मधुर स्मित कान्ह्याचे पाहून द्रवे त्रिभुवन

Submitted by Meghvalli on 21 March, 2024 - 01:12

उन पावसाचा खेळ, विहंगम दॄष्याचा नजारा
मोर नाचतो रे दुर बनांत, फुलवुन पिसारा
सण सण वाहे वारा, विज कडाडे अवचित
जग न्हाऊन निघाले त्या रुपेरी क्षणांत
आले मेघांचे कळप डोंगर माथ्या वरुन
बरसवित जल धारा झर झर सर सर
जल वाहे नागमोडी घेऊनी खडकांचा आसरा
इवल्या ओहळाचा झाला मोठा केवढा पसारा
सॄष्टी बहरुन आली. पाखरे पावसात न्हाली
धरणी च्या अंगावर ही काय जादू झाली
अरुण पाहे डोकावून .त्याला आढावा आला काळा मेघ
आकाशांत उमटली एक विलक्षण इंद्रधनू रेघ
मैफिल बेडकांची पहा हो भरली शेतांत
गाण्यांत त्यांना आता सर्व कीटकांची साथ
दूर दऱ्यांतून येती कुणाच्या बासुरी चे सूर
कान्हा शांत पहुडून आळवतो मेघ मल्हार
हृदयी घालमेल, शोधे यशोधा कान्ह्यास सर्वत्र
कान्हा खेळतो गोवर्धनी जमवून सर्व गोप मित्र
कान्हा वाजवी बांसुरी, फुके सृष्टीत प्राण
गायींच्या गळयांत वाजे घंटा किण किण
सृजन हे कान्ह्याचे ,सोहळा पाहती स्वर्गांतून
मधुर स्मित कान्ह्याचे पाहून द्रवे त्रिभुवन
मधुर स्मित कान्ह्याचे पाहून द्रवे त्रिभुवन

अजय सरदेसाई (मेघ )
गुरुवार , १७/०३/२०२२
१०:२५ AM

https://meghvalli.blogspot.com/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडली.
सृजन ( s + R+u+ j+a+n+a) असा शब्द हवा मला वाटतं.
चित्र मस्त आहे.