प्रतिसाद

Submitted by द्वैत on 4 October, 2023 - 05:39

ही रात्र पसरली दूरदूर
अन उगवत नाही तारा
झाडांना उमगत नाही
वाऱ्याचा मूक ईशारा

वाटेवर लावून डोळे
घरट्यात जागते कोणी
वेशीच्यापार निघाले
हे कोण असे अनवाणी?

आशेवर कुठल्या जाणे
मिणमिणती कंदिलकाचा
या प्रहराच्या काठाशी
कोणीच नसे कोणाचा

अन अशाचवेळी कानी
घंटांचा पडतो नाद
निजलेल्या खोल दरीतून
ये हलकासा प्रतिसाद

द्वैत

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह सुरेख!! एकदम गूढरम्य पहाटेचे वातावरण.

सुरेख... सुरेख...
आणि अपवादात्मक रित्या सकारात्मक...