Astrophotography शिकायची आहे.

Submitted by बोकलत on 1 April, 2024 - 02:01

नमस्कार मित्रांनो. मला astrophotography शिकायची ईच्छा आहे. कसं सुरू करू कळत नाहीये. तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे. धन्यवाद.

Group content visibility: 
Use group defaults

बोकलत जी, आज योगायोगाने परत आलात की आजच्या तारखेचा महिमा.. मागे तुम्ही माबो सोडताय असे कुठेतरी वाचले होते

असो, astro photography साठी बरीच माहिती ऑनलाइन उपलब्ध आहे, YouTube वर ही अनेक व्हिडिओ आहेत. I guess तुम्ही ते आधी बघितले असतीलच, नसतील तर आता बघा. पुण्यात अनेक amature photography clubs आहेत, त्यांना जॉईन करू शकता म्हणजे प्रात्यक्षिक ही होईल.

तसेच पुण्यात ज्योतिर्विद्या परिसंस्था (JVP) आहे, त्यांना संपर्क करा. त्यांचे astronomy che सेशन्स होत असतात, त्यात तुम्हाला फोटोग्राफीची संधी मिळेल आणि लोकांशी ओळख ही होईल. निरभ्र आकाशाच्या शुभेच्छा.

मी खरोखरच मायबोली सोडले. मी कुठल्याच धाग्यावर प्रतिसाद देत नाही. आता पण इथे माहिती मिळवण्यासाठी आलो आहे असो प्रतिसादासाठी दोघांचे आभार.

बोकलत, पुण्यात असलात तर ३ ते ५ मे दरम्यान ज्योतिर्विद्या परिसंस्थेचा वर्कशॉप आहे astrophotography चा. तुम्हाला हवे असतील तर मला डिटेल्स कळले की कळवते.

मी मुंबईत आहे पुण्याला जाणं सध्या शक्य नाही होणार. 6-7 ला stargazing mumbai सोबत आकाश निरीक्षणाला जाणार आहे भंडारदऱ्याला. त्यात बेसिक फोटोग्राफी शिकवतील मोबाईलवरून. अजून पुढे advanced लेव्हल शिकायची ईच्छा आहे.

मी मुंबईत आहे
>>>
मुंबईत खगोल मंडळ आहे, त्यांना संपर्क करा.

मी खरोखरच मायबोली सोडले. मी कुठल्याच धाग्यावर प्रतिसाद देत नाही. आता पण इथे माहिती मिळवण्यासाठी आलो आहे
>>>
नो प्रोब्लेम बोकलतजी, तुमच्या कॉमेंट आणि अमानवीय किस्से मजेशीर असतात, वाचक म्हणून त्या मिस करतोय, बाकी काही नाही.

खगोल मंडळात हे होत नाही. आकाशदर्शन होते.
मुंबईतून हा छंद करणे अवघड आहे. स्वच्छ अंधारी आकाश मिळणाऱ्या जागा खूप दूर आहेत. सर्वच मोठ्या शहरांचा विस्तार वीस किलोमीटर वाढला आहे.
तशा जागा सापडल्यावर उपकरणे हवीत. Camera , tripod (strong and heavy). डास चावू नयेत म्हणून उपाय.

खगोल मंडळात हे होत नाही. आकाशदर्शन होते.
>>>
बरोबर, पण तिथे समविचारी लोकांशी ओळख होऊ शकते जे astrophotography करतात. त्यांच्या सोबत फोटोग्राफी प्लॅन करता येऊ शकते.

बोकलत welcome back
तुमचे प्रतिसाद वाचनीय असतात

फोटोतले लाल ठिपके म्हणजे बरोबर नाही.( Noise). जागा चांगली आहे, प्रयत्न चांगला आहे पण यंत्र बरोबर नाही. Camera मध्ये सेन्सर टाईप CM0S असणारे बरेच असतात ते विडिओसाठी चांगले. CCD सेन्सर पाहिजे आकाशाच्या फोटोसाठी.

धन्यवाद कुंतल. अलीकडे नवीन काही लिहिणं झालं नाही. काही लिहिलं तर कॅलिग्राफी पेजवर पोस्ट करेन.
धन्यवाद srd. हा raw फोटो आहे. थोडाफार एडिट केलाय. गेलेलो तिथे पण लाईट पोल्यूशन जरा वाटत होतं. एक जण Dslr घेऊन आला होता त्यात चांगले येत होते फोटो. कुठला फोन चांगला राहील काही सुचवाल का?

