बॉट फ्री डिजिटल डिवायसेस कसे करावे? संबंधाने

Submitted by अश्विनीमामी on 11 October, 2023 - 06:17

आज मला एक एस एम एस आलेला आहे. तो खालील प्रमाणे.

अ‍ॅज पार्ट ऑफ स्पेशल कँपेन ३.० सर्ट इन , गवर्न मेंट ऑफ इंडिया अ‍ॅड्वायसेस यु टू कीप युअर डिजिटल डिवायसेस बॉट फ्री. गेट बॉट रिमुव्हल टूल अ‍ॅट पुढे लिंक दिली आहे. https://www. सी एस के डॉट जीओ व्ही डॉट इन.

हा नक्की काय प्रकार आहे. लिंक क्लिक केली नाही कारण ती बॉट फोन वर इन्स्टॉल करायसाठी असली तर? हे देशातील सरकारचेच आहे का काही दुसरे. मार्गदर्शन करावे.

अनधिकृत फॉरेक्स ट्रेडिन्ग प्लॅट फॉर्म वरून व्यवहार करू नका असा पण आर बी आय तर्फे मराठीत मेसेज आला आहे. इथे पण एक लिंक आहे.
काय पीडा आहे ही? मी अधिकृत प्लेट फॉर्म वरून पण फोरेक्स ट्रेडिन्ग करत नाही. व्याख्या विख्ह्ही वुख्हू.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

संशयास्पद लिंक पब्लिक फोरमवर टाकताना निदान disable तरी करून टाकावी नाही का? '.' च्या जागी dot वगैरे लिहून.>> संपादित केले आहे.

जनरली गवर्नमेन्ट ला काही पब्लिक ला कळवायचेच असेल तरी ते टेक्स्ट मेसेज वापरत नाहीत. त्यामुळे हा मेसेज संशयासपदच वाटतो आहे.

मलाही असा मेसेज आला आहे. दोन फोनवर एकाच वेळी.
पाठवणार्‍याचे नाव VM-GOVT असे आहे.

" लिंक क्लिक केली नाही कारण ती बॉट फोन वर इन्स्टॉल करायसाठी असली तर? " असा संशय मलाही आला.

https://www. सी एस के डॉट जीओ व्ही डॉट इन >> ही लिम्क सायबर स्वच्छता केंद्रची दिसतेय . बॉट कढण्यासाठी मार्केट मधे उपलब्ध असलेल्या antivirus tools वापरण्यासठी सुचवलंय

ही लिंक सरकारी आहे हे नक्की.
सरकार प्रोपगंडा करतय का नाही ह्याची कल्पना नाही. असल्या कुठल्याही साईट करून काही ॲप डाऊनलोड करण्यापेक्षा फोन मध्ये जे मार्केट असेल तिकडून करायचा विचार करावा. अर्थात जर असं काही करायचं असेल तर.

हो , ही साईट सायबर स्वच्छता केंद्र भारत सरकारची आहे आणि त्या साईट वर विंडोज व अँड्रॉइडसाठी bot removal tools आहेत, quick heal आणि C-DAC ने बनवलेले.

पण मेसेज मध्ये आलेल्या लिंक वर क्लिक करण्या पेक्षा URL स्वतः type करून ती साईट बघावी.
पण मी तरी हे टूल्स इंस्टॉल करणार नाही आणि कुणी ते इंस्टॉल करावेत की करूच नयेत याबद्दल काहीच सल्ला देउ शकत नाही.

असे मेसेज येतात. पण थांबवायचे कसे माहीत नाही.
सरकारी संदेश असेल तर तो त्यांनी (सरकारांनी) त्यांच्या साईटवर मेंनूमध्ये द्यावा आणि लिंक "***dot gov dot in अशी शेवट होणारी असते. ही माहिती शाळांमध्ये देतात का माहिती नाही.
-----
आगंतुकावर भुंकणारा कुत्रा म्हणजे antivirus tools . पण त्या आगंतुकाशी आपण प्रेमाने बोलतो तेव्हा कुत्र्याला समजते की मालकाचा माणूस आहे (=परमिशन दिलेली लिंक किंवा उघडलेली लिंक किंवा app)तेव्हा तो गप्प बसतो.
हेच antivirus tools सांगतात की आता आमच्या साइटचा काही उपयोग नाही. तुम्हीच परमिशन देता.
साधारणपणे असा अनुभव आहे की Microsoft Edge browser मध्ये लिंक उघडताना "सावधान"चा इशारा येतो. पण आता बॉट बनवणारे आणखी चलाख झाले आहेत.
___________________
मोदी है तो मुमकिन है... हे लिहायचं राहिलं.

