लेखन उपक्रम २ - मोह - sonalisl

Submitted by sonalisl on 27 September, 2023 - 10:33

बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले....
त्याने तिला बघून न बघितल्यासारखे केलेही पण सभोवताल दरवळणारा गंध त्याला अगदी स्वर्गसुखाची आठवण करून देत होता आणि न रहावून त्याची नजर तिच्याकडेच वळत होती. आतापर्यंत कितीतरी सुखाचे क्षण तिच्याचमुळे त्याच्या आयुष्यात आले होते ते तो विसरू शकत नव्हता.
गेले चार महिने त्याने कटाक्षाने पथ्य पाळले होते. पण आता बास! किती मन मारायचे!
इथे आपल्याला बघणारे कुणी नाही आणि एकदा खाल्ल्याने काय होणार..असा विचार मनात येताच त्याचा हात खिशातल्या पाकिटाकडे वळला आणि त्याने ॲार्डर सोडली, “एक प्लेट भजी दे रे आणि चार मिर्च्या जास्त दे.”

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोह असणे काही वाईट नाही Happy
माझे असे बरेचदा होते..
म्हणजे मी कसली पथ्ये पाळत नाही.. पण दिसले काही खावेसे वाटले तर स्थळ-वेळ-काळ काय आहे याचा विचार न करता खाल्ले जातेच.. जगून घ्यावे त्या क्षणात

Lol छान.

Lol छान.

Lol