मांजरडोळे - कलर्ड पेन्सिल स्केच

Submitted by वर्षा on 14 January, 2024 - 17:53

मांजरं म्हणजे माझा वीक पॉईंट आणि याआधी कितीही वेळा रेखाटले असले तरी प्रत्येक वेळेस मांजरांचे डोळे रेखाटणे म्हणजे एक प्रयोगच असतो. आणि आव्हानही. करड्या-पिवळ्यापासून राखाडी-निळ्या-हिरव्यांपर्यंत यांच्या इतक्या असंख्य छटा असतात की निसर्गाची कमाल वाटते.
त्यातून त्यातल्या बाहुल्या! काळी उभी सडसडीत रेघ ते एखाद्या ज्योतीसारख्या किंवा त्याच बाहुल्यांचे अंधारात गेल्यावर झालेले गोल मणी. मज्जा.
काचेसारखे चकाकणारे हे डोळे रेखाटताना पहिली काळजी घ्यावी लागते ती त्यातल्या प्रकाशबिंदूंच्या जागा लक्षात ठेवणे. त्या गेल्या की संपलंच.
नुकतंच अ‍ॅमेझॉन बेसिक्सचं १००जीएसम जाडीच्या कागदांचं स्केचबुक घेतलंय. मोह आवरुन कुठल्याही नवीन पेन्सिल्स घेतल्या नाहीयेत. २०२४चे हे पहिलेच रेखाटन. आणखी सातत्याने, आळशीपणा न करता रेखाटने केली तर नवीन पेन्सिलींचे रिवॉर्ड घ्यायचे असे ठरवलेय. हा यंदाचा एक संकल्प आहे. बघूया!
हॅपी न्यू इयर!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय जबरी ___/\___
इतक्या कमी रंगांचा वापर करून! तुसि ग्रेट हो

धन्यवाद सर्वांना
@स्वान्तसुखाय मी या वापरल्या: Faber Castell F110012 Polychromos Colour Pencils Tin Of 12

>>इतक्या कमी रंगांचा वापर करून
हो अवल. फार शेड्स लागल्याच नाहीत. बारा शेड्सचा बेसिक सेट आहे. त्यातल्या काळी, पोपटी, डार्क हिरवी, ब्राऊन आणि पिवळी याच वापरल्या.

मस्तच ... तू खूप पूर्वी टोमॅटो च स्केच इथेच दाखवलं होतंस , ते ही अजून ही लक्षात आहे.

Pages