विशेष सूचना :
१. हा प्रतिसाद 'बॉट फ्री डिजिटल....' या विषयाशी निगडीत नाही परंतु 'सायबर सुरक्षेशी' निगडीत आहे म्हणून येथे देत आहे.
२. या प्रतिसादात एका 'सरकारी संकेतस्थळाची' लिंक दिलेली आहे.
३. हा प्रतिसाद 'विक्षिप्त_मुलगा' या आयडीचा आहे.

वरीलपैकी एकही गोष्ट आपल्याला नको असल्यास प्रतिसाद वगळून पुढे जाऊ शकता!

आपण आपल्या 'आधार कार्ड' / 'पॅन कार्ड' ची फोटोकॉपी (झेरॉक्स) अनेक ठिकाणी देतो (KYC साठी). काही वेळेस झेरॉक्स काढणारेच आपल्या नकळत आपल्या आधार/pan कार्डची एक जादा प्रत काढून ठेवतात आणि हा data इतरांना विकतात, असेही कोणत्यातरी चित्रपटात दाखवले होते.
कारण काहीही असो, आपल्या नकळत आपल्या नावावर भलताच कोणी मोबाईल सिमकार्ड घेऊन वापरत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे सिम कार्ड वापरणारा कोणी भलताच व्यक्ती; मात्र ते सिम कार्ड आपल्या नावाने नोंदणी झालेले! अशामुळे जर उद्या त्या 'भलत्याच' व्यक्तीने त्या सिम कार्डचा काही गैरवापर केल्यास आपण कायदेशीर प्रक्रियेत अडकण्याची शक्यता आहे, कारण सिम कार्ड आपल्या नावावर आहे.

असे होऊ नये म्हणून प्रत्येकाला आपल्या नावावर किती मोबाईल क्रमांक नोंदणी झालेले आहेत हे कळले पाहिजे, त्यासाठी केंद्र सरकारच्या 'Department of Telecommunication' ने https://tafcop.sancharsaathi.gov.in हे संकेतस्थळ सुरु केलेले आहे. (Telecom Analytics for Fraud Management and Consumer Protection (TAFCOP). या संकेतस्थळावर आपण आपला मोबाईल क्रमांक व त्यावर आलेला OTP टाकल्यावर आपल्या नावे किती क्रमांक नोंदणीकृत आहेत ते दिसतात (सुरवातीचे २ अंक आणि शेवटचे २ अंक). जर आपल्याला त्यात अनोळखी क्रमांक दिसल्यास म्हणजे असा मोबाईल क्रमांक जो आपण कधी घेतलाच नव्हता असा क्रमांक त्यात असल्यास आपण त्याला select करून 'This is not my number' निवडल्यास TRAI (Telecom Regularity Authority of India) तो मोबाईल क्रमांक बंद करते, जेणेकरून 'तो भलताच व्यक्ती' त्या क्रमांकाचा गैरवापर करु शकणार नाही.

* जाऊ देत ना, काय फरक पडतो? एखाद्या गरीबाने त्याच्याकडे आधार कार्ड नाही म्हणून माझ्या आधार कार्डचा वापर करून नंबर घेतला असेल तर त्याला बिचाऱ्याला माझ्याकडून तेव्हढीच मदत होईल ना! असा विचार करणे आपल्याला अत्यंत महागात पडू शकते! जर त्या व्यक्तीने सायबर fraud करण्यासाठी तुमच्या नावे नोंदणीकृत असलेला नंबर वापरला किंवा तुमच्या नावे नोंदणीकृत असलेल्या क्रमांकावरून अमुक ठिकाणी बॉम्ब ठेवला आहे असा पोलिसांना फोन केला तर पोलीस सरळ तुमची गचांडी धरणार! कारण, नंबर तुमच्या नावे नोंदणीकृत आहे, त्यामुळे नको तिथे दयाभाव नको!!!

