३ अंडी (पांढरा आणि पिवळा भाग वेगवेगळा करुन घेणे)
१/२ कप/११० ग्रॅम साखर.
८ औंस/२२५ ग्रॅम मस्करपोने चीज
१ मोठा मग तयार espresso coffee (साखर किंवा दूध न घालता).
२ टेबलस्पून Cognac किंवा Brandy (ऐच्छिक), काही जण रम वापरतात.
२०-२५ लेडीफिंगर बिस्कीटे किंवा १ पाकीट
२ टेबलस्पून कोको पावडर (वरुन सजवायला)
खर तर तिरामिसुची कृती फार सोपी आहे थोडक्यात सांगायचे तर कॉफीत बुडवलेली बिस्किटे आणि क्रीम यांचे एकावर एक आपल्याला हवे तेवढे थर दिले की झाले तिरामिसु तयार.. ह्याच्यापलीकडे का..ही नाही. पण असे सांगीतले तर लोकांना खर वाटत नाही, एवढा छान पदार्थ असा कसा पटकन होईल असे म्हटल्यावर काय करणार म्हणून ही घ्या कृती अगदी सविस्तर.
१. एका मोठ्या भांड्यात अंड्यांचा पिवळा भाग, सगळी साखर, Cognac आणि १/२ टेबलस्पून तयार कॉफी एकत्र करा. नंतर (इलेक्टीकल) हँड मिक्सरने ते चांगले २-३ मिनीट फेटून घ्या.
२. आता वरच्या मिश्रणात सगळे मस्करपोने चीज टाकुन परत हँड मिक्सरने ३-५ मिनीटे फेटा. सगळे मिश्रण एकजीव व्हायला हवे (until consistency is smooth). हे भांडे बाजुला ठेवुन द्या.
३. आता दुसर्या एका मोठ्या भांड्यात अंड्यांचा पांढरा भाग आणि चिमुटभर साखर टाका आणि हँड मिक्सरने भरपुर फेटा. त्याचा मस्त पांढरा फेस (stiff peaks) व्हायला हवा. भांडे उलटे केले तरी हा फेस खाली पडणार नाही इतक्या वेळ फेटावे. माझा मिक्सर खूप पॉवरफुल नाहीये त्यामुळे मी १२-१४ मिनीटे फेटते. तुम्हाला कदाचित यापेक्षा जास्त किंवा कमी वेळ लागेल तुमच्या मिक्सरच्या क्षमतेप्रमाणे.
४. आता हा फेटलेला अंड्याचा पांढरा भाग हलक्या हाताने लाकडी चमचा वापरून दुसर्या (मस्करपोने असलेल्या भांड्यात) मिश्रणात मिसळा. मिसळतांना फोल्डींग मेथड वापरावी. हे अगदी हलक्या हाताने करावे.
५. आता एका पसरट भांड्यात/ताटलीत सगळी कॉफी ओतावी. कॉफी अगदी कडक गरम असू नये, कोमट किंवा त्यापेक्षा थोडी जास्त गरम असावी.
६. एक चौकोनी काचेचा कॅसरोल किंवा ज्या भांड्यात तिरामीसु करायचय ते भांडे घ्यावे. नंतर एक एक करुन लेडीफिंगर्स
आडवी धरुन कॉफीत बुडवावीत. बिस्कीट पूर्ण बुडायला हवे. ही बिस्कीटे फार नाजूक असतात त्यामुळे झटकन बाहेर काढावीत आणि लगेच कॅसरोलच्या तळाशी ठेवावीत. एका शेजारी एक असा बिस्किटांचा एक थर तयार झाला की त्यावर भांड्यातले अर्धे मिश्रण हलक्या हाताने ओतावे आणि ते लाकडी चमच्याने सगळीकडे सारखे पसरवावे (दुसरा थर).
