
वारली विवाहाचे चित्रण
वारली समाजात लग्नाच्या वेळी वारली स्त्रिया ह्या चित्रांनी आपल्या घराच्या भिंती सजवतात.
मध्यभागी देव चौक आहे आणि त्यात 'पालघट' देवी आहे जी लग्नात उपस्थित आहे असे ते मानतात. ती मातृदेवता तसेच प्रजोत्पत्तीची देवता म्हणून पण ओळखली जाते. धार्मिक विधीच्या पूर्तीसाठी याचे चित्रण करतात. चित्र काढताना वारली स्त्रिया या देवीची स्तुती करणारी गाणी म्हणतात. हिचे चित्र काढल्याशिवाय वारली लोकांचा लग्नविधी पुर्ण होऊ शकत नाही.
आणि डाव्या बाजूस लग्न चौक आहे आणि त्यात 'पाच शिर्या' या देवतेचे चित्र.
खाली घोड्यावर नवरा नवरी आणि आजुबाजुला बेधुंद नाचणारे वाजंत्री आणि वरात.
तसेच आजू बाजूला झाडे आणि मोर नृत्य, कर्हा घेऊन जाणार्या स्त्रिया ईत्यादी.
छान आहे चित्र आणि तु लिहिलेली माहिती देखिल
मला काहीच माहिती नव्हती आधी.
सुंदर चित्र. माहितीही छान.
मी या चित्राना अशी बॉर्डर कधी बघितली नव्हती. त्याने चित्राला छान उठाव आलाय.
सुरेख आलय चित्र.
मस्तच आहे चित्र. तू काढलेयस ना.
)
वारली पेंटींग्स त्यांच्या साध्या पण निरागस सौंदर्यानं नेहमीच भुरळ पाडतात.
यातले डीटेलिंग खूपच बारीक आणि उठावदार झालेय. इतके मी पाहिले नव्हते कधी.
(विशेषत: देव चौक)
हे तू एखादे ग्राफिक टूल वापरून केलेयस का? कारण रेषांची मोजमापं परफेक्ट दिसतायत.
(मला फारसं कळत नाही चित्रातलं तरी, कसलाही आगाऊपणा मायबोलीवर (च फक्त) खपवून घेतला जातो म्हणून इतकं सगळं.
छानच आहे चित्र... रंगसंगती छान... माहितीही उद्बोधक
अशीच माहितीपूर्ण चित्रं काढत जा..
मस्तच ग
आणि माहितीपण छान दिली आहेस.
अगदी सुबक, रेखीव आणि सुरेख चित्र नीलू! आणि माहिती सांगितलीस ते फारच चांगले केलेस.. कारण असले बारकावे सांगितल्याशिवाय कळत नाहीत..
मोर फार सुरेख आलाय आणि वरातीतली लोकंही
सकाळपासून मला मायबोलीवरची कुठलीच चित्र दिसत नव्हती. इथल्या नुसत्याच कॉमेंट्स वाचून मी वारली चित्र बघायला अगदी अधीर झाले होते. किती वेळा मी इथे येऊन गेले शेवटी आत्ता दिसलं चित्रं. खासच आलंय चित्र आणि माहीतीही सुंदर दिली आहेस. किती परंपरा आणि संस्कृती चित्रातून जगासमोर नेता येतात ना....
सुरेख. माझ्या आवडता प्रकार वारली. इथे तर इतकी मागणी आहे ना या चित्रांना. खुप famous झाली आहे हि art इकडे. याच श्रेय हे एका वारली artist ला जात. त्याच नाव आठवेना आत्ता. पण त्याने पहिले मोठे exhibition कॅनडाला भरवले होते.
सध्या मी एक african painting करतेय. very similar to वारली आर्ट. फक्त figures sketches freehand मधे काढल्यासारखे असतात. रंगांचा भर्पुर वापर. खुप सहिइ दिसतात हि paintings पण.
सर्वांचे प्रतिसादासाठी धन्यवाद!!
मी हे कोरलड्रॉ मध्ये बनवलय.
वारली चित्र काढणे आणि त्यातही आपण काय काढतोय हे समजावून घेऊन मग काढणे हे जास्त आनंददायी आहे. मला स्वत:ला वारली चित्र काढणे खूप आवडते. त्यांच्या चित्रातील बारकाव्यात आपणही काही ऍड केले तर ते अजून छान दिसते ना:)
दिव्या.. जीवा सोमा म्हशे हे आहे का त्या वारली चित्रकाराचे नाव?? त्यांची लंडन, पॅरीसला बरीच प्रदर्शन भरली होती ना?
संघमित्रा.. अगं आगाऊपणा कसला..माहिती हवी तर बिंधास्त विचारावं की
दिनेशदा.. मूळ वारली चित्रांमध्ये अश्या चौकटी नसतात.. ही माझी भरः) पण मुळात त्यांचे आकार आणि मांड्णीच सुरेख असतात.
नीलु,

:) 
अतिशय सुंदर चित्र आहे....
माका माहीत नव्हते तु एवढी मोठी artist आहेस ते!
बहोत खुब!!!
बरोबर नीलु, जीवा सोमाच. अप्रतिम काढलीत त्याने चित्र. आणि खुप गरीब माणुस आहे.
छानच आलंय गं चित्र.
मला वारली शिकायची खूप इच्छा आहे.मधे पुण्यात होते तेव्हा "सकाळ्"मधे छोटया जाहिरातींमधून शोधले होते क्लासेस्,पण वेळेअभावी नाही जमलं.मला प्रामाणिकपणे वाटतं की लोककला स्थानिक कलाकारांकडून शिकाव्यात,त्यामागचे विचार कळतात,पण ते कितपत शक्य होईल माहिती नाही.
तुला एक विनंती,तू काही बेसिक शिकवू शकशील का जमेल तसं इथे किंवा ब्लॉग वर वगैरे,मिनोतिनी जसा शिवणकामाचा सुरेख ब्लॉग केलाय तसा?अशी विनंती हक्कानी मायबोलीवरच करता येते फक्तः-),म्हणून धाडस करतेयः-).अर्थात,तुला शक्य असेल तरच..
माहितीदेखिल देता आली तर उत्तमच,खरा आनंद लुटता येतो.
अशीच सुरेख चित्रं काढत रहा..
अर्रे वृषाली ही तर बेस आयडीया आहे.
मागे मला अजय यांनी पण हयुमन फिगर् चे प्रपोर्शन विषयी माहिती टाकायला सांगितलेली तेही डोक्यात होते. मला जेव्हढे माहित आहे तेव्हढे मी नक्कीच तुम्हाला सांगुन शकेन. आणि वारली चित्रकला शिकणे तर खूपच सोपे आहे. काही बेसिक आकार आहे त्यात.. त्याचाच वापर सर्व मांड्णी मधून बहुतेककरून केला जातो.
)
मी नक्कीच असं काही लवकर चालू करीन...
दिव्या तुझे आफ्रिकन पेंटीग्ज दाखव लवकर...पहायची उत्सुकता आहे.
व्वा.. मस्तच असा गो.. माहिति देउन माझे अज्ञान कमी केलस ता बरा झाला..
नाहितर माका वारलि चित्रे तशि समजत नाय..
नेहमीप्रमाणेच अप्रतिम चित्र आणि मस्त माहिती
http://milindchhatre.blogspot.com
मस्तच काढलय चित्र. झोपडीचे कुड गेरुने रंगवुन त्यावर काढलेली हि चित्रं प्रत्यक्षात पाहिली आहेत पण त्यांचा मतितार्थ समजला नव्हता. माहितीबद्दल खुप आभार.