पाककृती स्पर्धा क्र १ - नट ब्राऊनी - अस्मिता.

Submitted by अस्मिता. on 24 September, 2023 - 18:36
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

काजू, पिस्ता, बदाम, खजूर, मध, तीळ, कलिंगडाच्या बिया, रोल्ड ओट्स, मीठ , वेलची पूड.

१. काजू, पिस्ता आणि बदाम श्रीखंडाच्या वाटीने प्रत्येकी एक वाटी.
२. मला अरेबिक दुकानात 'प्रेस्ड डेट्स' या नावाची खजूर पेस्टच मिळाली. त्यातली साधारण एक वाटी घेऊन भिजवून ठेवली. तुम्ही बिया काढलेले खजूर घेतले असतील ते पाऊन वाटी पेस्ट होईल इतके घेऊन, एक तास भिजवून ठेवा . नंतर मिक्सर मधून 'घूरकावून' घ्या.
३. मध पाव वाटी.
४. कलिंगडाच्या बिया किंवा मगज पाव वाटी.
५. तीळ दोन-तीन मोठे चमचे.
६. मीठ अर्धा चमचा.
७. वेलची पावडर पाव चमचा.
८. ओटमील दोन-तीन चमचे.

क्रमवार पाककृती: 

१. सगळे घटक.
IMG-20230924-WA0003.jpg
खजूर बिया काढून कोमट पाण्यात तासभर भिजवून ठेवला.
२. बदामाचे मोठे तुकडे करून घेतले. काजू व पिस्त्याचे तुकडे आधीच होते.
३. ओटमील व तीळ भाजून घेतले.
IMG-20230924-WA0007.jpg
*
IMG-20230924-WA0011.jpg
४. बदाम, काजू व पिस्त्याचे तुकडे भाजून घेतले. फार भाजायचे नाहीत, फक्त खुटखुटीत करायचे आहेत.
५. ओटमीलचे पीठ करून घेतले व भिजवलेल्या खजूरांची पेस्ट करून घेतली.
६. भिजवलेल्या खजुराची पेस्ट पुरणासारखी शिजवून घेतली. फार शिजवल्यास कडवट होते त्यामुळे सांभाळून शिजवावी लागते. पाणी आटून मऊ गोळा तयार होतो.
IMG-20230924-WA0005.jpg
७. या गोळ्यात सगळा सुकामेवा, तीळ घालून चांगले मिसळून घेतले. त्यात मीठ आणि वेलची पावडर घालून झाकण न लावता वाफ काढली, गोळा गच्च व्हायला सुरू होतो. त्यावर शेवटी ओटची पावडर टाकून पुन्हा व्यवस्थित मिसळले. आच मध्यम ठेवायची आहे. शेवटी मध घालून पुन्हा मिसळून घ्यायचे.
८. हा तयार गोळा फॉईल वर डब्यात घातला.IMG-20230924-WA0010.jpg
९. तासभर फ्रीजमध्ये ठेवून बाहेर काढला.IMG-20230924-WA0008.jpg
१०. हव्या त्या आकाराच्या ब्राऊनीज कापून त्यावर क्लिंग रॅप लावून ठेवले. पटकन एक 'ग्रॅब ॲन्ड गो' साठी सुटसुटीत. प्रोफेशनल बेकरीतल्या सारखी स्मार्ट दिसते. Happy
IMG-20230924-WA0004.jpg
प्रोफेशनल लूक -
IMG-20230924-WA0009_0.jpg
मग खेळत स्टोन हेंज केले. Proud
IMG-20230924-WA0006.jpgगंमत - Happy
लेक तिथे बसून 'गॉर्डन रामसे' टाईप हिणवत होती. हे तिनेच स्वतः ला दिलेलं नाव आहे. हे काही बरोबर दिसत नाही वगैरे. तुझा नंबर येणं कठीण आहे. मी म्हटलं 'अगं, नैसर्गिक घटक घालायला सांगितले आहेत', तर मग' mud सारखं दिसलं पाहिजे का ? म्हणाली'. नंतर चव घेऊन 'I need a Jelly bean to revive my tongue' म्हणे. Proud अशा वेळी घरातले Men of few words बरे वाटतात म्हणून जेलीबीन देऊन 'Woman with a few dictionaries of her own' ला कटवले. Men of few words ना आवडले. Happy

