पाक कृती स्पर्धा क्रमांक २ .. वांगी बटाटा भाजी .. मनीमोहोर

Submitted by मनीमोहोर on 26 September, 2023 - 06:41
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

काटेरी वांगी पाच सहा ( मोठ्या फोडी करून ) नसल्यास जी मिळतील ती घ्या.
बटाटे २ (मध्यम फोडी )
तेल २ टेबल स्पून
लाल भडक तिखट २ चमचे
गरम मसाला १ चमचा
फोडणीचे नेहमीचे साहित्य (जिर, मोहरी हळद हिंग )
मीठ ,
गरम दूध एक कप

क्रमवार पाककृती: 

कुकर मध्ये तेल घाला, ते तापल की मोहरी, जिर हळद हिंग घाला,
गॅस बारीक करुन दोन चमचे तिखट घाला. नंतर आधी बटाट्याच्या फोडी घालून एक मिनिट भर परतून घ्या, नंतर वांग्याच्या फोडी घालून ही मिनिट भर परतून घ्या. नंतर गरम मसाला , थोडी धने पूड, मीठ घालून चांगले मिक्स करा. आता त्यात गरम दूध घाला. गरम दुधामुळे तर्री छान येते. कुकरचे झाकण बंद करा. प्रेशर धरलं की तीन चार मिनटानी गॅस बंद करा.

आता जाता येता थोड्या थोड्या वेळानी शिटी वर करून थोडी थोडी वाफ काढत रहा. भाजी ओव्हर कूक होऊ नये म्हणून हे करण गरजेच आहे. पूर्ण प्रेशर रिलीज झालं की झाकण उघडा आणि भाजी दुसऱ्या पातेल्यात काढून घ्या. ( गरम कुकर मध्ये ठेवली तर शिजण्याची प्रक्रिया चालूच राहिलं म्हणून )
नारळ , दाण्याचं कूट, किंवा इतर ही काही न घालता मस्त ग्रेव्ही वाली भाजी तयार आहे. दुधामुळे उग्र पण कमी होतो, एक छान चव येते आणि ग्रेव्ही ही होते.

20230324_205535~2.jpg

वाढणी/प्रमाण: 
तीन जणांना पुरेल.
अधिक टिपा: 

इतर काही नसल्याने तिखट आणि गरम मसाला थोडा चढा घाला त्याने भाजी चमचमीत आणि चविष्ट होते.
ह्या भाजीत तुम्ही कांदा लसूण, टोमॅटो अस बारीक चिरून घालू शकता.
ह्या भजीचा की इंग्रेडियंट दुध आहे. मस्त होते दूध घालून भाजी.

फोटो एकच आहे , नियमात बसत नसेल तर नाही घेतली तरी चालेल. दुध घालुन झटपट मस्त भाजी करता येते हे तरी कळेल.

पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मनमोहन, rmd, कविन धन्यवाद.

मनमोहन, होय चमचमीत होते पण फार मसाले नसल्याने आणि दूध ही असल्याने मसालेदार आणि जळजळीत होत नाही. मुलं वांगी खातील का पण ?

मस्त दिसतेय भाजी!
आणि कृती वाचून तरी सोपी वाटतेय.
पूर्ण भाजी मंद आचेवर करायची का?

धन्यवाद मानव.

पूर्ण भाजी मंद आचेवर करायची का? >> नाही आपण नॉर्मल वरण भाताचा कुकर करतो तसाच ठेवायचा गॅस.

जाई, आर्च, मामी धन्यवाद.
आर्च, करून बघितलीस आणि म्हणून मस्त वाटलं

ऑफिसच्या दिवशी सकाळच्या घाईत करायला ही भाजी बेस्ट आहे. वांगी ,बटाटे चिरायला वेळ लागत नाही, वाटण नाही, नारळ खोवा नाही आणि कुकरमध्ये केली की दोन मिनटात होते.

Live updates :
1. तिखटाच्या ऐवजी मालवणी मसाला घालू म्हटलं . मसाला तेलात टाकल्यावर लक्षात आलं की ते जामच तापलयं परिणाम मसाला काळा पडला. त्यात वांगी परतल्यावर अपेक्षित रंग अर्थात आला नाही.
2. दूधपाणी घातलं.. अचानक भाजीने सफेद मलई कोफ्ता करी चं रूप धारण केलं .

आता शिजल्यावर थोडा रंग बदललाय. पण चमचमीत वगैरे काही वाटतं नाहीये. आता खाल्ल्यावरच कळेल.

स्वस्ति , मालवणी मसाला ही मस्त लागेल. पण चमचमीत वगैरे काही वाटतं नाहीये. >> Happy माझी चमचमीत ची व्याख्या अगदीच मिळमिळीत आहे. Proud Proud Proud असो.

मायबोलीवर दूध घालून वांग्याची भाजी आहे की.
नवीन तरी प्रकार नाहीये. >> ओके.

दूध आणि वांग एकत्र खातात का ? >> अदिती, ट्राय करून बघ, आवडतेय का ते.

मी करून बघितली ही भाजी. मस्त झाली होती. Happy फोटो काढायचा राहिला. >> धन्यवाद वावे.

अभिनंदन मनीमोहोर !
पुढाच्यावर्षीही असाच उत्साह कायम राहूदे.
तुमचे प्रशस्तिपत्रक खालीलप्रमाणे.

पाककृती स्पर्धा क्र २ - ...तीय क्रमांक - मनीमोहोर.jpg

संयोजक, द सा, रुपाली, आणि सगळे माबोकर .... मन:पूर्वक धन्यवाद.
@ संयोजक, प्रशस्तीपत्रक खुप छान झालं आहे.

प्राचीन, धन्यवाद .

पुराणांतरी ची वांगी तुम्ही झगमगाटात आणलीत. ममोस्पर्श..:स्मित: >> मस्तच आहे हे ...

Pages