एकारंभा अनंतार्था ( स्वप्नाची समाप्ती) -१

Submitted by छल्ला on 25 September, 2023 - 04:59

बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं...
 

 
बालासोरच्या  प्लॅटफॉर्म एकवर ती कधीपासून उभी होती. शालीमारहून येणाऱ्या कोरोमंडल एक्स्प्रेसची वाट पहात.
 
गर्द निळा ड्रेस, भुरभुरते केस, चेहर्‍यावर उत्कंठा,  हुरहूर!
 
२ जूनच्या  त्या संध्याकाळी, अंधारुन आलं होतं आणि पावसाचेही चिन्ह दिसत होते.
 
“दीदी,  ट्रेन तो लेट होगी बहुत..किसीसे मिलना है..? ” तिच्याकडे पाहात त्या टीसीने पृच्छा केली.   .
“ मी..मी, माझ्या होणाऱ्या नवर्‍याला भेटायला आले आहे. म्हणजे... आम्ही..” ती चाचरत बोलली.
..पळून जाऊन लग्न करणार आहोत..हे पुढचे तिला सांगता आले नाही.
 
आणि कोरोमंडल एक्स्प्रेस च्या भीषण अपघाताची बातमी हिला कशी सांगावी या विचारात तो हरवला.
 
 
 

Group content visibility: 
Use group defaults

अर्र! Sad
कथा चांगली झाली आहे

अर्र!

Happy थँक्यू.
मायबोली वरील माझ्या सर्व मित्र मैत्रिणींकडून प्रतिक्रिया आल्याने फार छान वाटते आहे.