पुरंदर

Submitted by सुन्या आंबोलकर on 12 September, 2009 - 05:10

रविवारी ३० ऑगस्टला पुरंदर ला जायचे ठरले.ऑफिसमधलेच १० जण होतो.
सकाळी ७ वा भारती विद्यापिठला (पुणे) भेटायचे ठरले..
५ जणांच्या गाड्या घ्यायचे ठरले, त्याप्रमाणे मला घ्यायला एकजण येणार होता.
तो माझ्याकडे कधी आला नसल्यामुळे मी त्याला एका मेन रोडवर भेटायला सांगितले.
सकाळी ६:५० ला माझा मोबाइल वाजला (मी साखरझोपेत)....वैतागून हॅलो.. तिकडून अरे कुठे थांबला आहेस तू? मग धावपळ सूरू.... ७:१५ ला बाहेर पडलो....
बाकिचे पुढे निघून गेले आणि आम्हाला कापूरहोळ फाट्यावर यायला सांगितले..
तिथे सगळे भेटल्यावर नाष्टा (मिसळपाव) करून पुढे निघालो.
गार हवा आणि सगळीकडे हिरवेगार.. खुप छान वाटत होतं..
गाड्या गडावर जात असल्या तरी घेवून जाण्यात अर्थ नाही. मग ट्रेकची मजा काय...
गडाच्या पायथ्याच्या गावात १० रू ची चॉकलेटे घेवून (फुकटात ठेवणे बरोबर नाही वाटले) हेल्मेटे ठेवण्याची व्यवस्था केली, बाजुला गाड्या पार्क केल्या आणि तिथून पुढे निघालो.....
सुरवातीलाच फोटोशेषन चालू असताना पोझ देण्याच्या भानगडीत...
धपाक..... Happy
01_Dhapak.jpg

थोडा पुढे सरकला असता तर शेतात..
एकाने नकाशा सोबत (गरज नसताना) घेतला होता आणि रस्ता सांगत पुढे चालू लागला ,पण पुढे त्याच्या शरीराने साथ न दिल्याने तो आणि त्याचा नकाशा सर्वांच्या मागे...
तसेच पुढे खालचे गाव , शेते बघत बघत वर चालत राहीलो.. मधेच एखादी दुसरी पायवाट दिसायची
त्यातली नेमकी गडावर पायवाट कोणती यावर एकेकाचे विचारमंथन व्हायचे
आणि पुढचा प्रवास चालू व्हायचा.

02_view.jpg03_view.jpg04_cactus.jpg

आम्ही तिघेजण बिनी दरवाज्यात पोचलो आणि बाकीच्या मित्रांची वाट बघत तिथे थांबलो....

05_Entry.jpg

थोड्या वेळात बाकीचे पोहचले.... नकाशावाल्या महाशयांच्या अंगातले निघतानाचे कपडे त्याचा बॅगमधे गेले, हाप पँट - बनियान शिल्लक राहीले आणि नकाशा बनियानच्या आत..पोटात !!!
तिथून उजवीकडच्या वाटेने मुरारबाजींच्या पुतळ्याकडे निघालो.

06_Murarbaji.jpg07_Murarbaji-1.jpg

मुरारबाजींच्या पुतळ्याकडे बघून आपली छाती थोडी पूढे आल्यासारखी... हा असच काहीतरी वाटलं होतं.
त्यांना मुजरा करून बालेकिल्याकडे निघालो...
तेवढ्यात पावसाची रिमझीम सूरू झाली.
धूक्यातून वाट शोधत दिल्ली दवाज्यात पोहचलो. तिथून खंदकड्यावर गेलो. कडेला जायला भिती वाटत होती कारण दाट धूक्यामूळे पुढे काय आहे ते दिसतच नव्हते. तिथून राजगादीकडून केदारेश्वर मंदिराच्या दिशेने चालू लागलो. जास्त उंचीवर असल्यामूळे धूके दाट होत होते . पुढे तर १५-२० फूटांच्या पलीकडचे काही दिसत नव्हते.

