ओरिगामी सुशी विथ मिंट डिपींग सॉस

Submitted by लाजो on 2 September, 2009 - 23:12
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

ओरिगामी सुशी साठी:
- राईस पेपर किंवा स्प्रिंगरोल रॅप्स - ४ ते ६ (साईजप्रमाणे),
- शिजलेला भात - २ वाट्या (खोली तापमानाला),
- फेटलेले दही - १ वाटी,
- लांब तुकडे (ज्युलिअन्स) केलेले गाजर + बीट - १ वाटी,
- आपल्या आवडीचे कुठलेही जर्द हिरव्या रंगाचे सॅलॅड (कोवळी पालकाची पाने, कांद्याची पातं इ) - १ ते दीड वाटी,
- बारिक किसलेले आले - १ टेबल स्पून,
- बारिक चिरलेली हिरवी मिरची - १ टी स्पून (आवडी नुसार कमी जास्त),
- चिरलेली कोथिंबीर - १ वाटी,
- चिरलेली पुदिन्याची पाने (ऑप्शनल) - १०-१२ पाने'
- मीठ आणि हिंग - चवीला,
- कोमट पाणी + पसरट डिश,
- सउशी मॅट किंवा किचन टॉवेल किंवा ताट.

मिंट डिपींग सॉस साठी:
- छिरलेली पुदिन्याची पाने - १०-१५ (आवडी नुसार कमी जास्त),
- चिरलेली कोथिंबीर - १ वाटी ,
- चिरलेली हिरवी मिरची - १ ते २ टी स्पून (आवडी नुसार कमी जास्त),
- बारिक किसलेले आलें - १ टी स्पून
- मीठ, लिंबु, साखर - चवीला.

IMG_1162.JPG

क्रमवार पाककृती: 

जपानी 'सुशी' हा प्रकार ऑस्ट्र्लिया त आल्यावर पहिल्यांदी ऐकला. नावावरुनच (नाक मुरडलेली बाहुली) हा पदार्थ जरा विचित्रच वाटत होता Happy . त्यातुन मी शाकाहारी त्यामुळे आत सीफुड भरलेला आणि सी वीड मधे गुंडाळलेल्या पदार्थाची चव घ्यायला मन नकोच म्हणत होतं. पण युनी मधल्या एका जपानी मैत्रिणी ने खास माझ्यासाठी शाकाहारी सुशी बनवुन आणली. तिने एव्हढा माझा विचार करुन सुशी आणली म्हणुन मी खाऊन बघितली. पण त्या बाहेरच्या सी वीड ची चव काही आवडली नाही. त्यामुळे परत कधी त्या सुशी कडे वळले नाही.

परंतु मागच्या काही वर्षात सुशी च्या दुकानांचे मॉल्स मधे फुटलेले पेव (हल्ली भारतात जपानी रेस्टॉरंटस, पंचतारांकित हॉटेल्स मधे सुशी मिळते) आणि दुकानात दिसणार्‍या सुबक आकाराच्या, हेल्दी सुशी बघुन काहीतरी आयडिया करावी असे वाटले. राईस पेपर चे सॅलॅड रोल्स मी नेहेमी करते पण त्याची सुशी बनवावी ही आयडिया मा बो च्या या स्पर्धेमुळे सुचली... Happy

IMG_1193.JPG

बरच झालं आता सुशी पुराण...चला तर ही घ्या पाककृती...

ओरिगामी सुशी:

१. शिजलेल्या भातात दही + आलं + चिरलेली कोथिंबीर + मिरची + पुदिना (ऑप्शनल) चवीला मीठ आणि हिंग घालुन घट्ट कालवुन घ्यावा.
२. गाजर + बीट यांचे लांब पातळ तुकडे (ज्युलियन्स) करावेत. तसेच आवडत्या सॅलॅड्स ची पाने लांबट चिरुन घ्यावीत.
३. एका पसरट ताटात कोमट पाणी तयार ठेवावे.
४. आता एक राईस पेपर घेऊन तो या पाण्यात अगदी ८ -१० सेकंद बुडवावा व मॅट/टॉवेल/ताटा वर ठेववा. साधारण अर्ध्या मिनीटात पेपर नरम होईल.

IMG_1167.JPG

५. त्यावर आता चित्रात दाखवल्याप्रमाणे कालवलेला भाताचा थर पसरावा. (थर फार जाड नको).
६. भाताच्या एका कडेवर (आपल्या बाजुला) गाजर + बीटाचे तुकडे पसरावेत.

IMG_1171.JPG

७. आता कागदाची आपल्याकडची बाजु उचलुन ती गाजर + बीटावर ठेऊन एक गुंडाळी करावी.
८. गुंडाळलेल्या भागावरती चिरलेल सॅलॅड घालावे व आपल्या डाव्या आणि उजव्या बाजुच्या पेपरच्या कडा त्यावर दुमडाव्यात.