विमु, त्यात कॅप्चा कितीही बरोबर टाइप केले तरी दरवेळी error occured , can not validate capcha असेच फक्त येत राहते. चकवा लागल्या सारखं Uhoh

case sensitive आहे.>>>
Upper Lower case सर्व जसे आहे तसे टाकून पण नाही उपयोग. मोबाइल आणि पी सी टाइपिंग किंवा मोबाइल वर कीबोर्ड कुठला असा पण फरक पडतो का ह्यात ?

मी केले इन्स्टॉल.
माझे वाय फाय कुणीतरी चोरून वापरत होते. ते डिटेक्ट झाले. चार युजर्स होते.

आधार कार्डचा वापर करून नंबर घेतला, ते धोकादायक आहे हे समजू शकतो, पण वाय फाय फुकटात वापरल्याने काय फरक पडतो?

मोबाइल आणि पी सी टाइपिंग किंवा मोबाइल वर कीबोर्ड कुठला असा पण फरक पडतो का ह्यात ? >> माहीत नाही बुवा!!!

पण वाय फाय फुकटात वापरल्याने काय फरक पडतो? >>> तुमच्या घराजवळ / घराखाली उभे राहून तुमचे वाय-फाय मी चोरून वापरले आणि ते केवळ browsing साठी न वापरता काहीतरी सायबर fraud करण्यासाठी किंवा पोलिसांना धमकीचा मेल पाठवण्यासाठी वापरले तर जेव्हा सायबर क्राईम वाले तपास करतील तेव्हा तुमच्या वाय-फाय वरुन data आलेला असल्याने तुमचा आयपी address, तुमच्या router चा MAC address आदी त्यांना दिसणार! आणि मग जोपर्यंत तुमचे वाय-फाय दुसऱ्याने चोरून वापरले हे जोपर्यंत तुम्ही सिद्ध करू शकत नाही तोपर्यंत कायद्याच्या दृष्टीने तुम्ही गुन्हेगार !!!

पण मुळात तुमचे वाय फाय password protected नसते? ही तर बेसिक गोष्ट आहे.

तळटीप: आत्ता आले लक्षात. वायफाय प्रोटेक्टेड नसते, मी फुकट वापरणे आणि चोरून वापरणे एकच समजत होतो.

@ विक्षिप्त_मुलगा
नंबर चेक साईट , धन्यवाद.
______________________________
वाईफाई कसा चोरतात पासवर्ड शिवाय?

@ विक्षिप्त_मुलगा
नंबर चेक साईट , धन्यवाद.

यात अगदी १० वर्षापुर्वी वापरत असलेला मोबाईल चा नंबर दाखवतो.

वाईफाई कसा चोरतात पासवर्ड शिवाय?

१. काहीजण नवीन router घेतल्यावर त्याचे default WiFi name (SSID) & default wifi password बदलतच नाहीत. उदा. D-Link, TP-Link, Netgear etc. त्यामुळे समोरच्या (hacker) available wifi scan केले की त्यात तुमचे WiFi दिसते (router च्या brand सकट!) मग काय, 'Default Wifi password for D-Link / Netgear' असे सर्च करुन password टाकायला कितीसा वेळ लागणार??? त्यामुळे Wifi चे नाव (जे स्कॅन केल्यावर दिसते) ते बदला आणि पासवर्ड तर नक्की बदला. पासवर्ड जास्तीतजास्त लांब, किचकट ठेवा ज्यात capital & small letters, symbols & numbers असतील. जो पासवर्ड तुम्ही मनात योजला आहे तो कितपत मजबूत आहे ते passwordmonster.com सारख्या वेबसाईटवर जाऊन तपासा! (माझ्या घरच्या WiFi चा पासवर्ड २२ characters चा असून त्याला crack करायला 84 trillion years लागतील, असे दाखवले!!!)

२. काहीजण वायफायचे नाव आणि पासवर्ड तर बदलतात. पण पासवर्ड ठेवतांना आपला मोबाईल क्र. / गाडीचा क्रमांक / टोपणनाव, आपल्या घरातील मुलांचे / पाळीव प्राण्याचे नाव असे काहीतरी ठेवतात, ज्याचा अंदाज बांधणे (guess करणे) आपल्याशी थोडीफार ओळख असणाऱ्यांना पण सहज सोपे होते!

