पानगळ

Submitted by VD on 8 October, 2023 - 07:57

या रुक्ष माळरानाची जाणीव असमंती,
घेऊन गंध फिकट, वाळलेल्या गावताचा
भिनतो वारा निंबोणीच्या अंगी.

ऋतुबदलात जाणवते पानांना,
इछा तरुची,
पुन्हा मोहरण्याची,
नव्या पलवीची.

सोडून भार वाऱ्यावर,
कातरलेली पाने,
मद्यधुंदीत, घेत हिंदोळे,
जातील तिथे,
वारा घेऊन जाईल जिथे

अथांग अंथरलेला सुवर्ण गालीचा,
सयंकाळी संभ्रमात रंगांच्या.
सोडूनं अट्टाहास हिरवा,
उरतो रंग सावळा-पिवळा,
मौसमात पानगळीच्या.

रात्रीस पौर्णिमेच्या ,
निंबोणीआड तडकलेला,
तरल लहरींवर जळाच्या,
निखळला चंद्र जरासा.

सळसळते शांतता,
पाचोळयात वाळलेल्या.
आरशात या,
रुक्ष माळाच्या,
पाहते ती,
छटा प्रतिबिंबच्या.

Group content visibility: 
Public - accessible to all site users