी फेटुन घ्यावे (श्रिखंडा सारखे दिसे पर्यंत )
नंतर त्यात ५ अंडी फेटुन घालावीत
ह्या मिश्रणात अनुक्रमे नाचणी पिठ, पिठी साखर, आणी बेकिंग पावडर घालुन फेटुन घ्यावे,
सर्व मिश्रण हलक्या हाताने फेटुन त्यात अंजीर,काळ्या मनुका व बदामाचे तुकडे घालावेत
पॅन ला थोडस तुप लावुन घेऊन हे सर्व मिश्रण त्यात ओतावे व १८० डिग्री सें. तापमानावर ओव्हन मधे बेक करावे.
अंड्यामुळे शाकाहारी का मांसाहारी पदार्थात घालावा ते कळल नाही . अंड न घालता पण हा केक छान होतो.
ह्या मधे कणिक किंवा मैदा व नाचणी चे निम्मे निम्मे प्रमाण घेऊ शकतो.(पिठ चाळुन घेण्याची गरज नाही, जाडसर कणिक वापरली तरी छान होतो) नाचणी अस्ल्या मुळे हा केक पौष्टीक व पचायला हलका. आपल्या नेहमीच्या मैद्याच्या केक प्रमाणे फुलतो. चॉकलेट इसेन्स घातला तर तो नाचणी मुळे दिसायला ही चॉकलेट सारखा दिसतो, मुल आवडीने खातात
कविता आणि अल्पना फोटो अपलोड
कविता आणि अल्पना फोटो अपलोड होत नाहीये, त्यामुळे तुम्ही आलात की प्रत्यक्षच देइन
कविता, नाचणीचे सत्व चालेल का
कविता, नाचणीचे सत्व चालेल का पिठाऐवजी आणि अंडे हवेच का? अंडयाला जर काही पर्याय असेल तर सांग म्हणजे शाकाहारींना पण हा केक करता येईल.
नाही सत्व चालत नाही पिठ च हव
नाही सत्व चालत नाही पिठ च हव त्यासाठी , सत्व घातल तर फुलणार नाही. आणि तस ही नाचणी , सत्व न काढता चांगली खाल्लेली , म्हणजे कोंडा पण पोटात जातो
अंड न घालता पण छान होतो हा केक, फक्त मैद्याच्या केक सारखा फुलत नाही,
अंड नाही घातले तरी ईतर
अंड नाही घातले तरी ईतर साहीत्याचे प्रमाण तेच राहील का?
ऑष्ट्रेलिया मधले ओर्ग्रान ,
ऑष्ट्रेलिया मधले ओर्ग्रान , या कंपनीचे नो एग नावाचे, एक उत्पादन आहे. ते अंड्याच्या जागी वापरता येते. ते बटाटा आणि टोपीओका पासुन केलेले आहे (म्हणजे ते व्हेगन आहे, त्यात ग्लुटेन, गव्हाचे प्रोटिन, दूध, यीस्ट, सोया यापैकी काहिही नाही. हे सगळे न चालणार्याना ते चालू शकेल )
थँक्स ग स्मिता. एकदाचा
थँक्स ग स्मिता. एकदाचा मुहुर्त लागला ना. आता कुणाबरोबर तरी नाचणीचं पीठ मागवते. केल्यावर सांगते तुला.
स्मि, केला की कॉलते तुला
स्मि, केला की कॉलते तुला
अंड्याएवजी फ्लॅक्स सीड पावडर
अंड्याएवजी फ्लॅक्स सीड पावडर चालेल का?
एक अबोली,अंड्याऐवजी फ्लेक्स
एक अबोली,अंड्याऐवजी फ्लेक्स सीड पावडर वापरता येते.असे वाचले आहे.तु करुन पाहिलेस कि इथे कळव.
दिनेशदा,अंड्या च्या सबसिट्युट मधे अंडा पावडर ही घालतात आणि त्याला व्हेगन लिहीले होते. असे वाचले होते..
लोण्याऐवजी काही वापरता येईल
लोण्याऐवजी काही वापरता येईल का?