सखे, तू

Submitted by चंद्रहास शास्त्री on 27 April, 2024 - 02:34

सखे, तू
- चंद्रहास शास्त्री
मात्रा = १७

मी कुठे मागतो सर्वकाही, द्यायचे तेवढे दे सखे तू
मी कुठे देतसे सर्वकाही, घ्यायचे तेवढे घे सखे तू.

मी कुठे सांगतो सर्वकाही, तू कुठे ऐकते सर्वकाही
मी कुठे म्हणतो तुला जराही, ऐकायचे ते ऐक सखे तू.

तकरार नाही इकरार हवा, आपलासा एक मितवा हवा
प्रेमाचा असा चांदवा हवा, रहायचे तसे रहा सखे तू

दुःख होतां रडायला खांदा, सुख वाटतां सांगायला सखा
आठवायला एक वाटाड्या, यायचे तेव्हाच ये सखे तू

मागणे काही नाही माझे, मी जसा आहे बराच आहे
फक्त लक्षात ठेव इतकेच तू, मी तुझा सखा माझी सखे तू

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults