लेखन उपक्रम २- अंदाज! - मी मानसी

Submitted by mi manasi on 24 September, 2023 - 23:51

समज!

बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं..

हसऱ्या डोळ्याची, गोबऱ्या गालाची अगदी त्याच्या मितूसारखी..

तो जवळ जाऊन बसला. तिच्या हातात ‘बेबी अलाइव्ह’ होती. मितूला हवी होती तशी. परवा वाढदिवसाला द्यायची ठरवलं होतं त्याने..

खेळता खेळता तिच्या हातातली बाहुली खाली पडली. पटकन उठून त्याने ती उचलली. आणि तिच्या हातात देऊन तिचे दोन्ही हात घट्ट हातात धरले. ती ओरडली..
“मम्मा बॅड टच!”

त्याबरोबर मोबाईलवर बोलत असलेल्या मम्मीने त्याच्यावर जळजळीत नजर टाकत तिला उचलून घेतल़ं..

तो घाबरून म्हणाला.. “अहो नाही..”

तेवढ्यात मित्र आले आणि गाडीही आली. चढताना त्याने तिला धक्का मारला. आणि तिने फक्त रागाने पाहिलं..

मी मानसी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही उलट राहुलने प्रेमापोटी, दुसर्‍याचे मूल स्वीकारले व त्याला खोटेच सांगीतले ना की ते त्याचे स्वतःचे म्हणजे राहुलचे मूल आहे.
हे तर अजिबात कॉमन नाही.
त्यानेच राहुलला फसवले मला वाटलेलं.

असो. आपली मर्जी!

उत्सव काळात कथा काढून टाकणे हां फाउल आहे Light 1 त्यामुळे खास लोक आग्रहास्तव आणि पेनल्टी म्हणून लगोलग दुसरी लिहून ह्याच दोन पूर्ण विरामाचे विस्तृत स्वरूप मांडावे...

@सामो सॉरी!
@अज्ञानी ओके. जशी आपली आज्ञा! Happy

@सामो
@अज्ञानी
सांगितल्याप्रमाणे नविन कथा टाकली हं मी आता..

@अज्ञानी
@सामो
पुन्हा वाचायची तसदी घेतल्याबद्दल आभार!
त्याने क्षमा याचना म्हणून मान झुकवली का>> ते बदलून मी आता>>> तिच्याकडे पाहून डोळे मिटले असं केलेलं आहे.
..म्हणजे त्याला.. आता मी काय सांगू? असं झालं असणार या अर्थी.

>> वाढदिवसाला द्यायची ठरवलं होतं त्याने..

काही कारणांमुळे देऊ शकला नसेल. क्षणभर ती मितूच आहे असे वाटून/मानून तिचे दोन्ही हात घट्ट हातात धरले असतील....

असा मला अर्थ लागला. छान लिहिली आहे Happy

कथेचा शेवट मनासारखा झाला नव्हता म्हणून मी तो बदलला. आणि त्यानुसार शीर्षकातही बदल केला आहे...
क्षमस्व!