Lowercase,upper case,number,special characters (#@&)हे सर्व टाकले आठ अक्षरांत की "strong password " असं हिरव्या रंगाची पट्टी येते.
कोणत्यातरी मराठी जुन्या खाद्यपदार्थाचं नाव आणि काही जोडलं की लक्षात ठेवायला सोपा पासवर्ड होतो.
तो इमेल करा एका दुसऱ्या इमेल अकाउंटला.

काहीजण नवीन router घेतल्यावर त्याचे default WiFi name (SSID) & default wifi password बदलतच नाहीत. >> बरोबर.

माझ्या बाबतीत घराच्या खाली माझ्या वायफायची रेंज चांगली मिळते. रात्री वॉचमन मंडळी त्या रेंजमधे येऊन मोबाईलवर इंटरनेट चालवायचे. त्यांना पासवर्ड हॅकींगची माहिती असेल असे वाटत नाही. हा पासवर्ड त्यांनी वाय फाय प्रोव्हायडर कडून घेतला असेल. त्यांचा स्विच गच्चीवर आहे. नेट गेल्यावर त्यांना गच्चीवर जाऊन ते ऑन करावे लागते. गच्चीला कुलूप असल्याने वॉचमनने त्यांच्याकडून पासवर्ड घेतला असेल असा माझा अंदाज आहे. कुणी कबूल होत नाही हे पण आहे.

माझ्या बाबतीत घराच्या खाली माझ्या वायफायची रेंज चांगली मिळते.>>>>
एका ठिकाणी वाचले होते की रेडीओ वेव्ज्स खालच्या दिशेने जातात, म्हणून वायफाय router उंचावर ठेवावा. खखोदेजा!

गच्चीला कुलूप असल्याने वॉचमनने त्यांच्याकडून पासवर्ड घेतला असेल असा माझा अंदाज आहे. कुणी कबूल होत नाही हे पण आहे.>>>
कुणी कबूल कशाला व्हायला पाहिजे? तुमचा router आहे, तुम्हाला हवा तेव्हा हवा तो पासवर्ड ठेवू शकता! सरळ पासवर्ड बदला, ते सगळे जण आपोआप disconnect होतील! (अर्थात तुमच्या घरातील devices सुद्धा disconnect होतील, मग त्यात तुम्हाला बदललेला पासवर्ड टाकावा लागेल.)
वि.सू. - वायफायचा पासवर्ड स्वतः बदला, सर्व्हिस प्रोव्हायडरला बदलायला सांगू नका. नाहीतर तुमचा नवीन पासवर्ड provider ला माहिती होईल आणि त्याच्या मार्फत पुन्हा वॉचमनला कळेल! म्हणजे सगळे मुसळ केरात!!!

तुम्ही कुणा एकाच्या फोन मध्ये स्वत: पासवर्ड टाकून दिला आणि त्या व्यक्तीला पासवर्ड काय आहे सांगितले नाही, तरी ती व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीला पासवर्ड शेअर करू शकते.

तुम्ही कुणा एकाच्या फोन मध्ये स्वत: पासवर्ड टाकून दिला आणि त्या व्यक्तीला पासवर्ड काय आहे सांगितले नाही, तरी ती व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीला पासवर्ड शेअर करू शकते.>>>

हो, आजकाल Android phone मध्ये connected WiFi वर टच केले की QR code येतो जो स्कॅन करून तिसरा, चौथा व्यक्ती आपल्या Wi-Fi ला सहज connect करू शकतो.

हे टाळण्यासाठी आपण router मध्ये MAC filteration enable करू शकतो. म्हणजे ज्या ज्या device चे MAC address आपण router मध्ये फीड करणार केवळ तेच device connect होणार, इतरांकडे पासवर्ड असला तरीही ते connect करू शकणार नाहीत!!!

हे टाळण्यासाठी आपण router मध्ये MAC filteration enable करू शकतो. म्हणजे ज्या ज्या device चे MAC address आपण router मध्ये फीड करणार केवळ तेच device connect होणार, इतरांकडे पासवर्ड असला तरीही ते connect करू शकणार नाहीत!!! >> घरी पाहुणे/मित्र आल्यावर थोडी पंचाईत होते Happy

मॅक अ‍ॅड्रेस फिल्टरिंग! Lol
आणि मॅक स्पूफ केला की काय करायचं? वॉल्ड गार्डन का आणखी काय ते पण सांगून ठेवा!
बाँब ठेवणे ही आपली रोजची युज केसच आहे जणू!

Pages