IMG_1180.JPG

९. आता पेपर गुंडाळुन त्याचा रोल बनवावा.

IMG_1176.JPG

१०. या रोलच्या दोन्ही बाजुचे दुमडलेले तुकडे कापुन घ्यावेत व मधल्या रोलचे १ इंच जाडीचे तुकडे करावेत. तुकडे करण्यासाठी सुरी कोमट पाण्यात बुडवुन घ्यावी म्हणजे दही चिकटणार नाही व काप नीट होतिल.

IMG_1184.JPG

११. हे तयार तुकडे एका ताटात दमट (घट्ट पिळलेल्या) कपड्यावर ठेवावेत व वरुन परत एक दमट टॉवेल ठेवावा म्हणजे बाकीचे रोल्स होईपर्यंत भात कोरडा पडणार नाही.

IMG_1188.JPGमिंट डिपींग सॉस:

सर्व जिन्नस एकत्र करुन मिक्सरमधे चटणी करावी. थोडी पातळसरच अस्सवी म्हनजे सुशीला लावुन खाता येते.

आता ओरिगामी सुशी रोल्स, मिंट डिपींग सॉसबरोबर सर्व करावे.

IMG_1195.JPG

वाढणी/प्रमाण: 
२ ते ३ व्यक्ती.
अधिक टिपा: 

१. हा एक अतिशय हेल्दी पदार्थ आहे. राईस पेपर ग्लुटेन फ्री, फॅट फ्री असतो. भात ग्लुटेन फ्री असतो. दही लो फॅट चालेल. भरपुर सॅलॅड, गाजर असते त्यामुळे पचायला ही हलका Happy
२. यात आपल्या आवडी प्रमाणे सी फुड, मोड आलेली कडधान्ये घालता येतिल. सुशी ही शक्य्तो कच्चा पदार्थांचीच बनवतात पण आपल्याकडे कची सी फुड खात नाहित त्यामुळे उकडलेले प्रॉन्स, फिश चालेल.
३. राईस पेपर लहान मोठ्या साईजचे मिळतात. कुठलाही उपलब्ध साईज चालेल.
४. राईस पेपर च्या पाकिटावर गुंडाळी कशी करायची याची इंस्ट्रक्शन्स असतात (बहुतेक वेळा).

IMG_1165.JPG

५. भात कालवताना त्यात थोडा मिंट सॉस घातल्यास भाताला छान हिरवा रंग येइल.
६. भारतात राईस पेपर मिळाला नाही तर १ वाटी तांदुळाची पिठी + २ चमचे मैदा + मीठ एकत्र करुन ताज्या फेण्या वाफवुन त्याची वरिल प्रमाणे सुशी बनवावी...

IMG_1203.JPG

(हा माझा पहिला प्रयत्न आहे मायक्रोव्हेव मधे फेणी बनवण्याचा, त्यामुळे एव्हढी पातळ नाही झाली. पण सवयीने जमेल :)).

७. सुशी हा पदार्थ करायला अतिशय सोप्पा आहे (वरती मला लिहायलाच जास्त वेळ लागला) आदल्या दिवशी रोल्स करुन दमट कापडात गुंडाळुन फ्रिज मधे ठेवले तर आयत्या वेळेला कापुन १० मिनीटात उपहार तय्यार.

माहितीचा स्रोत: 
सुशी कशी करायची ह्याची नेट वरुन माहिती आणि माझे यशस्वी प्रयोग....
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त रेसिपी आणि फोटो. करुन बघते एकदा. पण इथे राईस पेपर मिळायची शक्यता जवळ जवळ शुन्य म्हणजे ते ही घरिच कराव लागेल

अगं सायो, फेण्या लाटायच्या नसतात गं.

पीठी + मैदा + चवीला मीठ असं एकत्र पाण्यात कालवायच. पातळ लापशी करायची. थाळीला तेलाचा हात लावुन त्यावर १ चमचा लापशी घालायची. आता थाळी गोल गोल उभी आडवी फिरवत ही लापशी थाळीभर पसरायची. मग कुकर मधे शिट्टी न लावता वाफवायची. पुर्वी माझ्या आईकडे फेण्या वाफवायचा स्टँड होता. आता बाजारात मिळतो की नाही माहित नाही.

मी काल मायक्रोवेव्ह मधे करुन पाहिल्या फेण्या. पहिल्या २-३ जास्त वाफवल्यामुळे त्यांचा पापड झाला पण मग अंदाज आल्यावर बर्‍या जमल्या Happy त्यातलिच एक फोटोत दिसत्येय....

अतिशय कल्पक! स्टेप बाय स्टेप फोटो दिल्यामुळे चटकन लक्षात पण येतंय. नुसतं वाचून फार अवघड वाटलं असतं. राईस पेपर बद्दल मला माहित नव्हतं. करून बघायला हवं एकदा... अगदी उरलेल्या भाताचं पण करता येईल!

अमेरिकेत राईस पेपर कुठल्या दुकानात मिळेल याची कुणाला कल्पना आहे का?