08_Kada.jpg09_view.jpg

थोड्यावेळासाठी धूके बाजूला व्हायचे, इकडे तिकडे बघावे तेवढ्यात धुके दाटून यायचे.
16_view.jpg

असेच केदारेश्वर मंदिराजवळ येवून पोहचलो.

10_Kedareshwar.jpg11_Kedareshwar-1.jpg

सगळ्यांना भूक तर जोरात लागली होती आणि तिथे बसायला व्यवस्थित जागा असल्याने तिथेच बसलो सगळ्यांनी आपापली बॅग उघडावी एवढ्यात आमच्या बाजूला पूर्वज येवून बसला ..

09_Purvaj.jpg

नशीब येताना आपला कबीला घेवून नाही आला.. त्याला खायला दिले आणि तिथे बसणे सोईचे वाटले नाही म्हणून बॅग उचललून परत खाली निघालो. येताना भगव्याजवळ जावून त्याला पेलण्याचा प्रयत्न केला पन अजूनही आपल्याला नाही पेलत त्याचा भार...... असो..

13_Bhagavaa.jpg

थोडं खाली आल्यावर बसायला बघून जागा अणि पूर्वज नसल्याची खात्री करून पोटपूजा करून घेतली तिथेच ब्रेड, सफरचंद, काकडी, टोमॅटो, कांदा, सॉस, बटर, खोबर्‍याची चटणी, शेव या पदार्थांपासून बनलेल्या एका पदार्थाचा शोध लागला त्याचे सर्वानूमते 'अ‍ॅप्पल सँडविच' असे नामकरण करण्यात आले. सगळ्यांचे हादडून झाल्यावर परतीच्या वाटेकडे निघालो.

हा भूभू गडावर आमच्या बरोबरच फिरत होता.
14_Bhubhu.jpg

वज्रगडाकडे जाण्याचा बेत धुक्यामूळे रद्द केला.
आणि गडावर बाकी कुठे फिरयचं पण रद्द करून निघालो.

12_view.jpg15_view.jpg

येताना पुरंदरेश्वराचे दर्शन घेवून निघालो
17_Purandareshwar.jpg

खाली आल्यावर चर्चजवळ (इंग्रजांनी दिलेल्या गडावरच्या जखमा अजून तशाच आहेत) कोणतरी प्रेम (?) करत असल्याची (आपले आणखी एक दुर्दैव) बातमी आमच्या गुप्तहेर खात्याकडून आल्यावर आम्ही 'जय भवानी जय शिवाजी !' घोषाणा देत तिकडे चाल करून गेलो. आम्हाला तिथून दोन प्रेमवीर आणि दोन प्रेमवीरांगणा पलायन करताना कुठेतरी गायब झालेले दिसले (नाहीत).
तिथून सरळ खाली आलो , गाड्या घेतल्या आणि घरी निघालो....पुण्यात पोहचल्यावर चहापान झाले आणि एक-एकेकाचा निरोप घेत आपापल्या घरी गेलो.
20_Team.jpg

गुलमोहर: 

सुन्या मस्तच Happy

केदारेश्वराची वाट तशी अरुंद आहे... धुक्यामुळे तर फारच कठीण झाली असेल...

Image134.jpg

वज्रगड तसा सोप्पा आहे...
Kada.jpg

समीर, श्री , रू ,अभिजित, प्रकाश ,राजकुमारी , प्रतिसादबद्दल सगळ्यांना धन्यवाद !! Happy

जबरद्स्त गड्याम्नो...मित्रा...इथे बसून पण मला १ क्षण अस वाटल की मी तिथेच आहे...

धन्यवाद विनय , समीर , भागो , आश्विनी , योगी , साधना !! Happy

समीर तूका लवकरच सांगतय.. नं. देवन ठेव. Happy