***हे कितीही बिघडले तरी छानच लागते. एवढ्या 'प्रतिकूल' परिस्थितीत मी हे केले आता 'छान' म्हणा.

धन्यवाद,
अस्मिता. Happy

वाढणी/प्रमाण: 
एकुण नऊ- दहा झाल्या.
अधिक टिपा: 

१. चमचाभर सुकं खोबरं घालू शकता. आमचं दुकानातच राहीलं.
२. ही मूळ कृती हेब्बरची आहे , आणि तिने 'एनर्जी बार' म्हटलं आहे. पण तिच्यापेक्षा माझं टेक्स्चर मऊ झालं आणि ब्राऊनी झाली. तिचे जास्तच चकाकत होते म्हणून मला थोडी काळजी वाटली. पण अचानक 'चकाकते ते सारेच सोने नसते' ही म्हण आठवली. मराठी भाषेचे उपकार... ! Wink
३. तिनं अर्धी वाटी मध घातला, मी नाही घातला. कारण काहीच नाही, सवय नाही व व्हिडिओ पुन्हा बघितलाच नाही. मनानेच घातला.
४. मध गरम करू नये या आयुर्वेदिक टिपवर विश्वास असेल तर वगळा. मला ते उगाच जेवल्यानंतर झोपू नये टाईप वाटते. कोण ऐकते ?? Happy
५. नंतरही फ्रीजमध्ये ठेवून लवकर म्हणजे आठवडाभरात संपवा.

माहितीचा स्रोत: 
हेब्बरची एनर्जी बार रेसिपी
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>> Proud अशा वेळी घरातले Men of few words बरे वाटतात म्हणून जेलीबीन देऊन 'Woman with a few dictionaries of her own' ला कटवले. Men of few words ना आवडले. Happy

किती मस्त लिहीलयस.
पदार्थ खूप पौष्टिक वाटतो आहे. अगदी राजस. दिसायलाही सुंदर आहे.
बाकी नटसची फॅन नसल्याने, माझा पास.
बक्षिसाकरता शुभेच्छा.

छान.

पण अचानक 'चकाकते ते सारेच सोने नसते' ही म्हण आठवली. ..... भारीय.

पाककृती मस्त आहे. फायनल प्रॉडक्ट लगेच उचलून खावून टाकावे असे वाटले. मध नसता घातला तर स्पर्धेच्या नियमांत बसली असती.

मध चालत नाही ?
मला कल्पना नव्हती. ह्यातला गोडवा खजूराने येतो. मध ग्लेझ पुरता होता. सगळी मेहनत वाया गेली म्हणायची.

@संयोजक, ही पाककृती बाद आहे का ?
@admin, चालत नसेल तर कृपया गणेशोत्सव ग्रूपमधून काढून नेहमीच्या ग्रूपमध्ये टाकणार का ?

चुकून मध लिहिलयस ना? सुधार ती चूक. मधाची वाक्य काढून टाक बरं!
बेस्ट दिसत्येय!
हे कॉस्को मधल्या त्या स्लॅब तोडलेल्या नट चिकी सारखं लागतं का? अर्थात त्यात साखरेचा पाक असेल इथे खजूर आहे.

ब्राऊनी मस्तच !

मला ते उगाच जेवल्यानंतर झोपू नये टाईप वाटते. कोण ऐकते ?? Happy)))) हे आणखीनच मस्त !!!

मस्त!
खजूराची अशी तयार पेस्ट मिळते हे माहीत नव्हतं - इथल्या मिडल ईस्टर्न दुकानात बघते.

भारी दिसतेय.. मराठीत खजूर चिक्की बोलू शकतो का.. की हे फज झाले.. की हे वेगळेच.. मला पाकृ मध्ये काही कळत नाही.

छान आहे रेसिपी. नक्की करून बघणार.

पाककृती बाद आहे की कसं संयोजक सांगतीलच पण स्वतः स्पर्धक असताना धनिनं नियमात नाही लिहिणं अखेळाडू वाटलं.

Men of few words ना आवडलंना जमलं एकदाचं Happy
खुटखुटीत, घुरकावून नवीन शिकलो.
छान जमलीय...

Men of few words Happy
पाककृती
झकास !

भारी दिसतंय.
लेकीचे प्रतिसाद हहपुवा लावणारे आहेत.

छान दिसतेय एकदम पौष्टिक. लिखाण नेहमी प्रमाणे खुसखुशीत.