धन्स सखीप्रिया,
भात ताजा, शिळा कुठलाही चालेल. फक्त रुम टेम्प ला हवा म्हणजे नीट कालवला जाईल.
अमेरिकेत कुठल्याही एशिअन शॉप मधे राईस पेपर मिळेल. इथे तर सुपरमर्केट मधे 'एशिअन ग्रोसरीज च्या सेक्शन' मधे ही मिळतो.

सुमॉ, ट्रायल एरर मेथडनी एक तरी जमावी अशी इच्छा आहे Proud

लाजो, मायक्रो मधे कशा केल्यास? हाय पॉवर वर ठेवल्यास का? किती वेळ?

कविता,
माझ्याकडे मायक्रो मधे ठेवायचे इडली पात्र आहे. ते मी एकदाच इडल्या करायला वापरले. नीट जमल्या नाहीत म्हणुन ते पडुनच होते. पण काल मा बो गणेशोत्सवाच्या निमित्ताने या भांड्याचे पण भाग्य उदेले Happy असो.

तर या भांड्यात तळाला उकळते पाणी घालायचे त्यात कळशी-माठाखाली ठेवतात ना ती स्टील ची रिंग ठेवायची त्यावर लापशी पसरलेली ताटली ठेवायची. झाकण ठेवायचे पण त्याचे व्हेंट उघडे ठेवायचे. आणि मिडीयम पॉवर ला १ मिनीट फिरवायचे. माझा ११००W चा मायक्रो आहे त्यामुळे मिडीयम बस होते. कमी W चा असेल तर जास्त वेळ ठेवावी लागेल. अंदाजाने जमेल....

लाजो माझ्याकडे पण ते इडली पात्र पडुनच आहे. ते वापरता येईल त्या निमित्ताने. पण स्टिल रिंग मायक्रोत ठेवली तर चालेल का? फक्त मायक्रो सेफ्टी भांडी ठेवतात ना त्यात. आणि प्लेट कोणती ठेवलीस ग्लासची का?

आईशप्पत लाजो, मी कालच ही रेसिपी टाकणार होते. हा माझाही आवडता प्रकार आहे Happy
या सुशीबरोबर पीनट बटर+चिल्ली सॉस+सोया सॉसचे मिश्रण उर्फ थाई पीनट सॉस पण भारी लागतो.
बाकी फोटो आणि रेसीपी ए वन!
राईस पेपरसुध्दा घरीच केलेस!! आई ग.. खूप छान पातळ आले आहेत. मी एकदा मैदा नी तांदूळ पीठीचे पेपर दोसे घातले होते, पण विशेष जमले नाहीत.
सही रेसिपी, tempting...!

लाजो,
जबरदस्त रेसिपी आहे. आणि फोटोज तर अप्रतिमच आहेत...
मस्तंच गं. खूप कष्ट घेतले असशील आम्हाला ही माहीती उपलब्ध व्हावी म्हणून...

लाजो, अभिनंदन!

तुझ्या रेसिपीने केलेले सुशी रोल्स. काही ह्याच्यात भातात सोयसॉस आणि क्रॅब मीट घातल आहे.
फारच छान आणि पटकन होणारी रेसिपी आहे. सगळ्यांनाच खूप आवडले. थँक्स ग.

100_0635.jpg

लाजो, एकदम भन्नट रेसीपी. करुन बघायला हवी एकदा.
आणि फोटोपण एकदम खासच !!
पाककला स्पर्धेत बक्षीस मिळाल्याबद्दल खुप खुप अभिनंदन!! Happy

मनु, दक्षिणा, आर्च, फिओना... धन्यवाद Happy

मनु, दलिया ची आयडिया चांगली आहे Happy
दक्षिणा, मेहेनत फार नाही गं, पण नवर्‍यावर प्रयोग करुन बघितले आधी त्यामुळे त्याचे आधी कौतुक केले पाहिजे... Happy
आर्च, तुझ्या सुशी छान दिसतायत Happy लगेच करुन प्रतिक्रीया दिल्याबद्दल धन्यवाद Happy
फिओना, नक्की करुन बघ. केलिस की नक्की सांग आवडली का ते Happy

राईस पेपर ला स्वतःची अशी चव नसते त्यामुळे आपल्या आवडी प्रमाणे बदल करता येतात. ही एकदम व्हर्सटाईल रेसिपी आहे. व्हेज/नॉनव्हेज दोन्ही प्रकारे चांगली लागते.
परवा उरलेला पुलाव आणि पनीर टिक्का घालुन सुशी केली. सोबत मॅगी हॉट & स्वीट सॉस... सही लागली... Happy
मिच वेगवेगळे प्रकार करुन पहात्येय. तुम्हाला ही कोणाला नविन काही आयडिया सुचली तर नक्की लिहा... Happy

परत एकदा सगळ्यांचे धन्यवाद... Happy

Pages