चित्रकला
गणपती
मा हाजीनी दर्गा
व्हिन्सेंट नावाची प्रेमकथा - साजिरा
एकवीस वर्षांचा व्हिन्सेंट उर्सुलावर प्रेम करू लागला होता. नाजुक, हसतमुख उर्सुला एका पाद्र्याची पोर होती. लंडनच्या त्या घरात तो भाड्याने राहत होता आणि थोर चित्रकारांची चित्रं विकण्याच्या दुकानात काकाच्या ओळखीने नोकरीला लागला होता. या वयात असं काही झालं की सारं आयुष्य रसरसून फुलून आल्यागत वाटतं, तसंच त्याचंही झालं. उर्सुला मात्र काही गावीच नसल्यागत त्याच्याशी वागत होती.
शुभेच्छापत्र - रमा - किल्ली
रमाचं ग्रीटिंग कार्ड बनवायचं म्हटल्यावर आधी लाजून, नाचून गाल गुलाबी होईपर्यंत हसून झालं. मग मामाचा बड्डे येणारे म्हणून त्याचे नाव लिहायचं ठरलं होतंच तिच्या बंधू राजांच्या सांगण्यावरून.
आज शाळेतून आल्यावर तिने काल कागद क्लाऊड च्या आकारात कापला होता त्याला निळी बॉर्डर दिली, नेहमीप्रमाणे आवडतं इंद्रधनुष्य काढलं. स्टिकर ची फुलं चिकटवली आणि मधल्या भागात ठसे उमटवले.
Yellow वर हिरवं छान दिसेल असं तिनेच सांगितलं आणि जमतील तेवढे ठसे मारलेत. सकाळची तीच भेंडी कामाला आली.
आता मामा खूप खुश होणारे म्हणून हिचंच टाळ्या वाजवून उड्या मारून झालं
शुभेच्छापत्र - ओम - किल्ली
ग्रीटिंग कार्ड म्हणजे बड्डे ला द्यायचं गिफ्ट असा एक नियम आहे आमच्याकडे.
ज्यांचा बड्डे येणार आहे ते विचारून घरात मिळेल त्या कागद पुठ्ठा इत्यादीवर रंगीबेरंगी इंद्रधानुष्य आणि एक गर्ल काढून आमचं ग्रीटिंग सुमारे साडेतीन मिनिटात तयार होतं. जेव्हा ओम ला मी सांगितलं की शुभेच्छापत्र बनवायचं आहे, त्या कामासाठी अर्धा रविवार खर्ची पडला, राडा, झाला
काहीही productive output आलं नाही दोघांकडून, माझा संयम संपल्यामुळे मी सगळं गोळा करून ठेवून दिलं उद्या बघू म्हणून.
लहान मुलांसाठी कला उपक्रम : माझा आवडता लोगो - रद्द करीत आहोत.
कॉपीराइट कायद्याचा भंग होत असल्याने हा उपक्रम रद्द करीत आहोत.
कृपया प्रवेशिका प्रकाशित करू नयेत.
रंगीत पेन्सिल्स - Bird Head Study
कॅलिफोर्निया सोडून दोन महिने होतील आता पण पक्ष्यांची आठवण आली नाही असं होत नाही. त्यातल्या काही पक्ष्यांचा Head Study करावासा वाटला. त्या रंगीत पक्ष्यांची त्यानिमित्ताने पुन्हा उजळणी झाली. त्यांचे व्हिडिओ पुन्हा पाहिले.
Faber Castell Polychromos & Prismacolor colored pencils
Fabriano Mixed Media paper
Muji मध्ये एक खूप छोटे पण सुरेख क्वालिटीचे शार्पनर अचानक सापडून गेले. पेन्सिलीला हवा तसा पॉईंट आला की स्केचिंगमधली मजा दुपटीने वाढते.
रंगीत पेन्सिल्स - Interwoven
पानगळीनंतर निष्पर्ण झाडांचं आंतरीक सौंदर्य दिसू लागतं. खोडं, त्याच्या विविध जाडी, उंची, सालांचे पोत, रंग, काय आणि किती बघाल. पावसात बाहेर पडलं तर काही खोडं, फांद्या तासल्यागत गुळगुळीत आणि म्हणून सुरेख चकाकी मिरवतात. तर काही अशक्य खडबडीत. भरपूर फोटो घेऊन ठेवलेत ह्या गोष्टींचे. स्केचिंगसाठीचा हा सबजेक्ट बराच काळ डोक्यात होता. त्यातल्या एकाच्या फांद्या खूप फाटे फुटलेल्या पण तरीही एकत्रित गुंतलेल्या.
Interwoven
Polychromos Artists' Color Pencils.
Strathmore 300 series artist paper.
झेंटँगल (Zentangle) - २
झेंटँगल (Zentangle) - पार्ट २
हा कोणताही कठीण चित्रकलेचा प्रकार नसून, मन शांत करण्यासाठी आणि एकाग्रता वाढवण्यासाठी वापरली जाणारी एक सोपी पद्धत आहे