तीन मध्यम भरताची वांगी, (एक सेमीच्या चकत्या करुन ) ऑलिव्ह ऑईल, ३०० ग्रॅम मिझरेला चीज, त्यापेक्षा अर्धे पर्मेजां चीज, अर्धा कप पावाचा चुरा, बेसिल, मीठ आंइ ताजी मिरिपूड
सॉससाठी : २ टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल, एक मोठा कांदा बारिक चिरुन, दोन लसणीचा पाकळ्या, (मोठ्या), अर्धा किलो लाल टोमॅटो बारिक चिरुन, थोडी साखर, मीठ व बेसिल
वांग्याच्या चकत्याना मीठ लावून त्याचा राप काढून टाका ( त्यासाठी त्या वीसेक मिनिटे चाळणीत ठेवा ) नंतर थंड पाण्याने धुवून घ्या. चकत्या कोरड्या करा. ओव्हन २०० से. ला तापवून घ्या. चकत्या एका ट्रेमधे पसरा, वरुन तेल लावा. आणि १५ मिनिटे बेक करा.
सॉससाठी, तेलात कांदा लसूण परतून घ्या. त्यावर बेसिल सोडून बाकिचे जिन्नस घाला, १० मिनिटे शिजू द्या. शेवटी बेसिल टाका.
चकत्यांवर आधी मोझरेला चीज पसरा. मग सॉस टाका, वरुन पार्मेजा चीज आणि पावाचा चुरा मिसळून टाका. २० ते २५ मिनिटे किंवा वार्तून सोनेरी रंग येईपर्यंत बेक करा.
पास्ता किंवा गार्लिक ब्रेड बरोबर खा.
छान
छान
वॉव.....!
वॉव.....!
दिनेशदा, वेलकम बॅक!!
संपादित!
अरे वा! मस्त!
अरे वा! मस्त!
सही आहे.
सही आहे.
फोटो ???
फोटो ???
दिनेश यांच्या पाककृतीवर सगळे
दिनेश यांच्या पाककृतीवर सगळे नवीन प्रतिसाद पाहून बरे वाटले. पाककृती छानच आहे, ' पूर्वीच्या ' नेहमीप्रमाणे.