आयपीएल २०२५

Submitted by ऋन्मेऽऽष on 25 November, 2024 - 10:32

लिलाव शेवटच्या टप्प्यात आहे. कोणत्या संघात कोण हे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे चर्चा सुरू करायला हरकत नाही. होऊन जाऊ द्या.. कोरबो लोरबो जिताबो रे.. दुनिया हिला देंगे हम.. व्हिसल पोडू Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे सचिन शंभरावे शतक करायला स्लो खेळला हे सत्य आहे. तसेच सचिन आणि कपिल यांनी आपली कारकीर्द सुद्धा लांबवली. हे काही आरोप नाही, की यावरून मुद्दाम त्यांना कोणी चिडवायला जात नाही. पण जे आहे ते आहे.

पण याने सचिनची किंवा कपिलची महानता काही कमी होत नाही हे देखील तितकेच खरे आहे.

असो, कोणत्याही आवडत्या थोर पुरुषाला, व्यक्तीला, खेळाडूला देव बनवले की मग काहीच विरोधात ऐकून घेता येत नाही याची कल्पना आहे Happy

जुरेलचा आजचा हेझलवूडसमोरचा खेळ बघून स्टार्क समोर तो...
>>>>
ज्युरेल आज सगळ्यांसमोर असाच खेळत होता. Bat वर बॉल च बसत नव्हता.
आणि त्यादिवशी हेटमायर सुद्धा होताच.
आणि हे दोघेच का बाकीचे सुद्धा असेच खेळत आहेत.
या लोकांना जिंकण्यात काही इंटरेस्ट नाही हे मला कळले आहे.

*आवडत्या थोर पुरुषाला, व्यक्तीला, खेळाडूला देव बनवले की मग काहीच विरोधात ऐकून घेता येत नाही याची कल्पना आहे * - असा थोर पुरुष हा देव नसून दगडच आहे हे ओढून ताणून दाखवण्याची कांहीं मूर्तीभंजकाना खूपच खुमखुमी असते, हेही तितकेच खरे !!!! Wink

>>राजस्थानचा फॅन म्हणून आता परत एकदा राजस्थानला मिड टेबल बघायची तयारी केलेली आहे..... प्लेऑफला वगैरे गेले तर तो सुखद धक्का असेल Happy
Submitted by स्वरुप on 27 November, 2024 - 18:06

सुखद धक्का मिळण्याच्या उरल्यासुरल्या अंधुक शक्यता काल राजस्थानने धुळीला मिळवल्या..... अनाकलनीय रिटेंशन्स, त्यातून पुढे गंडलेले ऑक्शन, रील्स बनवण्यात रमलेले खेळाडू, सुस्त सपोर्ट स्टाफ, द्रवीडबद्दल पूर्ण आदर राखून असे म्हणावेसे वाटते की sanga did much better job last few years!!
फॉर्ममध्ये असलेल्या सूर्यवंशीला बसवून impact sub specialist म्हणवणाऱ्या दुबेला खेळवत राहता की ज्याला आजपर्यंत एकदाही impact दाखवता आला नाही.... टोटली फ्लॉप ठरलेल्या देशपांडेला इतका long rope का? कॅप्टन्सीचा घोळ, गलथान फिल्डिंग, दिशाहिन बॉलिंग, पोस्टमॅचमध्ये अर्थहीन स्पष्टीकरणे, वेळीच चुकातून न शिकता त्या रिपीट करणे आणि सगळ्यावर कडी म्हणजे अत्यंत विचारशून्य व्युव्हरचना!!
राजस्थान ने यावेळी नेहमीपेक्षा जरा जास्तच निराश केले!!

जडेजाचा हातातला गोळा टाकला आता हर्षल पटेलने.
बॉल खाली येऊन उभे राहतात आणि सोडतात.
दर सामन्यात असे झेल सुटत असतात इंटरनॅशनल खेळलेल्या खेळाडूंकडून हे पचायला अवघड जाते.

असा थोर पुरुष हा देव नसून दगडच आहे हे ओढून ताणून दाखवण्याची कांहीं मूर्तीभंजकाना खूपच खुमखुमी असते >> Happy

राजस्थान ने यावेळी नेहमीपेक्षा जरा जास्तच निराश केले!! >> +१. द्रविड ने केले, एका होतकरू संघाचे झाले ह्याचे अधिक वाईट वाटते.

