चित्र खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू - विषय क्रं-९ - समुद्रकिनारा, जहाज, बोट, होडी

Submitted by संयोजक on 27 September, 2023 - 06:25

मायबोलीकरांनो, पिकनिकसाठी ठिकाण निवडताना समुद्रकिनारा हा नेहमी प्राधान्यक्रमात वर असतो. समुद्रकिनारी वाळूमध्ये आरामात बसून अथांग महासागर बघणे, तेथील आसमंतात दिसणाऱ्या सूर्यास्ताच्यावेळीच्या रंगछटा, त्या सागरातून प्रवास करणारी होडी हे सर्व बघितले तर सुट्टीचे सार्थक झाल्यासारखे वाटते. याच समुद्रकिनाऱ्याविषयी या झब्बूसाठी तुम्हाला प्रकाशचित्रे द्यायची आहेत.
तर चालू करा एक से बढकर एक प्रकाशचित्रे द्यायला.

खेळाचे नियम आणि अटी
१.प्रकाशचित्र एडिट केलेले किंवा कोलाज नको.
२. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
३. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०२३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे त्या डिस्नीतल्या 'टेल्सपिन' मधल्या बल्लूचं एअरक्राफ्ट >>> अस्मिता जी, अरे हो कि, लक्षातच आले नाही, तरी बरं का मी गेल्या महिन्यातच टेल स्पिन पुन्हा बघितली.. भारी लिंक लावली तुम्ही

त्या माणसाबद्दल हे सगळं लिहीताना मलाच गहीवरून आलं, पण यांना पाझर फुटला नाही.
Submitted by रघू आचार्य on 28 September, 2023 - 07:46

>>>> पाझर नाही तर माया आणि करुणेचे अख्खे धारण फुटले होते.. म्हणून तर ब्रेक घेतला होता (खरे कारण इकडे रात्र होती आणि मी झोपलो होतो)... पण आता तुम्ही हि आलात आणि rmd पण सोबतीला माबो गणेशउत्सवाचे इतर कार्यकर्ते सुद्धा तर आता विसर्जनाच्या दिवशी उडू द्या गुलाल होऊ दे विसर्जन जोरात आणि येऊ द्या तुमच्या पोतडीतील फोटो Happy

हे दिनकरा तुझ्या तेजाने हि धरा, हा महासागर जीवित होऊ दे
(इथे आता दिवस झाला आहे तर पुन्हा एकदा समुद्र, किनारा आणि सूर्यनारायणाच्या फोटोने श्री गणेशा करतोय )

PXL_20230906_134940810.jpg

MazeMan >> रत्नागिरी किनारा फोटो, अस्मिता >> स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, अवल >> संध्याकाळ, निल्स_23 >> किनारा, शिंपले चा बोकेह फोटो, Diyu >> किनारा आणि पावलं, वर्णिता >> सूर्यास्त आणि किनारा, माधुरी१०१ >> सॅन्टोरिनी, rr38 >> सिंधुदुर्ग

सध्याचे काही टॉप पीक Happy

बाकी rmd, CalAA-kaar, rr38 आणि रआ >> जोरदार बॅटिंग
रआ तर काय जहाज घेऊन फिरत आहेत Happy म्हणजे आम्ही काही बोलायलाच नको

बेटावरचे आयुष्य
समुद्र म्हटला कि अनुषंगाने बेट आलेच आणि बेट म्हटलं कि चित्रपट प्रेमींना "कास्ट अवे" आठवणारच, तुम्हाला काय आठवता हे हि सांगा

PXL_20230904_235006753.jpg

सुरेख फोटो सगळेच.
आचार्य, रमड, मध्यलोक व rr38 मस्तच.
IMG-20230927-WA0003.jpg
न्यूयॉर्क.

तटरक्षक
ह्या भावाला कसला तरी कॉल आला आणि हा इतक्या वेगाने शांत खाडीतून गेला कि विचारू नका, आजूबाजूला बसलेले सीगल असले घाबरून उडाले ना, मनातल्या मनात म्हणत असतील आता कुठे ब्रेकफास्ट सुरु केला होता आणि ह्यांनी सगळी मजा घालवली Lol

PXL_20230906_164405557.jpg

काय भारी भारी फोटो येतायत. एवढ्या बोटींचे फोटो पाहून कॉम्प्लेक्स आला Proud

या निमित्ताने सर्वांशी छान संवाद साधला गेला, छान वाटलं >>> +१

Pages