आयपीएल २०२४

Submitted by स्वरुप on 19 March, 2024 - 14:01

सालाबादप्रमाणे स्पर्धा सुरु होतेय आणि धम्माल करण्यासाठी धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-२०२४ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सॉलिड झाली मॅच!! आधी विको आणि नंतर लोमरोर-कार्थिक, जबरदस्त खेळले. बेअरस्टॉ ला बहुतेक शांत झोप लागणार नाही आज Happy

या धाग्यावर लिहिणारे मायबोलीकर बाकी सोशल मिडीयामध्ये क्रिकेटचे चाहते काय बोलत आहेत, काय चर्चा चालू आहे हे फॉलो करत नाहीत का?

हा शर्मा पांड्या कप्तानीचा सीन झाल्यापासून पांड्या छपरी या नावाने बेक्कार ट्रोल होत आहे.
पांड्याच्या बाजूने कोणी बोलतेय अशी पोस्ट अपवादानेच सापडते.
त्यामुळे चालू सामन्यात सुद्धा तो ट्रोल होणार याची कल्पना होतीच. आणि तेच झाले.
टॉसला पांड्या आला तेव्हा ही रोहीत रोहीतचा गजर होता.
अजून एक विडिओ वायरल होत आहे, ज्यात मैदानात कुत्रा आलेला तेव्हा त्याला लोकं हार्दिक हार्दिक चिडवत होते.
पांड्याने पहिली ओवर घेतली त्यावरूनही बेक्कार ट्रोल होत आहे.
केविन पीटरसन सुद्धा म्हणाला की पहिल्यांदा असे पाहिले आहे की एखादा भारतीय खेळाडू भारतात खेळताना ट्रोल होत आहे.

मुंबई मॅनेजमेंटने एकूणच या प्रकरणात जी थुकपट्टी वाली सफाई दिली आहे ते पाहता आणि एकूणच चित्र पाहता लहान मुलगाही सांगू शकतो की त्यांच्यात सारे काही आलबेल नाहीये.
यासाठी कालचा सामना उजाडण्याची वाट बघायची गरज नव्हती.

बाकी माझ्याही भावना काही वेगळ्या नाही आहेत. मी नाहीये आता मुंबई समर्थक. या सीजनला तरी नक्कीच नाही.

कारण आपण मुंबई समर्थक असतो म्हणजे का असतो?
आपला अंबानी लाडका नसतो, किंवा मी मुंबईकर आहे म्हणून मुंबई समर्थक असेही नसते. तसे असायला हे काय रणजी सामने नाहीयेत.
तर एखादा सचिन वा शर्मा आपल्या आवडीचा असतो म्हणून सपोर्ट असतो.
चेन्नईला देशभरात सपोर्ट मिळतो त्याचे कारण धोनी असतो. उद्या त्याला चेन्नई मॅनेजमेंट कडून बेकार वागणूक मिळाली तर तो सपोर्ट तसाच राहील का याचे उत्तर अवघड नाही.

हे काही देशाचे संघ नाहीत जे खेळाडूपेक्षा देश मोठा वगैरे समीकरणे ईथे लागू होतील. उद्या शर्माला भारतीय संघाबाहेर केले म्हणून भारत हरावा अशी ईच्छा त्याचा कोणताही चाहता करणार नाही. केली तर तो गद्दार. पण आपला आवडता प्लेअर, आवडता कप्तानाशी असे झाल्याने मुंबई ईंडियन ही फ्रँचायझी हरावी अशी ईच्छा आता बरेच जणांची आहे आणि त्यात काही गैर नाही.

काही जण असेही ग्यान वाटत आहेत की मुंबईने भविष्याचा विचार करून हा निर्णय घेतला आहे. रोहीत शर्माला आणि त्याच्या चाहत्यांना हे समजायला हवे वगैरे वगैरे... पण त्याला या प्रकरणात जशी वागणूक मिळाली आहे ते पाहता आता मुंबई मनातून उतरलीच आहे.

माझी तर आता ईच्छा आहे की पुढच्या वर्षी शर्माच नाही तर बुमराहने सुद्धा संघ बदलायला हवा. तो ही नाराज आहे या प्रकरणात..