चंद्राचा फोटो चांगला आला आहे.
चांगले कॅमेरे असतात पण एवढा खर्च करणे विचार करा. 'SMART photography ' चे सर्व अंक Jionews app वर {फुकट} पाहता येतात. त्यातून सध्याचे कॅमेरे आणि फोटोग्राफी लेख पाहा. (पूर्वी Better photography चे अंकसुद्धा होते.)

यासंदर्भात हे एक चॅनेल दिसलं युट्युबवर

Chuck's Astrophotography : https://www.youtube.com/@ChucksAstrophotography

नुकत्याच झालेल्या सूर्यग्रहणाच्या वेळी या चॅनेलवर ग्रहण छान दाखवलं त्यानं.

खगोल फोटोग्राफी हे एक खर्चिक प्रकरण आहे. पण थोड्या फार खर्चात त्याचा आनंद घेऊ शकतो. यात काही सगळ्यात बेसिक गरजेच्या गोष्टी आहेत.

१. मॅन्युअल मोड असलेला कॅमेरा किंवा फोन
२. लॉन्ग एक्सपोजर
३. वाइड अपार्चर असलेली लेन्स f/२ किंवा f/१.४ असेल तर उत्तम
४. वाइड अँगल असेल तर उत्तम १५mm किंवा कमी
५. प्रकाश प्रदूषण कमी असलेली जागा

या भांडवलावर बऱ्याच प्रमाणात खगोल फोटोग्राफी होऊ शकते. सुरुवात असेल तर ५ ते ३० सेकंद एक्सपोजर ने ८०० ते १००० iso ला कमीत कमी f आणि कमीत कमी mm च्या लेन्स ने अगदी किट असेल तरी चालेल काही फोटो काढून पाहा.

बाकी मग टेलिस्कोप, अर्थ रोटेशन ट्रॅकर, स्टॅकिंग वगैरे वाढीव खर्चिक स्टेज आवड तयार झाली तर जाऊ शकता.

सगळ्यांना धन्यवाद,
@मामी, चेक करतो हे युट्यूब चॅनल लिंकसाठी धन्यवाद
@चिडकू, हो खर्च खूप आहे, सध्या तुम्ही म्हटल्याप्रमाणे बेसिक सुरू करणार आहे.डिटेल्ससाठी धन्यवाद.
@srd, dslr कॅमेरा मला वापरता येत नाही, मी मोबाईल कॅमेरा कुठला चांगला आहे ते विचारात होतो. धन्यवाद.
@हपा, अमावस्या असून पौर्णिमेच्या चंद्राचा फोटो टाकलाय म्हणजे मी कसा कुठे जाऊन काढला असेल? हे असलं भयंकर अमानवीय काम फक्त मीच करू शकतो.

Samsung s23,24 वगैरे किंवा apple iphone चे नवीन १४/१५ वगैरे. त्यात samsung बरे कारण फाईल ट्रान्स्फर करणे आणि मेमरी कार्ड/ ओटीजी यात आइफोनला मागे टाकतात.

पण डिएसएलारची जागा भरणे अवघड आहे. मोबाईल कॅम्रऱ्यांनी स्वस्त डिजिटल कॅमरांना बाहेर ढकलले असले तरी प्रोफेशनल फोटोग्राफीसाठी कामाचे नाही.

हा विडिओ पाहा आगामी काळात कमी किंमतीत चांगले मोबाईल कॅम्रे येतील.
https://youtu.be/gs22E2n6WLo?si=VBTlGDdUVYmYc2VJ

( 0ppo, Vivo, one plus , realme या सर्व एकच कंपन्या आहेत.)

आज सकाळी पाच वाजता आकाश स्वच्छ होतं. गुरु वृषभ राशीत दिसत होता, आणि ओरायन तारकासमूह नुसत्या डोळ्यांनी ठळकपणे दिसला. गुरूच्या अगदी जवळ मंगळासारखा एक तारा होता. सुरवातीला वाटलं तो वृषभ राशीतला एखादा तारा असावा पण हळूहळू तो गुरूपासून दूर जात होता ते काय होतं नक्की समजलं नाही.

बोकलत
मला वाटतंय तुम्ही बहुत करून एलन मस्क ने अनेक उपग्रह सोडले आहेत त्या पैकी एकाचे दर्शन घेतले असणार. ह्या Starlink satellites बद्दल रुची असेल तर ही लिंक घ्या.
https://www.sciencealert.com/new-starlink-satellites-third-as-bright-but...
पूर्वी पेगॅसस नावाचे उपग्रह होतो. आम्ही त्याच्या दर्शनावर घड्याळे लावत असू.

Pages

नवीन प्रतिसाद लिहा