अमृता प्रीतम च्या कवितेचा मराठी भावानुवाद

Submitted by मुग्धमानसी on 1 October, 2023 - 09:48

अमृता प्रीतम च्या एका माज़्या अत्यंत आवडत्या कवितेचा मी मराठीत केलेला भावानुवाद येथे देते आहे.
मूळ कविता पहिल्यी प्रतिसादात.

मी गप्प, शांत अन् निश्चल उभी होते
फक्त जवळ रोंरावत्या समुद्रात एक वादळ होतं

मग समुद्राच्या मनात न जाणे काय विचार आला...
त्यानं वादळाची एक पुरचंडीसारखी बांधली
माझ्या हाती दिली
आणि हसून जरा दूर झाला

मी अवाक् होते.
पण त्याचा तो चमत्कार स्वीकारला!
ठाऊक होतं की अशी काही घटना
कित्येक शतकात एखादीच घडत असेल....

लाखो विचार आले...
डोक्यात चमकून गेले...

पण त्याला उचलून संभ्रमित उभी राहीले... की...
आता मी परत माझ्या शहरात कशी जाऊ?

माझ्या शहराच्या गल्ल्या अरुंद
माझ्या शहरातली छपरं बुटकी
माझ्या शहरातली प्रत्येक भिंत चुगलखोर...!

वाटलं की जर तू भेटलास कुठेतरी...
तर समुद्रासारखंच याला छातीवर पेलून
आपण दोन्ही किनार्‍यांगत खिदळू शकलो असतो.

अन् बुटक्या छपरा, अरुंद गल्ल्यांच्या या शहरात
वसू शकलो असतो....

पण सगळी दुपार तुला शोधत ढळून गेली
आणि माझ्यातली आग मग मी
स्वत:च पिऊन टाकली

मी एकटा किनारा...
स्वत:ला किना‍री लोटून टाकलं.
आणि दिवस ढळता ढळता
समुद्राचं वादळ
समुद्राला परत देऊन टाकलं.

आता रात्र दाटू लागली तेंव्हा तू भेटलायस
तूही उदास, गप्प, शांत अन् निश्चल
मीही उदास, गप्प, शांत अन् निश्चल

फक्त - दूर रोंरावत्‍या समुद्रात एक वादळ आहे!

- अमृता प्रीतम च्या कवितेचा मराठी भावानुवाद.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मैं चुप शान्त और अडोल खड़ी थी
सिर्फ पास बहते समुन्द्र में तूफान था……फिर समुन्द्र को खुदा जाने
क्या ख्याल आया
उसने तूफान की एक पोटली सी बांधी
मेरे हाथों में थमाई
और हंस कर कुछ दूर हो गया

हैरान थी….
पर उसका चमत्कार ले लिया
पता था कि इस प्रकार की घटना
कभी सदियों में होती है…..

लाखों ख्याल आये
माथे में झिलमिलाये

पर खड़ी रह गयी कि उसको उठा कर
अब अपने शहर में कैसे जाऊंगी?

मेरे शहर की हर गली संकरी
मेरे शहर की हर छत नीची
मेरे शहर की हर दीवार चुगली

सोचा कि अगर तू कहीं मिले
तो समुन्द्र की तरह
इसे छाती पर रख कर
हम दो किनारों की तरह हंस सकते थे

और नीची छतों
और संकरी गलियों
के शहर में बस सकते थे….

पर सारी दोपहर तुझे ढूंढते बीती
और अपनी आग का मैंने
आप ही घूंट पिया

मैं अकेला किनारा
किनारे को गिरा दिया
और जब दिन ढलने को था
समुन्द्र का तूफान
समुन्द्र को लौटा दिया….

अब रात घिरने लगी तो तूं मिला है
तूं भी उदास, चुप, शान्त और अडोल
मैं भी उदास, चुप, शान्त और अडोल
सिर्फ- दूर बहते समुन्द्र में तूफान है…..

-अम्रृता प्रीतम

वाह