आणि हो, आयपीएलच्या अंतापर्यण्त आता मूबईला सहावी ट्रॉफी मिळालीच नाही पाहिजे.

गांगुली ला ड्रॉप केल्यावर राहुल द्रविडला असाच त्रास कोलकात्याच्या प्रेक्षकांनी दिला होता. भारत विरुद्ध आफ्रिका ह्या सामन्यात कोलकत्ता वासियानी आफ्रिकेला सपोर्ट केला होता.
बाकी शर्माला राग आला असेल तर त्याने पुढच्या सिझन मध्ये त्याने दुसरी टीम निवडायला काहीही हरकत नाही. तिथं त्याला कायमस्वरूपी स्लीप मध्ये फिल्डिगही करता येईल.
सपोर्ट कोणी कोणाला करायचा हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे पण आपल्या आवडत्या एका खेळाडूला कॅप्टन वरून काढले आणि बाऊंद्री वर फिल्डींग ला म्हणून पंड्याला ट्रोल करणे चुकीचे आहे.

आणि हो, आयपीएलच्या अंतापर्यण्त आता मूबईला सहावी ट्रॉफी मिळालीच नाही पाहिजे. >> शेवटी खरे काय ते बाहेर आले म्हणायचे. उगाच इतका वेळ तिथे असे पाहिले, इथे तसे ऐकले वगैरे ' अमक्यांची स्वारी असे म्हणत होती' टाईप्स सुरू होते Happy उद्या समजा रोहित कॅप्तान झाला तर पंचाईत होईल रे तुझी . केअरफूल व्हॉट यू विश फॉर.

शर्मा वरून पांड्या वर मूव्ह होणे हा मॅनेजमेंट चा निर्णय होता. पांड्या संघात होता नि त्याने काही तरी बंड केले नि रोहित ला हाकलले असे झाले नाहिये. मुंबई ने ट्रेड करून पांड्याला परत आणलेय. त्यामूळे निषेध कोणाचा करायचा ह्याचा विवेक नि एव्हढी सारासार अक्कल रोहितच्या चाहत्यांमधे नाही हे उघड होते आहे.

बेअरस्टॉ ला बहुतेक शांत झोप लागणार नाही आज Happy >> गोळा टाकला नि मॅच पण तिथे. आयपीएलच्या अंतापर्यण्त आता बेअरस्टॉ ला घेतले नाहि पाहिजे संघात Wink

शेवटी खरे काय ते बाहेर आले म्हणायचे.
>>>>
कशाच्या शेवटी?
मी तर पहिल्यापासूनच रोहित शर्माचा फॅन आहे. आणि त्याला मुंबई इंडियन्स मॅनेजमेंट ने दिली वागणूक बिलकुल आवडली नाहीये. त्यामुळे त्यांचाच निषेध करणार ना.. आणखी नक्की कोणाचा करायला हवा असे म्हणत आहात??

अशी नेमकी काय वागणूक दिल्याचा रिपोर्ट आहे? मी जेन्युईन प्रश्न विचारत आहे. रोहित चे वाढते वय, फिटनेस आणि मागच्या काही आय पि एल मधला त्याचा आणि टीमचा परफॉरमन्स बघून आणी अर्थातच फ्युचर चा विचार करुन नवीन कॅप्टन आणला एम आय वाल्यांनी.
तिकडे सि एस के मध्ये पण साधारण तेच आहे पण फक्त गायकवाड बाहेरुन आलेला नाही इतकच. कदाचित एक सीजन रोहितला कॅप्टन ठेवून पंड्याला थोडा सेकंट लीड टाईप रोल द्यावा अशी मला वाटतं फॅन्सची इच्छा असावी. पण मला वाटतं पंड्या स्वतःला भारी समजतो आणि त्याची ओवरॉल अ‍ॅटिट्युड बघून एम आय फॅन्स वैतागत असतील.

