आमचीही एक हातोडी
(मिल्या दादा आणि देवा - एक हातोडी द्या मज आणूनी हाणून मी ती स्वहस्ताने)
भोंडल्याची गाणी (डोम्बलाची गाणी)
पात्र (वात्र) परिचय
बका- स्टीव बकनर
बना- बेन्सन
माया - माईक प्रॉक्टर
सया - सायमंडस
रेखा - रिकी पाँटींग
कला- मायकल क्लार्क
वेशभूषा- छगन भाई आणि मगन भाई ड्रेस वाले
केशभूषा - श्री शंकर केश कर्तनालय
गीत - असच कूणीस
चाल - नेहेमीचीच (वाकडी)
ढाप ग 'बका'
ढापू मी कशी
या गावचा त्या गावचा 'ऑप्टीशीयन' नाही आला
चष्मा नाही मला ढापू मी कशी
लाट ग 'बना'
लाटू मी कशी
या गावचा त्या गावचा 'वाणी' नाही आला
कणीक नाही मला लाटू मी कशी
नाच ग 'सया'
नाचू मी कशी
या गावचा त्या गावचा 'मदारी' नाही आला
स्टेप्स नाही मला नाचू मी कशी
आउट ग 'कला'
आउट मी कशी
या अम्पायरचा त्या अम्पायरचा 'डीसीजन' नाही आला
आउट नाही दिला आउट मी कशी
लाज ग 'रेखा'
लाजू मी कशी
जनाची नाही मनाचीपण नाही
लाजच नाही मला लाजू मी कशी.
बोल ग माया
बोलू मी कशी
या गावचा त्या गावचा 'रायटर' नाही आला
स्क्रीप्ट नाही मला बोलू मी कशी.
(मंडळी आता अजून उखाण्याचा कार्यक्रम व्हायचा आहे. तो बहूदा मालिका सम्पल्यावर हूश्श...)
खी खी खी...
लै भारी रे केदार...:)
लै भारी!!
मस्तच रे केदार!! :):) आता उखाणे पण होऊनच जाऊंदेत!!
ही ही ही ही ही
केदार मस्तच रे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
उखाणे येवु देत लवकर
मस्तच रे केदार..:)
छानच जमलय रे..:ड
हे असं ही होइल बघ
ऑस्ट्रेलियन वर्तमान पत्र संडे टेलिग्राफच्या comments वाचल्यावर असंच म्हणावसं वाटतय
अस्सा भारत वाईट बाई
खोटेच खेळतो
आम्ही ऑस्स्सी सभ्यच बाई
घामच गाळतो
अस्सा भज्जी नाठाळ बाई
शिव्याच घालितो
अस्सा सायमंड्स देवच बाई
स्तूती ती करितो
अस्सा विरु वेडाच बाई
अपिल करितो
अस्सा पॉन्टिग शहाणा बाई
बोटच दावितो
अस्सा सचिन खोडकर बाई
माघारी परततो
अस्सा क्लार्क शांतच बाई
क्रिजेत थांबितो
असं अजून बरंच काही..:)
सहीच रे देवा
आयला मस्त पैकी एक भोंडल्याचा कार्यक्रम करता येईल.
मयूर, झकोबा, शैला धन्स.
मज्जा!
केदार, देवा, अगदी ह ह पु वा.
येउ द्या अजून.
देवा,केदार
देवा,केदार एकदम जबरि जमलय..
उखाण्याचा एक फुटकळ प्रयत्न
"समोरच्या कोनड्यात उभी व्हिंदमाता" च्या चालिवर उखाणा
"समोरच्या कोनाडयात उभे ICC
बकनर रावाचे नाव घेवुन ऑसिंचा नंबर पहिला."
जबरी केदार :)
केदार,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हे ही एकदम जबरी जमले आहे. 'मदारी' तर खतरनाक! कळायला जरा वेळ लागला
देवदत्ता तुझाही (हा सुद्धा) मस्त आहे.
जबरी!
नाच ग 'सया'
नाचू मी कशी
या गावचा त्या गावचा 'मदारी' नाही आला
स्टेप्स नाही मला नाचू मी कशी
हे एकदम LOL आहे!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खी खी खी ....
केदार : जबरी रे...
देवा : तुझा भोंडला पण मस्त
आम्हाला चांगली खिरापत मिळत आहे
visit http://milindchhatre.blogspot.com
आयला केदार
तू पण क्रिकेटवेडा का?????? असू दे असू दे. हे भन्नाट जमलंय पण. क्रिकेटपेक्षा त्याच्यावरची चर्चा आणि विडंबनं वाचण्यात लई मजा येते.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
और लिखते रहो........
धन्यवाद
धन्यवाद मंडळी
काल भारत जिंकल्यामूळे काहीसा गूपचूपच उखाण्याचा कार्यक्रम पार पडला (अर्थात ऑसींच्या मेक अप रूम मध्ये)
त्यातले काही उखाणे:
सोन्याच्या चूलीवर मातीचा तवा, 'सया' बाईंच्या केसात शंभर उवा
समोरून आला घुशींचा घोळका, त्यातून आपल्या ' एक बोट्याला' ओळखा
'रेखा' आमची धाकाची ,याद काढू नका बाई वाकाची.
आता शेवटचा उखाणा माया चा.
पर्थ च्या खेळ पट्टी वर लढत झाली तगडी.
बका - बना घालतात फूगडी आणि
'माया' बाई धूतात ऑसींची लूगडी.
हे भारी जमतय तुला
च्यामारी केदार, तुझ्यातले हे (अव)गुण आत्ताच कळले!
हहपुवा झाली
लई खास लिवलस र्रे भो!
आवडेश !!!
केदार पहिल्यांदाच तुझ्या पानावर आलेय. भोंडला आणि उखाणे दोन्हीही मस्त आणि देवदत्ताचेपण आवडले.
मस्तच
केदार लई भारी...![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
पण ते मदारी नाही कळल
रिकाम्या जागा भरा...
हरभजन --> सया (सायमंड्स) --> "____" --> मदारी
धन्स
धन्स लिम्बूदा, रूनी, सव्यसाची आणि स्वप्नील