“ असा थोर पुरुष हा देव नसून दगडच आहे हे ओढून ताणून दाखवण्याची कांहीं मूर्तीभंजकाना खूपच खुमखुमी असते” - सहीं पकडे़ हैं! Happy

“ राजस्थान ने यावेळी नेहमीपेक्षा जरा जास्तच निराश केले!” - हो ना रे. मला वाटलं होतं कि बॉलिंग चांगली होईल. बॅटिंगमधे स्पेक्टॅक्युलर नसला तरी सॉलिड परफॉर्मन्स असेल. पण काहीच क्लिक नाही झालं.

14 ओवर 158-1 अशी स्थिती असताना पंजाब आधी फॉर्म नसलेला मॅक्सवेल (ते एकवेळ समजू शकतो) पण नंतर आफ्रिकन बॉलर Marco Jansen ला पाठवतात. दोघे मिळून 15 बॉल 10 धावा करून जातात. पाठीमागे josh Inglis, नेहल वढेरा, शशांक सिंग, ओमरझाइ वगैरे शिल्लक असताना... काय गणित करतात समजत नाही.

कोहली गेला...
आता सेलिब्रेशन कोण करणार... ये मेरा ग्राउंड है वाले

हो नंतर जाऊन मुद्दाम व्हिडिओसाठी केले जे सोमिवर फिरत आहेत. खेळताना सुद्धा राहुलशी मुद्दाम काहीतरी वाद घालत होता. उगाच जास्तीचे हातवारे. आणि स्टम्प माईकसमोर वाद. ते व्हिडिओ सुद्धा फिरत आहेत. सीन क्रिएट करतात टीआरपीसाठी Proud

आयपीएलच्या शेवटच्या टप्प्यात काही गमवायला नसलेले तळाचे संघ टॉप संघासोबत जिंकू लागतात.
राजस्थानचा सध्याचा खेळ बघून तरी तसे वाटत नाहीये आज. २१५-२२० आसपास जातेय टारगेट

जिंकले एकदाचे!! मस्त खेळले वैभव-यशस्वी.

एका पॉइंटला तेवातिया आणि पराग एकमेकांशी बोलत होते ते बघून गंमत वाटली. एके काळी दोघं राजस्थानचे फिनिशर्स होते.

Baby Boss
Really incredible..... काय कमाल बॉल पीक केले आज त्याने आणि जबराट पॉवर होती!!
This is how they should finish the game Happy

आजचा प्राथमिक अंदाज खरा ठरला..
पोरगा भारी खेळला पण.. जबरदस्त बॅट स्पीड आहे.. आता इथून पुढचे सामने त्यावर अंकुश लावायचे डावपेच सुरू होतील. बघूया पोरगा किती लवकर शिकतो. ट्वेंटी मध्ये येत्या काळात टॉप ऑर्डरला बेकार स्पर्धा होणार आहे. यशस्वी, सूर्यवंशी, गिल, साई सुदर्शन, प्रियांश आर्य, अभिषेक शर्मा... अरे हो.. संजू सॅमसन सुद्धा एक राहिला

कसला क्लीन हिटींग होती, सॉलीड पॉवर आहे! मजा आली. अभिशे - प्रियांश नि हा तिघे १-२-३ वर आले कि ताप असेल Happy

हर्श भोगले काही पण बोलत होता आज. इशांत शर्माला दुसर्‍या ओव्हर मधे ठोकले तेंव्हा म्हणाला १०० टेस्ट खेळलेल्या टेस्ट बॉलरची काही पत्रास ठेवली नाही. आता इथे टेस्ट चा काय संबंध ? नि इशांत कधी पॉवर प्ले मधे रन्स दाबून ठेवणारा बॉलर होता ? काही पण. आज सात इंटरनॅशनल बॉलर्स ना चोपलय पण Happy

आज सात इंटरनॅशनल बॉलर्स ना चोपलय पण
>>
विक्रम राठोड म्हणतो की नेट मधे जोफ्रा ला बाकी प्लेअर सांभाळून खेळतात, फक्त हा ठोकतो.

<<३५ बॉलात शतक. हा पोरगा खूप पुढे जाईल फक्त सचिनने मोठ्या मनाने सांभाळून घेतला पाहिजे.>>
माझ्याहि मनात तोच विचार आला.
जैस्वाल नि वैभव, दोघेहि बिन दाढी मिशांचे! भारतातलेच आहेत की परदेशी खेळाडू आहेत?
कारण भारतात दाढी मिशा असल्याशिवाय क्रिकेट खेळूच देत नाहीत म्हणे.

Pages

नवीन प्रतिसाद लिहा