सरतेशेवटी टीम डायनॅमिक मध्ये कितीही झालं तरी नवीन गार्ड, जुना गार्ड ह्यात थोडी टस्सल होणारच. त्यात रोहित बर्‍यापैकी सिनियर असल्यामुळे आडर वगैरे घेणे जड जात असावं त्याला. पण ह्या सगळ्यात सुद्धा खरं काय आणि बाहेर पब्लिक काय म्हणतय ह्यात बराच फरक असावा.

पंड्याचे लीडरशीप स्कील्स खरच किती चांगले आहेत ह्याबद्दल मला उत्सुकता आहे. टायटन्स मध्ये माझ्यामते साहा सोडला तर सिनियर असा प्लेयर नव्हता आणि त्या वेळेस मला वाटतं ओवरऑलच टीम डायनॅमिक थोडं नो प्रेशर, फियरलेस टाईप होतं आणि त्यामुळे सगळे एकदम तडफेने, जिगरबाजपणे खेळले. लीडर्शीप म्हणजे बर्‍याच वेळा खरंतर ह्युमिलिटी नी सगळ्यांशी वागून एका कॉमन गोल करता लोकांना इन्सपायर करता येणे हेच असते. आपली ८३ ची टीम ह्याचं एक उत्तम उदाहरण आहे. पंड्याला आता एम आय सारख्या इस्टॅब्लिश्ड फ्रँचाईज मध्ये येऊन मुख्य म्हणजे प्लेयर लोकांचा रिस्पेक्ट मिळवता आला पाहिजे. ते झालं तर मग टीम म्हणून ते चांगले खेळू शकतील असं वाटतं.

तिकडे सि एस के मध्ये पण साधारण तेच आहे पण फक्त गायकवाड बाहेरुन आलेला नाही इतकच.
>>>>>>>

छे.. तुलनाच नाही.
धोनीची जी तिथे इज्जत आहे, जी त्याची तिथे चालते तसे दुसरे उदाहरण नाही. धोनी आहे तोपर्यंत ते त्याच्या मार्गदर्शनात नवीन कर्णधार तयार करत आहेत. जडेजाचा प्रयोग फेल गेला तर आता ऋतुराजवर डाव लावला आहे.
आणि म्हणूनच एकाही धोनी चाहत्याने याबद्दल नाराजी व्यक्त केली नाही.

शर्मा प्रकरणात तर त्याच्या बायकोने सुद्धा उघड नाराजी व्यक्त करणारी कॉमेंट केली होती. एवढे पब्लिक हार्दिकला ट्रोल करतेय, रोहीत रोहीतचे नारे लावत आहेत. तरी कोणीच उघड बोलायला तयार नाही यावर.. ना शर्मा ना मुंबई मॅनेजमेंट.. कारण त्यांच्याकडे बोलायला तोंडच नाही.

जनता वेडी नसते. जेव्हा शाहरूखने चक्क दादाला कलकात्यामधून बाहेर केले तेव्हाही इतका दंगा झाला नव्हता. दादाची तिथल्या जनतेत इतकी क्रेझ असून सुद्धा त्यांनी ते स्वीकारले होते.

शर्मा बाबत मात्र यांनी पाठीत सुरा खुपसला आहे. हे उशीरा डिक्लेअर करून सगळा गेम असा खेळला आहे की त्याकडे हे निमूट स्वीकारण्यापलीकडे मार्गही ठेवला नाही.

एक क्रिकेटप्रेमी म्हणून माझ्यासाठी या फ्रेंचायझी मॅनेजमेंटपेक्षा खेळाडू जवळचा आहे. त्यामुळे त्याला अशी disrespectful वागणूक मिळालेले बिलकुल आवडलेले नाहीये.

