माझे रीव्हर्स लेन्स चे प्रयोग

Submitted by ultimatebipin on 29 June, 2009 - 00:29

मी रीव्हर्स लेन्स बद्दल ऐकले होते पण प्रयोग केले नव्ह्ते...
त्यात माझ्याकडे प्रिमे फिक्स लेन्सही नाही तरी १०५ एमएम फिक्ष लेन्सवर १८-५५ हाताने धरून हे फोटो काढायचा प्रयत्न केला आहे १०५एमएम मुळे DOF फार म्हण्जे फारच कमी झाला आहे अगदी आपण स्वास घेतांनाच्या होतांनाची मागे पुढे होणार्‍या हालचाली मूळे सुद्धा फोकसिंग मध्ये मी गंड्त होतो .
हे फोटो काही खास आलेले आहेत असे नाही तरी राहवत नाही म्हणून हे टाकतो आहे.
बघा आवडले तर... नाही तर नाही आवडले म्हणून तसंही सांगा निसंकोचपणे ....!

IMG_6032.jpgIMG_6113.jpgIMG_6131.jpgIMG_6144.jpgIMG_6145.jpgIMG_6153.jpgIMG_6160.jpg

गुलमोहर: 

बिपिन यावर उपाय म्हणजे लेंस कपलर वापरणे, तसेच वाइड ओपन अपर्चर पेक्षा साधारण मधले अपर्चर वापरायचे. मात्र त्यामूळे फ्लॅश वापरावाच लागतो, फोटो वॉश आउट व्हायचे टाळण्यासाठि फ्लॅश समोर डिफ्युजर लावावा. मी ही अशीच कामचलाऊ रीव्हर्स लेंस मॅक्रो वापरुन काहि फोटो काधले होते त्यातले काही मायबोलीवर पोस्ट केले होते.
तो फ्लिकर अल्बम इथे पहा
http://www.flickr.com/photos/p_ajay_p/sets/72157602213723487/

अजय , तुमचे फोटो अफाट्च आहेत आणि हे वर लिहायचे विसरलोच की मी हा उद्योग तुमचे फोटो पाहील्यानंतरच केला आहे. तुम्ही दिलेली फ्लिकर लिन्क मी आधीच बघितली होती त्यावरुन प्रेरणा घेऊनच हे फोटो काढले आहेत.
ह्याचे क्रेडिट तुम्हालाच आहे.
तुम्ही सांगितलेल्या क्लुप्त्या वापरुन पुढचे फोटो काढुन बघतो. ... पण मी तुमच्या कित्येक मैल मागे आहे....

मस्तच!
नेटवर थोड वाचलं reverse lens technique.
माक्रो लेन्सला हा सोप्पा पर्याय आहे. अजुन एक लेन्स घ्यायची/वागवायची गरज नाही... पण फोटो घेणं पण तितकसं सोप्प नाही
अजुन काही फायदे आहेत का या technique चे?

अजय, आपले फोटो पण मस्त आहेत. माहितीबद्दल आभारी आहे.

सही ! अजय,बिपीन आणि सॅम धन्यवाद ! Happy

पहिला फोटो झकास!

झकास आलेत यार फोटो. माझ्याकडे "पेंटॅक्सची" "बेलोस" लेन्स आहे जिने अत्यंत जवळून कॉपीइंग करता येऊ शकतं. फार क्वचित वापरलीय.

उत्तम !!

मला कुणाचंही वावडं नाही
चांगल्याला चांगलं म्हणावं; शक्य त्याला सुधारून पहावं
कुणी ऐको वा न ऐको; कांहीही करो; मात्र आपण अलिप्त रहावं