लेखन उपक्रम २ - कुतूहल - मानव

Submitted by मानव पृथ्वीकर on 24 September, 2023 - 07:25

बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले....

काही सेकंदच तिच्याकडे पाहिले तेवढ्यात फोनची रींग वाजली.
ताईचा फोन. उद्या श्रीखंड पुरी खायला येणार?
या उत्सवात ना वाट लागते डाएटची, वजन परत जैसे थे.
जायला हवं पण मायेने बोलावतेय तर.

त्याने परत तिकडे पाहिले. अरे तिच्या सारख्या अजुन दोघी आलेल्या.
त्याचे कुतुहल चाळवले.
एवढ्यात त्याला आठवले शि‍र्‍याने स्थानकात पोचल्यावर मेसेज करायला सांगितले होते. बाजुच्या बाकावर बसलेला वडापाववाला अचानक टोपली उचलुन निघुन गेला. तो बाकावर बसला आणि व्हॉट्सॅप उघडुन त्याने शिर्‍याला मेसेज केला.
इतर काही मेसेजेस वाचले आणि परत तिकडे नजर टाकली.
सात जणी!
आता मात्र त्याला रहावले नाही.

त्याने पहीलीवर क्लिक केले आणि एकामागून एक शशक वाचायला सुरवात केली.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त

हे प्रत्यक्षात घडले आजच माझ्या सोबत. सकाळपासून दिवसभरात खूप जणी सातव्या बाकापासून... नव्हे पानापासून... मागे Lol