शर्मा बाबत मात्र यांनी पाठीत सुरा खुपसला आहे. >> पाठीत सुरा खुपसला आहे ? मुंबई इंडियन्स ही रोहितच्या पिताश्रींची जहागीर नव्हती नि शर्मा मुंबई इंडियन्स च्या सिंहासनावर बसलेला नव्हता. अंबानी ने पैसे फेकून बांधलेली टीम आहे नि ती मॅनेज करायला एक वेगळी टीम आहे. रोहित रिटायर होईतो कॅप्तनच राहणार असे त्याला अंबानी ने लिहून दिले होते का डेक्कन चार्जर्स कडून ट्रेड करून आणले तेंव्हा ? तेंव्हा जो स्ट्रेटेजिक निर्णय घेतला तसाच आत्ता पांड्याला टायट्न्स कडून आणण्याचा घेतला. (दोन वर्षांपूर्वी असाच पांड्याला रीटेन न करण्याचा निर्णय पण घेतलाच होता). समजा रोहित आक्रमक खेळण्याच्या नादात लवकर विकेट घालवून बसला तर रोहित ने मुंबई ला दगा दिला असे म्हणायचे का ? कोहली ने रोहित ला बॅ़किंग देऊन टेस्ट मधे ओपनर स्लॉट वर नाव कोरून दिले नि मग रोहित कप्तान झाला म्हणजे रोहित ने कोहलीच्या पाठीट सुरा खुपसला असे म्हणायचे का ? पांड्या फेल झाला तर अजून कोणाला बनवतील किंवा परत रोहित ला बनवतील. नुसतेच धुमाकूळ घालून राहिलेत रोहितचे सो कॉल्ड फॅन्स.

मॅच संपल्यावर पांड्याने जाऊन रोहित ला पाठून मिठी मारली तेंव्हा रोहित चिडून त्याला काही तरी बोलतानाची क्लीप पण सोशल मिडीयावर फिरतेच आहे कि.

टायटन्स मध्ये माझ्यामते साहा सोडला तर सिनियर असा प्लेयर नव्हता आणि त्या वेळेस मला वाटतं ओवरऑलच टीम डायनॅमिक थोडं नो प्रेशर, फियरलेस टाईप होतं आणि त्यामुळे सगळे एकदम तडफेने, जिगरबाजपणे खेळले. >> बुवा हे सगळे पहिल्या सीझनला एकदम चपखल होते पण दुसर्‍या सीझनलाही ते तेव्हढेच चांगले खेळले होते. साहा, मिलर, हे आपापल्या देशांच्या संघातून बाहेर निघालेले, तेवाटीया सारखे खिजगणतीमधे नसलेले, शर्मासारखे देशाच्या संघात स्थान मिळण्याची शक्यता नसलेले, सुदरसन सारखे एकदम नवे. रशिद खान नि गिल वगळता कोणीच स्टार नाही. त्यामूळे श्रेय नेहरा, पांड्या नि एकंडर टीम चूझ केलेल्या सग़ळ्यांचे असे मला वाटते.

2022 मध्ये रोहित चा 19 चा average आणि 120 चा strike rate होता, 2023 मध्ये 21 चा average आणि 132 चा strike rate होता, आणि गेल्या 2 वर्षात तो भारताकडून फार T20 खेळला नव्हता, तेव्हा मॅनेजमेंट नि भविष्याचा विचार करून कर्णधारपद काढले तर फार काही चुकीचे केले नाही

सर्वसामान्य मुंबई इंडियन्सच्या पाठिराख्यान्मध्ये रोष आहे आणि तो उघडपणे दिसतो आहे..... या वीकेंडलाच एक फॅमिली गेट टू गेदर होते गेली अनेक वर्षे भक्तिभावाने मुंबईचा प्रत्येक सामना बघणारा माझा एक मेव्हणा मुंबईची मॅच सोडून सगळ्यांबरोबर निवांत गप्पा मारत बसला होता.... म्हणाला की या रोहित-पांड्या एपिसोडमुळे मुंबई इंडियन्समधला इंटरेस्टच गेलाय...... आता हे बरोबर की चूक पेक्षा असे अनेक लोक आहेत की ज्यांच्यासाठी रोहित आणि मुंबई हे अतूट नाते बनले होते आणि रोहित, पांड्या, मुंबई मॅनेजमेंट या सगळ्यांनीच ज्या प्रकारे हे प्रकरण हाताळले आहे ते बघता हा असा एक मोठा फॅनवर्ग दुखावला आहे हे निश्चित!! याचा अर्थ असा नव्हे की मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा पलिकडे पाहू नये पण सध्यातरी बऱ्याच फॅन्सना हे आवडलेले नाहिये हे जरा सोशल मिडिया चाळला किंवा क्रिकेटप्रेमी मित्रमंडळींमध्ये बसुन गप्पा मारल्या तरी सहजी लक्षात येते!!
उद्या कदाचित हार्दिकने मुंबईला सातत्याने जिंकवले तर हे पर्सेप्शन बदलेल सुद्धा; पण तो attitude दाखवत राहिला आणि रिझल्टपण मिळाले नाहीत तर न जाणो मुंबई मॅनेजमेंट आपला निर्णय बदलेल सुद्धा!!
आयपीएल मध्ये फॅन्सना फाट्यावर मारुन चालत नसते Wink