७. आता परत त्या मिश्रणाच्या थरावर वर कॉफीत बुडवलेल्या बिस्किटांचा थर द्यावा (तिसरा थर). बिस्कीटे अगदी शेजारी शेजारी चिटकून ठेवावीत थर लावतांना आणि मग त्या थरावर उरलेले सगळे मिश्रण ओतावे (चौथा थर). काहीजण यावर बिस्कीटांचा अजून एक थर (पाचवा) पण देतात आणि त्यावर परत क्रीमचा (सहावा) पण माझ्याकडचे भांडे एवढे खोल नाही त्यामुळे मी एकुण चारच थर देते. तिरामिसु करतांना सगळ्यात खालचा थर नेहमी लेडीफिंगर बिस्कीटांचा तर सगळ्यात वरचा थर नेहमी क्रीमचा असावा
८. आता कॅसरोल किमान ४-५ तास तरी फ्रीजमध्ये ठेवावा. सर्व्ह करायच्या आधी चाळणीने त्यावर कोको पावडर टाकायची आणि मग सगळ्यांना तिरमिसु सर्व्ह करायचे. माझ्याकडे आत्ता फोटो नाहीये पुढच्यावेळी केले की काढेन आणि टाकेन.
१. लेडीफिंगर्स आणि मस्करपोने चीज शक्य असेल तर इटालिअन ब्रँडचेच वापरावे. इटालीयन ग्रोसरीच्या दुकानात मिळते. लेडीफिंगर हे बिस्किटाच्या प्रकाराचे नाव आहे ब्रँडचे नाही. मी होल फुड्स मधून लेडीफिंगर्स आणले होते ३६५ की अश्याच कुठल्यातरी ब्रँडचे, अजिबात आवडले नाही.
२. एस्प्रेसो कॉफी करणे शक्य नसेल तर साधी काळी कॉफी वापरता येईल पण चवीत फरक पडतो.
३. काही जण लेडीफिंगर्स ऐवजी पाउंड केकच्या पातळ चौकोनी चकत्या वापरतात. चवीतला बदल मला फारसा आवडला नाही म्हणून मी लेडीफिंगर्सच वापरते.
४. मी वापरलेला कप मेजरींग कप होता.
५. पार्टीसाठी करतांना हा प्रकार मी आदल्या दिवशीच करुन फ्रीज मध्ये ठवते, जितका जास्त वेळ तो फ्रीज मध्ये रहातो तितकी चव चांगली येते.
६. अंड्याचा पांढरा भाग १२-१४ मिनीटे फेटणे हा भाग कधी कधी कंटाळवाणा होवू शकतो तो नवर्याला किंवा दुसर्या कोणालातरी करायला द्यावा :). माझ्यामते तिरामिसु इतकी सोपी आणि हमखास यशस्वी होणारी कुठलीच कृती नाही.
सशल ़केलेस तर प्रत्येक
सशल
़केलेस तर प्रत्येक स्टेपचे फोटो काढ म्हणजे मग तुझेच फोटो (with due credit) डकवेन माझे खूप दिवसात तिरामिसु करणेच झालेले नाही.
ही घे सशल ती लिंक. ह्यात
ही घे सशल ती लिंक. ह्यात स्टिफ पिक्स फोल्डिंग वगैरे नीट बघता येइल.
ताजी अंडी कशी ओळखावी ते पण आहे.
http://www.youtube.com/watch?v=uL6LW6YWbBY
सशल यशस्वी झाली का मग?
सशल यशस्वी झाली का मग?
अरे सॉरी .. इकडे वृत्तांत
अरे सॉरी .. इकडे वृत्तांत द्यायचा राहूनच गेला .. मी ९०% यशस्वी झाले बहुतेक .. डिट्टेलवारी वृत्तांत लिहीते थोड्या वेळात ..
फोटोसह आणा वृतांत. बरं पडत
फोटोसह आणा वृतांत. बरं पडत आम्हाला (नाव ठेवायला.):P
मी पण करुन बघते पुढच्या वीक मध्ये. या वीक मध्ये फ्रुट टार्ट चा बेत आहे.