मध ऑप्शनल असल्याने चालुन जायला हवी असे वाटते.

शेवटच्या फोटोनंतरचा मजकूर आवडला.
खजूर आणि ब्राउनीचं टेक्स्चर आवडीचे नाहीत.
विकतची खजूर पेस्ट वापरली आहे, तर "खजूर बिया काढून कोमट पाण्यात तासभर भिजवून ठेवला." हे कशाला?
घटक पदार्थांच्या फोटोत मध दिसत नाही. कृतीतूनही वगळता येईल. Wink

मस्त .. स्वाद संजिवनीची भेलांडेच आठवली Proud आणि लेक म्हणजे आलेला गेस्ट Happy तिथे पण साखर गूळ वर्ज्य ना..

मी मध खाल्ला नाही, मी मध वाचला नाही..

पाकृ खुसखुशीत लिहिलेय पण मी पूर्वी मिक्सरची 2 भांडी खजूर पेस्ट करुन धारातिर्थी पाडली आहेत.. सो आता खजूर पेस्ट वाचली की मी पाकृ not-to-do list मधे टाकते.

मला शब्दामागच्या खऱ्याखुऱ्या भावना कळतात, मग गणरायापर्यंत तर सगळं पोचतच असेल. तो तर 'अ-क्षरब्रह्म' आहे. माझा उत्साह गेला नाही, संयोजक जे म्हणतील ते आवडेलच. निर्मिती प्रक्रियेचा आनंद घेणं महत्त्वाचं. त्यामुळे गणपती बाप्पा मोरया. Happy

>>>>मला प्रतिसादामागच्या खऱ्याखुऱ्या भावना कळतात, तर गणरायापर्यंत सगळं पोचतच असेल. तो तर 'अ-क्षरब्रह्म' आहे.
_/\_ त्रिवार सत्य.
>>>उत्साह गेला नाही
खूप मस्त वाटलं ऐकून. तुझ्या आनंदावरती विरजण पडलेलं नाही हे ऐकून बरे वाटले.

धनवन्ती, डिंकाची पूड करताना एकदा मी मिक्सरच पातं तोडलं होतं, पण हे तर मऊ आहे. तरी नकोच प्रयोग. Happy

लंपन, भेलांडे बाईंचं बघावं लागणार आहे आता. Lol पण गॉर्डन रामसे मास्टर शेफचे कॉन्टेस्टन्ट पाककृती करताना शेजारी उभं राहून मानसिक खच्चीकरण करतो. फार mean बोलतो. Lol

भरत, मी जरी तयार पेस्ट घेतली तरी इतर लोक खजूर वापरतील म्हणून लिहायचे होते, ते वर जाऊन वाक्यरचना इतक्या वेळा बदलली की 'खाजवून खजूर' झाले. Wink

माझी कॉम्प्लिमेन्ट मला इतक्या लवकर देउ नकोस. आपल्याला आवडणार्‍या व्यक्तीचे थोडे ऋण असू द्यावे तेवढीच पुढील कार्मिक नात्याची शाश्वती Happy
हाहाहा
--------
का माहीत नाही डोळ्यात पाणी आले.

धन्यवाद दसा, हर्पा, अनिंद्य, सिंडरेला, ऋ, अमा, भरत, धनवन्ती, लंपन, स्वाती, स्वान्तःसुखाय, अमित, देवकी तै, मानवदादा, मृ आणि सामो.
प्रोत्साहन देणाऱ्या प्रतिक्रियांसाठी मनापासून आभार.
Uplifting posts Happy

पहिला फोटो Tempting आलाय . खजूर रोल करून बघितले होते . त्याचे थोडे वेगळे version ( fry fruit loaded) . जरूर करून बघेन . घरी आवडेल सगळ्यांना.

सायो, जमेल सहज. तू तर एकापेक्षा एक पाककृती देतेस इथे. Happy
अमित, नट चिक्की कडक असते हे फज सारखं आहे. पण हेल्दी प्रकार आहे. Happy

स्वाती, मी मुद्दाम शोधली नाही, मला नेहमीचे pitted Medjool Dates मिळाले नाहीत, हेच होतं तिथं. Happy

ऋ , खजूर चिक्की म्हणता येईल. Happy

धन्यवाद अश्विनी, हो खजूर रोलही छानच लागतात. Happy ह्याचेही रोल किंवा लाडू वळता येतील.

धन्यवाद मंजूताई. Happy

Pages