पण तो attitude दाखवत राहिला
>>
पांड्या चा attitude हाच मेन प्रॉब्लेम आहे.
शर्मा ला बाऊंड्री वर फिल्डिंग ला पाठवण्यात काहीच गैर नाही पण ज्या प्रकारे ते communicate केलं गेलं, ज्या प्रकारे बॅटिंग ला आल्यापासून ते आऊट झाल्यावरही बेदरकारी दाखवली गेली, ज्या प्रकारे प्रेस कॉन्फरन्स मधे माज केला गेला ते लोकांना रूचलं नाहीये हे मान्य करण्यात काही प्रॉब्लेम नसावा. (मैदानात कुत्रं आल्यावर लोकं उगाचच हार्दिक हार्दिक करून ओरडली नाहीत)
शर्मा ला एक मिठी मारून बदलाची सुरुवात केली आहे की फक्त सारवासारव ते पुढच्या सामन्यात कळेलच. का शर्मा ला डिवचून त्याच्याकडून बेटर परफॉर्मन्स बाहेर काढण्यासाठी हा मास्टरस्ट्रोक होता हे ही समजेल.

आगे आगे देखेंगे होता है क्या... हम लोग ...

रोहीत फार दिलखुलास व्यक्तिमत्त्व आहे. भारताचा कर्णधार झाल्यापासून त्याचे व्यक्तिमत्व आणखी खुलून लोकांसमोर आले आहे. जे लोक सोशल मीडिया फॉलो करतात त्यांना माहित असेल की त्याच्या शिव्यांचे कितीतरी रील वायरल होत आहेत, आणि क्रिकेट चाहत्यांना त्याच्या शिव्या देणे देखील आवडत आहे. कारण त्यात कसलाही एटीट्यूड नसतो तर एक आपलेपणा आढळतो.

याउलट पांड्या अगदी दुसरे टोक आहे. त्याबद्दल न बोललेलेच बरे.
कोहली जेव्हा नवीन होता तेव्हा तो सुद्धा उद्दाम वाटायचा. पण कोहली मनाने खूप चांगला आहे. कमालीची खिलाडूवृत्ती आहे. त्यामुळे तो माणूस म्हणूनही इतक्या जणांचा लाडका आहे.

पांड्यामध्ये एटीट्यूड तर आहेच पण त्याची मनोवृत्ती सुद्धा मला खराब वाटते. त्यामुळेच सोशल मीडियावर त्याला कोणी सपोर्ट करताना दिसत नाही. सामान्य क्रिकेट चाहत्यांना असे खेळाडू बिलकुल आवडत नाहीत.

या मुंबई इंडियन्स मधील वादाचे जे होईल ते होईल.. आता मुंबईत रस उरला नाही.
पण रोहीत पश्चात भारतीय संघात हा माणूस 20-20 फॉरमॅट मध्येही चुकूनही कर्णधार होऊ नये. तो सगळे वातावरण बिघडवून टाकेल. दादा द्रविड धोनी कोहली रोहीत यांच्या पंक्तीत घेण्यासारखे नाव तरी आहे का ते..

शुबमन गिल किंवा यशस्वी जैसवाल या ऑल फॉरमॅट युवा खेळाडूंनी आता कर्णधार म्हणून पुढे यावे असे वाटते. म्हणून यावेळी गुजरातला सुद्धा माझा सपोर्ट आहे.