रूनी (आणि सीमा) माफी द्या
रूनी (आणि सीमा) माफी द्या यकडाव .. फोटो नाही(त) माझ्याकडे .. पाहुणे ययच्या अगोदर नेहेमीप्रमाणे धावत पळत सगळं आटोपलं आणि इथे फोटो द्यायचे तर सवडीने काढायला आणि फोटो काढताना किमान तेव्हढी बॅकग्राउंड तरी पसारारहीत करायला तेव्हा अजिबात वेळ झाला नाही त्यामुळे फोटोचं राहून गेलं ..
रूनी, तिरामिसू छान झालं .. चव अप्रतिम .. माहेरचे (स्पेशल) कावळे येणार म्हणून २ टेबलस्पून्स् करता $४० घालून रेमी मार्टिन आणली .. नक्की कशाचा इफेक्ट होता माहित नाही पण चव एकदम मस्त जमली .. थोडा प्रॉब्लेम मात्र हा झाला की फायनल प्रॉडक्ट "केकी (caky)" झालं नाही .. त्यामुळे बाहेर तिरामिसू मिळतं तसं वड्या पाडून सर्व्ह करता आलं नाही .. माझ्या अंदाजाप्रमाणे ह्याला खालील दोन गोष्टी अॅण्ड्/ऑर फॅशनमध्ये जबाबदार असाव्यात .. (१) लेडी फिंगर्समध्ये कॉफी जास्त सोक झाली (मी अगदी तू सांगितल्याप्रमाणे १-२ सेकंदच प्रत्येक बाजूने कॉफीत बुडवले लेडीफिंगर्स), (२) एग व्हाईट्स टायमर लावून फेटली, फेटल्यावर भांडं उपडं करून टेस्टही केली स्टिफ इनफ झालं आहे का त्यासाठी .. पण मग फोल्डींग करणं नीट जमलं नसावं .. पण फायनल क्रीम थोडं रनी झालं ..
तर हा मामुली (?) सेटबॅक वगळता तिरामिसू मस्त झालं एकदम .. मी वरून सेमी-स्वीट चॉकलेटही घातलं शेव्ह केलेलं .. पाहुण्यांनां भारीच आवडलं ..
घरच्या सदस्याला एग व्हाईट "कुक" केलेले नाहीत हे पचायला जड गेलं .. त्यामुळे पुढच्या वेळी अंडी वगळून व्हिपींग क्रीम फेटून घालायचा विचार करत आहे .. पुढच्या वेळी अगदी नक्की फोटो काढेन ..
तर इति वृत्तांत-ए-तिरामिसू सुफळ संपूर्ण ..
सर्व संबंधितांचे आणि तोंडभरून स्तुती केल्याबद्दल पाहुण्यांचेही धन्यवाद!
अरे वा!
अरे वा!
अरे का बदललं? मी खरंच तसं
अरे का बदललं?
मी खरंच तसं करणार आहे आणि इकडे रीपोर्ट देईन आठवणीने ..
मी केलेला तिरामिसु. खूपच मस्त
मी केलेला तिरामिसु. खूपच मस्त झाला होता. धन्यवाद रुनी.
या थँक्सगिव्हींगला तिरामिसू
या थँक्सगिव्हींगला तिरामिसू स्टार आयटम होता. मी अंड्याचा पिवळा भाग साखर घालून डबल बॉयलर पद्धतीनं फेटून घेतला. पांढरा भाग वापरलाच नाही. त्याऐवजी हेवी क्रीम थोडी साखर घालून फेटून घेतलं. करायला अतिशय सोपं आहे. स्टँड मिक्सर असेल तर झटपट फेटून होते.
रुनी, आज तिरामिसु केलं, एकदम
रुनी, आज तिरामिसु केलं, एकदम भारी झालं आहे. तुला अनेक धन्यवाद!!
Pages