मायबोली: खरेदी सुविधा आता भारतातही.

http://kharedi.maayboli.com
ऑनलाईन पुस्तक खरेदी
गेली काही वर्षे परदेशस्थ मराठी वाचकांसाठी उपलब्ध असलेली ही सुविधा आता भारतातही चालू करत आहोत.

म्हणजे नेमकं कायः
१. तुमच्या भारतातल्या नातेवाईकांना पुस्तके भेट पाठवू शकता.
२. तुम्ही जर भारतात असाल तर घरबसल्या कुरीयरद्वारे पुस्तके मिळवू शकता.

सध्या शिपींग आणि पुस्तकांच्या किंमती USD मध्ये दिसत आहेत. त्या लवकरच भारतीय रुपयांमध्ये पण दिसतील.

Submit to kanokani.com

ही सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रशासकांचे आभार. स्मित
मायबोलीवर सध्या सर्व आघाडीच्या प्रकाशनांची पुस्तकं उपलब्ध आहेत. सर्व मायबोलीकरांनी या सोयीचा लाभ घ्यावा, ही विनंती..

लै भारी! बेष्टच!

अहाहा !! हे फारच उत्तम !! खूप धन्यवाद. चिनूक्साच्या आवाहनाला पाठिंबा.

    ***
    जळल्यावर उरते एक शेवटी राख / ती फेक विडी तोंडातील काडी टाक
    जळण्यातच आहे गंमत वेड्या मोठी / दिव्यता अमरता मायावी फसवी खोटी (- रॉय किणीकर)

    दिवसभरातली सर्वात उपयोगी माहिती. स्मित धन्यवाद अ‍ॅडमिन.
    --------------
    नंदिनी
    --------------

    ही व्यवस्था नक्कीच उपयुक्त आहे. धन्यवाद अ‍ॅडमिन !

    अरे वा. हे एकदम मस्तच झालं आता.

    अरे वा वा..... ये हुई ना बात. हे एकदम बेस्ट काम केलेत तुम्ही अ‍ॅडमिन.
    आजच पुस्तकं ऑर्डर केलीत.

    आजच खरेदी पण केली. सोयीबद्दल आभार.

    वा मस्त. म्हणजे आता रंगिबेरंगी भारतातून पण विकत घेता येईल!
    ----------------------
    हलके घ्या, जड घ्या
    दिवे घ्या, अंधार घ्या
    घ्या, घेऊ नका
    तुमचा प्रश्न आहे!

    वाह तसेच मालिनी राजुरकर यान्च्या सी डी वगैरे? शक्य अस्ल्यास.

    आभार हे उपलब्ध करून दिल्याबद्दल.

    मायबोलीवर उपलब्ध असलेल्या पुस्तकांना मायबोलीकरांनीच लिहीलेल्या परीक्षणांची लिन्क देता येइल का? अ‍ॅमेझॉन वर असतात तसे रिव्यूज लगेच वाचता येतील.

    अर्रे, सही काम केलंत अ‍ॅडमिन टीम! धन्यवाद! धन्यवाद! धन्यवाद! स्मित

    धन्यवाद

    किंमती अजूनही डॉलर्स मध्येच दिसतायत अरेरे.

    वाह हे मस्त झालं.

    अजूनही डॉलर्सच अरेरे

    अ‍ॅडमीन टीम, किंमती अजूनही डॉलर्स मध्येच दिसतायत.
    कृपया रुपयांमध्ये किंमती प्रकाशित कराव्यात, ही विनंती.

    मी गेल्या आठवड्यात 'वेदार्थ निर्णयाचा इतिहास' मागवलेले आहे... पुस्तके शिपने निघाली आहेत, असा इ मेल २-३ दिवसांपूर्वी आला आहे... पैसे मात्र डॉलरमध्येच दिसत होते.

    किंमती अजूनही डॉलरमध्येच दिसताहेत. अरेरे

    भारतातून खरेदी केली तर काही भारतीय बॅंका ० ते ४% अधिभार लावतात असे लक्षात आले आहे. ते ज्या बॅंकेचे कार्ड आहे त्यावर अवलंबून आहे. भारतातल्या मायबोलीकरांना हा जास्तिचा भूर्दंड पडू नये म्हणून काही करता येईल का यावर प्रयत्न चालू आहेत. म्हणून आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागतो आहे. तुम्हाला हा अधिभार देणे शक्य असेल किंवा तुमची बॅंक अधिभार लावत नसेल तर आतासुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. आता सध्याही भारतातून खरेदी चालू आहे.

    पुस्तके सुस्थितीत १५ दिवसापूर्वीच मिळाली... स्मित छान सोय आहे.... शिपिंगचे ३ डॉलर पण फार नाहीत... पुण्यात पुस्तक शोधत फिरताना रिक्शाचे बिल याच्यापेक्षा जास्त झाले होते! अरेरे