याउलट पांड्या अगदी दुसरे टोक आहे. त्याबद्दल न बोललेलेच बरे.
>>
पांड्या गुजरात चा कप्तान असताना किंवा या आधी भारताचा कप्तान असतानाही त्याचा attitude वेगळा दिसून आला नव्हता. पण या एका सामन्यात अन् त्या आधी काहीतरी वेगळं रूप दिसून आलं जे gentleman's game ला अनुसरून वाटलं नाही

कोहली चा attitude हा रिझल्ट / परफॉर्मन्स ओरिएंटेड दिसून यायचा. वृथा माज नव्हता.

हो बरोबर.
मी कोहलीचे फार आधीचे कर्णधार व्हायच्याही बरेच आधीचे बोलत आहे. नंतर त्याने त्यावर नियंत्रण मिळवले आणि योग्य दिशेने वळवले.
वर त्याचे नाव याचसाठी घेतले कारण एटीट्यूड कसा असावा आणि कसा नसावा याचे उत्तम उदाहरण कोहली आणि पांड्या देतात.

>>पांड्या गुजरात चा कप्तान असताना
त्यावेळी तर पांड्याने मला त्याच्याकडून अपेक्षित नसलेली मॅच्युरिटी आणि कामनेस दाखवून आश्चर्याचा सुखद धक्का दिला होता.... त्यावर्षीच्या धाग्यावर मी तशी कॉमेंटही केली असेल बहुतेक पण मुंबई इंडियन्समध्ये परत आल्यावर चित्र वेगळे दिसत आहे!!
मुंबई इंडियन्समधल्या भारतीय खेळाडूंना पण कर्णधार म्हणून तो नको असावा बहुतेक!! आणि हे त्यालाही कुठेतरी जाणवले असेल म्हणून तोही स्वताला एस्टायब्लिश करायला जास्तीचे (आणि चुकीचे) प्रयत्न करत असावा!!
He needs to try servent leadership

रिझल्टपण मिळाले नाहीत तर न जाणो मुंबई मॅनेजमेंट आपला निर्णय बदलेल सुद्धा!!
आयपीएल मध्ये फॅन्सना फाट्यावर मारुन चालत नसते >> स्वरुप आयपीएल लोक मनोरंजन म्हणून बघतात असे मला वाटते ( ते बरोबर कि चूक हा भाग बाजूला ठेवू) . अगदी रोहित ला वर्ल्ड कप सेमी नि फायनल हरल्यावर शिव्या देणारे लोक होते. ।एच छपरी आज उठून पांड्याला शिव्या देत आहेत (जे गमतीचे आहे कारण पांड्या ला मॅनेजमेंट ने आणलेय ट्रेड करून). धोनी, सचिन, दादा इत्यादी लोकांनीही ह्याच शिया खाल्ल्या आहेत. जिंकले कि सगळे विसरले जाते. ह्यांच्यासाठी ह्यापलीकडे काहीही नसते.

शुबमन गिल किंवा यशस्वी जैसवाल या ऑल फॉरमॅट युवा खेळाडूंनी आता कर्णधार म्हणून पुढे यावे असे वाटते. >> जयस्वाल राजस्थानचा पण कप्तान नाहीये. उद्या सॅमन्सनच्या ऐवजी याला केले तर कोणी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला असे म्हणायला सर मोकळे. तरी बर आयपील फिक्स्ड असते हे अजून आले नाहिये. त्याप्रमाणे रोहित - पांड्या प्रकरण फिक्स्ड केले आहे टी आर पी वाढवायला असे म्हणायलाही प्रत्यवाय नसावा. Wink

रोहित ला वर्ल्ड कप सेमी नि फायनल हरल्यावर शिव्या देणारे लोक होते...
>>>>>

ते मूठभर वाह्यात लोकं होते. मी अश्याना क्रिकेटप्रेमी मानत नाही.
पण करोडो क्रिकेटप्रेमी होते जे त्या पराभवानंतर रोहीत आणि भारतीय संघाच्या पाठीशी होते. 10 सामने जिंकून जो आनंद दिला त्याची जाण ठेवून फायनलच्या दुःखात भारतीय संघासोबत सहभागी होते.

सध्या भारतीय कर्णधाराला रोहीतला जशी वागणूक मिळत आहे ते पाहता हेच खरे क्रिकेटप्रेमी दुखावले आहे.

>>स्वरुप आयपीएल लोक मनोरंजन म्हणून बघतात असे मला वाटते
अगदीच!! त्यामुळे इतर मनोरंजन कार्यक्रमांसाठी जसा त्यांचा TRP महत्वाचा असतो तसेच या आयपीएल टीम्ससाठी फॅन फॉलोइंग Happy
उद्या मुंबईने सातत्याने सामने जिंकले; आयपीएल जिंकले तर लोक कदाचित हार्दिकला स्विकारतील पण; पण तोपर्यंत हार्दिक साठी आणि मुंबई इंडियनच्या फॅन्ससाठीही ही आयपीएल अवघड आहे!!

सध्या भारतीय कर्णधाराला रोहीतला जशी वागणूक मिळत आहे ते पाहता हेच खरे क्रिकेटप्रेमी दुखावले आहे.--- +100

त्यामूळे श्रेय नेहरा, पांड्या नि एकंडर टीम चूझ केलेल्या सग़ळ्यांचे असे मला वाटते.>>>> शक्य आहे. त्यातल्या त्यात हेच दोघं अनुभवी होते. पण मी वर म्हणतोय ते आता लागू पडेल. एम आय चे सगळे डायनॅमिक वेगळे आहे. रोहित प्रचंड पॉप्युलर व्यक्तिमत्व आहे आणि त्यात तो आउटस्पोकन पण आहे, पंड्या सुद्धा. मी विडियो पाहिले काल. अनंत अंबानी समोर रोहित पंड्याला काहीतरी बडबड करत होता वैतागून. एकंदर हे प्रकरण रोहित वर शेकतय की पंड्यावर हे बघायला पाहिजे. टीमची लगाम खर्‍या अर्थाने पंड्याच्या हातात यायला त्याला शांतपणे आणि मचुअरिटी हे हँडल करावं लागेल नाहीतर पुढच्या सीजन ला पडत्या भावात परत टायटन्स कडे किंवा दुसरीकडे जावं लागेल. त्यात टायटन्स परत फायनल ला गेले किंवा जिंकले तर परतीचे दोर पण कापले जातील.

. टीमची लगाम खर्‍या अर्थाने पंड्याच्या हातात यायला त्याला शांतपणे आणि मचुअरिटी हे हँडल करावं लागेल >> पांड्याला ट्रेड करून कप्तान करण्याच्या निर्णयात अंबानी पण सामील असणार हे उघड आहे. (किमान इंफर्म्ड) तसे असेल तर काही दिवसांमधे हि धुळवड शांत बसेल असे धरून चालू शकतो. रोहित ची बायको मिडिया मॅनेजमेंट मधे आहे हे बघता हा पाठचा मिडिया नॉईज फारच काही अशक्य वाटत नाही.

मुंबई इंडियनच्या फॅन्ससाठीही ही आयपीएल अवघड आहे!! >> मला वाटते गेल्या तीन आयपील तेव्हढ्याच अवघड होत्या रे. पांड्याच्याच टायटन्स नी धुलाई केली होती एलिमिनेटर मधे गेल्या वर्षी Happy

ते मूठभर वाह्यात लोकं होते. मी अश्याना क्रिकेटप्रेमी मानत नाही. >> पण मॅनेजमेंट ऐवजी प्लेयर ला टारगेट करणारे लोक क्रिकेटप्रेमी असतात ? रोज ज्या माणसाची आरती ओवाळतोस (रोहित) तो ह्याबद्दल एक चक्कार शब्द बोलला नाहीये (त्याच्या बायकोचे एकमेव पोस्ट बघता) - किमान त्याच्या वागणूक किती ग्रेसफुल आहे ते बघ. लगेच इंडियन्स जाऊ दे खड्ड्यात नाही म्हणाला.

Pages